RBI Bank License : आरबीआयचा दणका, रद्द केला परवाना, तुमचे तर खाते नाही ना या 8 बँकांमध्ये

RBI Bank License : केंद्रीय बँकेने भारतातील आठ बँकांना दणका दिला. त्यांचा परवाना रद्द केला. या बँकांना आता कोणताही व्यवहार करता येणार नाही. या 8 बँकांमध्ये तर तुमचे खाते नाही ना

RBI Bank License : आरबीआयचा दणका, रद्द केला परवाना, तुमचे तर खाते नाही ना या 8 बँकांमध्ये
Follow us
| Updated on: Apr 21, 2023 | 4:35 PM

नवी दिल्ली : जर तुमचे या सहकारी बँकांमध्ये खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि अटी-शर्तींचे पालन न करणाऱ्या बँकांवर गेल्या एक वर्षापासून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. आरबीआयने (Reserve Bank of India-RBI) काही बँकांचा परवाना रद्द केला आहे. तर काहींवर भरमसाठ आर्थिक भूर्दंड बसवला आहे. काही बँकांना ठराविक काळासाठी व्यवहार करण्यास बंदी घालण्यात आली आहे. नियमांचे पालन न केल्याप्रकरणात एचडीएफसीपासून काही दिग्गज बँकांना फटका बसला आहे. तर सर्वाधिक बडगा सहकारी बँकांवर (Cooperative) उगारण्यात आला आहे.

बँकेने 114 वेळा ठोठावला दंड आरबीआयने (RBI) 31 मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 8 सहकारी बँकांवर कारवाई केली. त्यांचा परवाना रद्द करण्यात आला. नियमांचे पालन न केल्याप्रकरणात काही बँकांवर आरबीआयने 114 वेळा दंड ही ठोठावला. सहकारी बँकांच्या माध्यमातून ग्रामीण आणि दुर्गमा भागात बँकिंग सुविधा झपाट्याने पोहचल्या. पण या बँकांनी नियम धाब्यावर बसवल्याने आरबीआयने त्यांच्याविरोधात कडक पावलं टाकली.

तर कारवाईचा बडगा रिझर्व्ह बँकेने काही नियमावली घालून दिली आहे. त्याचे पालन सर्वप्रकारच्या बँकांना करणे बंधनकारक आहे. बँकेच्या व्यवहारांवर केंद्रीय बँकेचे बारीक लक्ष असते. बँकांना व्यवहारांची आणि लेख्याजोख्याची माहिती सादर करावी लागते. या तरतुदींमध्ये काही विसंगती आढळल्यास रिझर्व्ह बँक कारवाई करते.

हे सुद्धा वाचा

रिझर्व्ह बँकही आपल्या देखरेखीखाली बँकांच्या आर्थिक स्थितीची माहिती घेते.एखाद्या बँकेची स्थिती बिकट असल्याचे दिसले आणि ग्राहकांचे पैसे बुडण्याचा धोका असेल, तर रिझर्व्ह बँक त्या बँकेवर निर्बंध घालू शकते. तसेच, ग्राहकांना पैसे काढण्याची मर्यादा घालून देते. अशा प्रकारची कारवाई वेळोवेळी होत असते.

ठेवीदारांचा पैसा बँकेचा परवाना रद्द झाल्यावर ठेवीदाराला ठेव विमा आणि क्रेडिट हमी महामंडळाकडून (Deposit Insurance and Credit Guarantee Corporation-DICGC) एक ठराविक रक्कम नुकसान भरपाईच्या रुपात दिल्या जाते. त्यामुळे ग्राहकांना एक ठराविक रक्कम मदत म्हणून मिळते.

केंद्र सरकारने ग्राहकांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी यासाठी रक्कम वाढविण्याचा निर्णय घेतला होता. 2020 मध्ये सरकारने याविषयीचा निर्णय घेतला होता. त्यानुसार विमा संरक्षण वाढविण्यात आले. पूर्वी बुडीत बँकेतील ठेवीदारांना एक लाख रुपये मिळत होते. आता ही रक्कम पाच लाख रुपये इतकी झाली आहे.

नियमांचे पालन न केल्याचा आरोप को-ऑपरेटिव्ह बँकांना नियमांचे उल्लंघन आणि आर्थिक विवंचनेचा मोठा फटका बसतो. त्यातच स्थानिक नेत्यांचा सातत्याने हस्तक्षेप सुरु असतो. त्यामुळे आरबीआयच्या नियमांकडे या बँका डोळेझाक करतात. गेल्या एका वर्षात आठ बँकांवर सातत्याने लक्ष होते. त्यांना दंड पण ठोठावण्यात आला होता. आता त्यांचा परवाना रद्द करण्यात आला आहे.

  • या बँकांचा परवाना झाला रद्द 1. मुधोल को-ऑपरेटिव्ह बँक 2. म‍िलथ को-ऑपरेटिव्ह बँक 3. श्री आनंद को-ऑपरेटिव्ह बँक 4. रुपी को-ऑपरेटिव्ह बँक 5. डेक्‍कन अर्बन ऑपरेटिव्ह बँक 6. लक्ष्‍मी को-ऑपरेटिव्ह बँक 7. सेवा व‍िकास को-ऑपरेटिव्ह बँक 8. बाबाजी दाते मह‍िला अर्बन बँक

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.