Reliance AGM : दिवाळीपूर्वी रिलायन्सच्या गुंतवणूकदारांना मिळणार गिफ्ट ? मुकेश अंबानी आज मोठी घोषणा करण्याची शक्यता…

देशातील महत्वपूर्ण कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 36 लाखांहून अधिक गुंतवणूकदारांसाठी आज मोठा दिवस आहे. कंपनीची 46 वी एजीएम अर्थात ॲन्युअल जनरल मीटिंग आज पार पडणार आहे.

Reliance AGM : दिवाळीपूर्वी रिलायन्सच्या गुंतवणूकदारांना मिळणार गिफ्ट ? मुकेश अंबानी आज मोठी घोषणा करण्याची शक्यता...
Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 28, 2023 | 1:18 PM

नवी दिल्ली | 28 ऑगस्ट 2023 : देशातील सर्वात महत्वपूर्ण कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजची एजीएम अर्थात ॲन्युअल जनरल मीटिंग (RIL AGM) आज होणार आहे. ही कंपनीची 46 वी एजीएम असून दुपारी दोन वाजता सुरू होणार आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदादेखील ही सभा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित केली जाणार आहे. रिलायन्सच्या एजीएमचा गुंतवणूकदारांसह बाजारही आतुरतेने वाट पाहत असतो. याचे मुख्य कारण म्हणजे या सभेत कंपनीतर्फे काही महत्वाच्या घोषणा केल्या जातात, जी बाजाराची पुढील दिशा ठरवते.

रिलायन्सच्या एजीएम अर्थात वार्षिक सभेची सुरूवात कंपनीचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांनी केली होती. त्यांच्या काळात रिलायन्सची एजीएम एखाद्या रॉक कॉन्सर्टप्रमाणे स्टेडिअममध्ये व्हायची. मात्र आता ही सभा शेअरहोल्डर्ससाठीच नव्हे तर सामान्य लोकांसाठी ऑनलाइन आणि टीव्हीवरही प्रसारित केली जाते.

शेअर बाजारामध्ये जिओ फायनॅन्शिअल सर्व्हिसेसचे लिस्टींग झाल्यानंतर रिलायन्सची ही पहिली सभा आहे. 21 ऑगस्ट रोजी कंपनीचे लिस्टिंग झाले होते. या एजीएममध्ये कंपनीचे चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे जिओ फायनॅन्शिअल सर्व्हिसेसच्या बिझनेस प्लान बद्दल मोठी घोषणा करू शकतात, अशी चर्चा आहे. त्याशिवाय ते टेलिकॉम आणि रिटेल बिझनेसच्या आयपीओबद्दलही अपडेट देऊ शकतात. तसेच कंपनीच्या उत्तराधिकार योजनेवरही चर्चा होऊ शकते. रिलायन्स कंपनीच्या शेअरहोल्डर्सची संख्या 36 लाखांहून अधिक आहे.

कुठे पाहू शकता ?

रिलायन्सची ही 46 वी एजीएम व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे. धीरूभाई अंबानींच्या काळात रिलायन्सची एजीएम स्टेडियममध्ये एखाद्या रॉक कॉन्सर्टप्रमाणे व्हायची. मुकेश अंबानींच्या काळातही रिलायन्सच्या वार्षिक सभेची चमक कायम आहे. पण आता तंत्रज्ञानामुळे अनेक बदल झाले आहेत. Jio 5G आणि Jio Fiber सारखी उत्पादने अशाच सभेत लाँच करण्यात आली होती. आता एजीएम ही केवळ शेअरहोल्डर्ससाठीच नसते तर सामान्य जनतेला पाहता यावी यासाठी त्याचे ऑनलाइन आणि टीव्हीवरही प्रसारण केले जाते.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.