Mukesh Ambani : मुकेश अंबानी मोठ्या धमाक्याच्या तयारीत, काय आहे मेगा प्लॅन, गुंतवणूकदार होणार मालामाल

Mukesh Ambani : मुकेश अंबानी, रिलायन्सचा जोरदार विस्तार करत आहेत. प्रत्येक क्षेत्रात मांड ठोकण्यासाठी त्यांनी मेगा प्लॅन आखला आहे. हा समूह अनेक प्रयोग करत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचा मोठा फायदा होणार आहे.

Mukesh Ambani : मुकेश अंबानी मोठ्या धमाक्याच्या तयारीत, काय आहे मेगा प्लॅन, गुंतवणूकदार होणार मालामाल
Follow us
| Updated on: Apr 01, 2023 | 5:27 PM

नवी दिल्ली : आशियातील सर्वात श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) लवकरच मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहेत. त्यांची रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) त्यांचा नॉन-बँक लँडिंग आणि आर्थिक सेवा युनिट्स स्वतंत्र होणार आहे. त्यासाठी जिओ फायनेन्शिअल सर्व्हिसेज (Jio Financial Services) या नावाने स्वतंत्र कंपनी तयार करण्यात येत आहे. ही कंपनी लवकरच शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात येत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज बाजारातील भागभांडवला आधारे देशातील सर्वात मोठी कंपनी आहे. या निर्णयामुळे गुंतवणूकदारांना आता कमाईची संधी मिळणार आहे. त्यांना मालामाल होता येणार आहे. सध्या रिलायन्स शेअर बाजारात चांगली कामगिरी बजावत आहे.

रिलायन्सच्या शेअरमध्ये तेजी

रिलायन्स समूहाने याविषयीची माहिती जाहीर केल्याने शेअर बाजारात त्यांच्या शेअर्सने उसळी घेतली. कंपनी हा प्रस्ताव आता शेअर होल्डर्स आणि क्रेडिटर्स यांच्यासमोर ठेवले. प्रस्तावाला मंजूरी मिळवण्यासाठी 2 मे रोजी बैठक होणार आहे. बीएसईवर कंपनीच्या शेअरमध्ये 4.29% उसळी आली. हा शेअर 2331.05 रुपयांवर बंद झाला. या शेअरचा 52 आठवड्यातील उच्चांकी स्तर 2,855 रुपये आहे.

हे सुद्धा वाचा

या चार कंपन्यांचे होणार विलिनीकरण

रिलायन्सच्या या नव्या कंपनीत, रिलायन्स पेमेंट सोल्यूशन्स (Reliance Payments Solutions), जियो पेमेंट्स बँक (Jio Payments Bank), रिलायन्स रिटेल फायनान्स (Reliance Retail Finance) आणि रिलायन्स रिटेल इन्शुरन्स ब्रोकिंग (Reliance Retail Insurance Broking) यांचा समावेश आहे. या चार कंपन्यांतील गुंतवणूकदारांचा आता मोठा फायदा होणार आहे. त्यांना नवीन कंपनीत आपोआप जागा मिळेल.

डिमर्जरचा फायदा

या विलिनीकरणाचा सध्याच्या शेअरधारकांना मोठा फायदा होईल. डिमर्जर प्लॅननुसार रिलायन्सच्या सध्याच्या शेअर होल्डर्सला एका शेअरच्या मोबदल्यात नवीन कंपनीचा एक शेअर देण्यात येईल. कंपनीच्या मंडळाने गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात विलिनीकरणाला मंजूरी दिली होती. के. व्ही. कामत यांना या नवीन कंपनीचे नॉन एक्झिक्युटिव्ह चेअरमन बनविण्यात आले आहे. नवीन शेअर गुंतवणूकदारांना 1:1 या प्रमाणात मिळतील. या कंपनीचा शेअर लवकरच बाजारात सूचीबद्ध, लिस्ट करण्यात येईल. या कंपनीचे नाव जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेज असे असेल.

रिलायन्सचा शेअर सूसाट

तज्ज्ञांच्या मते, रिलायन्सचा शेअर भविष्यात 2450 रुपये आणि नंतर 2600 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. या शेअरचा 52 आठवड्यातील उच्चांकी स्तर 2,855 रुपये आहे. तर नीच्चांकी स्तर 2,180.00 रुपये आहे.  चार कंपन्यांच्या विलिनीकरणानंतर ही कंपनी आर्थिक सेवा क्षेत्रातील कंपन्यांना टफ फाईट देईल. त्यामुळे अनेक कंपन्यांना त्यांची रणनीती बदलावी लागणार आहे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.