Valentine Week : रतन टाटा यांची अधुरी प्रेमकहाणी! मनाच्या साम्राज्याला का मिळाली नाही राणी

Valentine Week : सध्या व्हॅलेंटाईन वीक सुरु आहे. काहींना व्हॅलेंटाईनचा शोध घ्यायचा आहे. तर काहींना त्यांचा व्हॅलेंटाईन कधीच मिळाला नाही. प्रत्येकाच्या मनातील हळव्या कोपऱ्यात कोणीतरी असतेच. उद्योगपती रतन टाटा यांची प्रेम कहाणी कधीच पुढे गेली नाही, त्याला कारणं काय असतील?

Valentine Week : रतन टाटा यांची अधुरी प्रेमकहाणी! मनाच्या साम्राज्याला का मिळाली नाही राणी
Follow us
| Updated on: Feb 08, 2023 | 6:42 PM

नवी दिल्ली : फेब्रुवारी म्हणजे प्रेमाचा महिना. सध्या अनेकांना प्रेमाचे भरते आलेले आहे. काहींना प्रेम मिळते. तर काहींना सर्व सूख लोळण घेत असतानाही प्रेमाची (Love) सोबत मिळत नाही. त्यांच्या मनातील कोपरा हळवाच राहतो. भारतीय उद्योगविश्वातील भीष्म पितामह रतन टाटा (Ratan Tata) यांच्या प्रेमाची कथा तुम्हाला माहिती आहे का? रतन टाटा यांना अवघे विश्व ओळखते. रतन टाटा हे यशस्वी उद्योजक, सुस्वभावी, शांत, संयमी आणि त्यांच्या साधेपणासाठी ओळखल्या जातात. पण एवढ्या नोबेल व्यक्तीच्या आयुष्यात एखादी युवराज्ञी (Soulmate) का आली नसेल? त्यांचे लग्न का झाले नसेल? असा सवाल प्रत्येकाच्या मनात येतोच. त्यांचे आयुष्य केवळ नीरस आणि आकडेमोडीचे, रुक्ष, रटाळ तर कधीच नव्हते. या उमद्या मनाच्या, मृदू स्वभावाच्या व्यक्तीच्या आयुष्यातही प्रेमाची पहाट उगवली. पण हे प्रेम त्याच्या शेवटला कधीच पोहचू शकले नाही.

रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी मुंबईत झाला. रतन टाटा हे टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचे दत्तक नातून नवल टाटा यांचे पुत्र आहेत. त्यांनी उद्योगात अनेक विक्रम रचले. त्यांच्या व्यावसायिक मुल्यांच्या जपणवणुकीमुळे भारतीय उद्योगात त्यांना आदराने आणि सन्मानाने ओळखले जाते.

एवढे मोठे बिझिनेस टायकून असूनही रतन टाटा यांचे लग्न का नाही झाले असा प्रश्न वारंवार विचारला जातो. या हँडसम बिझिनेसमनाच्या प्रेमात कोणी पडलेच नाही, असे झाले नाही. त्यांची प्रेमकथा लग्नापर्यंत कधीच पोहचली नाही. लग्नाची गोष्ट पुढे सरकरलीच नाही.

हे सुद्धा वाचा

टाटा समूहाचे चेअरमन रतन टाटा यांनी त्यांचे वैयक्तिक आयुष्य आणि प्रेमप्रकरणावर अनेकदा दिलखूलासपणे माहिती दिली आहे. रतन टाटा हे एका कंपनीत काम करत असताना लॉस एंजेलिसमध्ये प्रेमात पडले होते. परंतु, 1962 च्या भारत-चीन युद्धामुळे त्यांच्या प्रेमकहाणीला ब्रेक लागला. त्यांच्या प्रेमात या युद्धाने प्रेम विराम घडला.

या नात्याविषयी रतन टाटा गंभीर होते. त्यांना त्या मुलीशी लग्नही करायचे होते. पण नंतर त्यांना भारतात परतावे लागले. काही कारणास्तव त्यांची मैत्रिण काही भारतात येऊ शकली नाही. पुढे युद्धाची माशी शिंकली आणि लग्नाला परवानगी मिळाली नाही. हे प्रेम प्रकरण तिथेच संपले.

रतन टाटा यांना ते अमेरिकेत जातील अथवा त्यांची प्रेयसी भारतात येईल असे वाटत होते. दोघांचे कुटुंब सोबत असतील आणि ते लग्न करतील, असा दोघांचा व्होरा होता. सर्व काही मनासारखं घडत असतानाच भारत-चीन युद्ध सुरु झालं. त्यामुळे प्रेयसीच्या कुटुंबियांनी भारतात येण्यास नकार दिला. त्यांची प्रेम कहाणी अधुरी राहिली. रतन टाटा यांचे नाव सिमी ग्रेवाल यांच्यासोबतही जोडल्या गेले. पण दोघांचे लग्न होऊ शकले नाही.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.