Stock Market Crash: मंदीच्या भीतीने बाजाराची घसरगुंडी, निर्देशांक 1000 रुपयांनी घसरला

सुरुवातीच्या सत्रात निर्देशांक एक वेळा 600 अंकांनी वधरला होता. दुपारनंतर निर्देशांक 600 अंकांनी घसरला. म्हणजेच बाजाराची त्याच्या उच्चपातळीवरुन 1200 अंकांची घसरगुंडी उडाली

Stock Market Crash: मंदीच्या भीतीने बाजाराची घसरगुंडी, निर्देशांक 1000 रुपयांनी घसरला
शेअर बाजाराची घसरगुंडी Image Credit source: सोशस मीडिया
Follow us
| Updated on: Jun 16, 2022 | 6:11 PM

अमेरिकेच्या फेडरेल बँकेने (american federal bank) व्याजदरात उच्चांकी वाढ केली आहे. त्याचा भारतावरही परिणाम झाला. आर्थिक मंदीचा (recession) वरवंटा फिरण्याची भीती बाजारावर दिसून आली. गुरुवारी भारतीय बाजाराने (Share market) सुरुवातीच्या सत्रात घेतलेली आघाडी अवघ्या काही वेळातच थंडावली आणि बाजाराने घसरणीचा प्रवास सुरु केला. बीएसई निर्देशांक (BSE Sensex) आणि एनएसई निफ्टी(NSE Nifty) गेल्या काही दिवसांपासून घसरणीचा शिकार होत आहे. अनेक दिवसांच्या बाजारातील चढ-उतार आज थांबेल आणि बाजारात सुधारणा दिसून येईल अशी आशा होती. त्यातच अमेरिकेतील घडामोडी समोर आल्या. फेडरलच्या व्याज दरवाढीने जागतिक बाजारावर परिणाम झाला, तसा तो भारतावर ही दिसून आला. सुरुवातीला बाजारात उत्साह दिसून आला. त्यामुळे बाजारात गुंतवणुकदारांच्या आशा पल्लवीत झाल्या. परंतू हा उत्साह फार काळ टिकला नाही. परंतू, दुपारी एक वाजेपर्यंत बाजार धराशायी झाला आणि गुंतवणुकदारांच्या तोंडचे पाणी पळाले.

उच्चांकावरुन असा घसरला निर्देशांक

अमेरिकन फेडरल रिझर्व्हने बुधवारी व्याज दर 0.75 टक्के वाढवण्याची घोषणा केली होती. त्यानंतर अमेरिकन बाजार काल तेजीसह बंद झाला. त्याचा परिणाम दुस-या दिवशी गुरुवारी भारतीय बाजारावर दिसून आला. सकाळच्या सत्रात शेअर बाजाराने चांगली सुरुवात केली. एकवेळ निर्देशांकाने 600 अंकांची चढाई केली. व्यापारी सत्र संपताना निर्देशांक 1,045.60 अंकांनी (1.99 टक्क्यांनी) घसरला आणि तो 51,495.79 अंकावर बंद झाला. आज व्यापारी सत्रात निर्देशांक 53,142.50 अंकांच्या उच्चतम पातळीवर गेला होता आणि 51,425.48 अंकांपर्यंत तो घसरला. त्यामुळे शेअर बाजारात जवळपास 1,700 अंकांहून अधिक अंकांची कमालीची घसरण दिसून आली.

हे सुद्धा वाचा

वर्षभरातील निच्चांकी पातळी गाठली

बीएसई निर्देशांक आणि निफ्टीने सुरुवातीच्या व्यापारी सत्रात 1-1 अशी आघाडी घेतली होती. सकाळी 9:20 वाजता सेंसेक्सने 550 अंकांची अधिकची आघाडी घेत 53 हजार अंकाच्या वर व्यापार सुरु केला. निफ्टी ही जवळपास 150 अंकांनी वधरला आणि तो 15,850 अंकांच्या आसपास पोहचला. दुपारी एक वाजता निर्देशांक 640 अंकाहून(1.22 टक्के) अधिक नुकसान सहन करत 51,900 अंकावर घसरला. त्यानंतर घसरणीचे सत्र कायम राहिले. दुपारी 2:45 वाजता निर्देशांकात 1000 अंकांची घसरण झाली आणि गुंतवणुकदारांचे नुकसान झाले. तर निफ्टीतही सेंसेक्सच्याच मार्गावर पडझड झाली. निफ्टीत घसरण होऊ तो 15,465 अंकावर पोहचला. भारतीय बाजारात जुलै 2021 नंतर ही सर्वात निच्चांकी पातळी आहे.

मंदीची आशंका का?

अमेरिकन मध्यवर्ती बँकेने व्याजदरात (Interest rate) वाढ केली आहे. 15 जून 2022 रोजीपासून व्याजदरात 75 बेसिस पॉईंटस्(Basis points) म्हणजे 0.75 टक्क्यांची वाढ केली आहे. मध्यवर्ती बँकेच्या या निर्णयानंतर व्याजदरात 1.75 टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या 28 वर्षांत व्याजदर इतक्या मोठया प्रमाणात वाढवण्यात आले नव्हते. 75 बीपीएस पॉईंटने व्याजदर वाढले आहेत. 1994 पासून पहिल्यांदाच इतक्या मोठया प्रमाणात व्याजदर वाढला आहे. वाढत्या महागाईला(Inflation) आटोक्यात आणण्यासाठी हे पाऊल टाकण्यात आले. सध्या अमेरिका इतिहासातील सर्वात मोठया महागाईचा सामना करत आहे. 40 वर्षात अमेरिकेत एवढया महागाईला नागरिकांना तोंड द्यावे लागले नव्हते. मे महिन्यात अमेरिकेत महागाईचा दर 8.6 टक्के होता. तर जुलै महिन्यात पुन्हा व्याजदर 0.75 टक्क्यांनी वाढवण्याचे संकेत देण्यात येत आहेत. यामुळे अमेरिकेन बाजारातील खेळत्या भांडवलाला लगाम लागेल आणि अर्थव्यवस्थेवर मंदीची स्थिती गंभीर होत जाईल.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.