Multibagger Stock : जेवढी मोठी रिस्क, तेवढं मोठं बक्षिस! गुंतवणूकदार मालामाल तीनच वर्षांत

Multibagger Stock : या शेअरने बाजारात जोरदार धुमाकूळ घातला. अवघ्या तीन वर्षांत या स्टॉकने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे.

Multibagger Stock : जेवढी मोठी रिस्क, तेवढं मोठं बक्षिस! गुंतवणूकदार मालामाल तीनच वर्षांत
Follow us
| Updated on: May 14, 2023 | 4:31 PM

नवी दिल्ली : शेअर बाजार (Share Market) हा जुगार नाही. पण अभ्यास करुन गुंतवणूक केल्यास एखादा स्टॉकमुळे तुमचे नशीब फळफळून येऊ शकते. शेअर बाजारात जोरदार रिटर्न (Best Return) मिळविण्यासाठी गुंतवणूकदारांना दीर्घ गुंतवणूक करणे आवश्यक आहे. पण शेअर बाजारात दररोज शॉर्ट टर्म खेळणाऱ्यांना लॉटरी लागते. अशीच लॉटरी या शेअरमुळे लागली. अवघ्या तीन वर्षांत या स्टॉकमुळे गुंतवणूकदारांचे वारे-न्यारे झाले आहे. तीनच वर्षांत त्यांनी आयुष्यभराची कमाई केली. पण असे स्टॉक मिळविण्यासाठी बाजारातील कंपन्यांचा अभ्यास आणि त्यांची प्रगती यांचा लेखाजोखा मांडावा लागतो.

17 रुपयांहून इतकी मोठी झेप फोकस लाईटिंग आणि फिक्चर लिमिटेड (Focus Lighting And Fixtures) या कंपनीने हा चमत्कार केला आहे. शॉर्ट टर्ममध्ये जोरादर रिटर्न दिला आहे. हा शेअर 17 रुपयांहून थेट 548.55 रुपयांवर पोहचला. गेल्या तीन वर्षांत हा शेअर 3050 टक्क्यांनी वाढला. गुरुवारी या स्टॉकमध्ये 4.97 टक्क्यांची घसरण झाली.

टेक्निकल ॲनालिसीस तांत्रिकदृष्ट्या या शेअरची प्रगती चांगली आहे. स्टॉकचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स(RSI) 43.2 वर आहे. म्हणजे हा ओव्हरबॉट आणि ओव्हरसोल्ड या दोन्ही श्रेणीत नाही. फोकस लाईटिंग शेअरमध्ये 0.7 बीटा आहे. एका वर्षांत या शेअरमध्ये अस्थिरता जास्त दिसली नाही. हा शेअर 100 दिवस आणि 200 दिवसांच्या कामगिरीवर 5, 20 आणि 50 दिवसांच्या मुव्हिंग एव्हरेजवर कमी कारभार करतोय. या स्टॉकने 2 मे 2023 रोजी 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 785 रुपये आणि 17 मे 2022 रोजी 52 आठवड्यांचा निच्चांकी स्तर 80 रुपये गाठला.

हे सुद्धा वाचा

एक लाखाचे 31 लाख फोकस लाईटिंग ॲंड फिक्स्चर लिमिटेडचा शेअर 11 मे 2020 रोजी 17.40 रुपयांवर बंद झाला होता. या 11 मे 2023 रोजी हा शेअर 548.55 रुपयांवर बंद झाला. म्हणजे तीन वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये एक लाख रुपये गुंतवले असते तर ती रक्कम वाढून आज 31.35 लाख रुपये झाली असती.

37 रुपयांहून 490 रुपयांची भरारी सोलर ग्लास(Solar Glass) तयार करणारी कंपनी बोरोसिल रिन्युएबल लिमिटेड (Borosil Renewables Ltd) या कंपनीच्या गुंतवणूकदारांना ही लॉटरी लागली आहे. गेल्या तीन वर्षांत या कंपनीच्या शेअरने 1100 टक्के परतावा दिला आहे. हा मिडकॅप शेअर 17 एप्रिल 2020 रोजी बीएसईवर 37.55 रुपये होता. शुक्रवारी हा शेअर 496 रुपयांवर बंद झाला. या दरम्यान या शेअरमध्ये 1196 टक्क्यांची रॅली दिसली. या स्टॉकने 25 एप्रिल 2022 रोजी त्याचा 52 आठवड्यातील उच्चांक 833 रुपये गाठला होता. तर 28 मार्च 2023 रोजी या स्टॉकचा 52 आठवड्यातील निच्चांक 380.05 रुपये होता.

हा कोणताही गुंतवणुकीचा सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी जोखीमेचा अंदाज घ्या. तज्ज्ञांच्या सल्ल्याने आणि अभ्यासाअंतीच गुंतवणुकीचा निर्णय घ्या.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.