PSU Stocks : पैशांचा पाऊस! PSU Stocks ची धमाल, गुंतवणूकदार मालामाल

PSU Stocks : केवळ खासगी कंपन्यांच नाही तर सार्वजनिक क्षेत्रातील या कंपन्यांनी पण गुंतवणूकदारांना मालामला केले आहे. सुरक्षित गुंतवणुकीसह त्यांना जोरदार परतावा दिला आहे. तुमच्या पोर्टफोलिओत आहेत का हे स्टॉक

PSU Stocks : पैशांचा पाऊस! PSU Stocks ची धमाल, गुंतवणूकदार मालामाल
व्हा मालामाल
Follow us
| Updated on: Apr 02, 2023 | 10:21 AM

नवी दिल्ली : केवळ खासगी कंपन्यांच नाही तर सार्वजनिक क्षेत्रातील या कंपन्यांनी (PSU stock) पण गुंतवणूकदारांना मालामला केले आहे. शेअर बाजारात (Share Market) अनेक कंपन्या चांगला परतावा देतात. पण पीएसयू शेअर्सनी त्यांना सुरक्षित गुंतवणुकीसह त्यांना जोरदार परतावा दिला आहे. पीएसयू सेक्टरमधील या कंपन्यांनी केवळ परताव्यावरच गुंतवणूकदारांची बोळवण केली असे नाही तर या कंपन्यांनी त्यांना जोरदार लाभांश ही दिला आहे. गेल्या दोन दशकांपासून, 2011 पासून या कंपन्यांनी लाभांश दिला आहे. काही पीएसयू स्टॉक्सने तर 32 वेळा लाभांश दिला आहे. जोरदार परतावा, सरकारी कंपनी, लाभांश असा हा कमाईचा पॅटर्न अनेक वर्षांपासून सुरु आहे. मग तुमच्या पोर्टफोलिओत आहेत का हे स्टॉक

ओएनजीसी ओएनजीसी (ONGC) स्टॉकची किंमत सध्या 149 रुपये आहे. स्टॉक एज डाटा नुसार, कच्चे तेल आणि नैसर्गिक गॅसच्या या कंपनीने आतापर्यंत गुंतवणूकदारांना 32 वेळा लाभांश दिला आहे. आताच या कंपनीने गुंतवणूकदारांना 4 रुपये प्रति शेअर लाभांश जाहीर केला.

भारत इलेक्ट्रॉनिक्स भारत इलेक्ट्रॉनिक्स (Bharat electronics) हा शेअर सध्या 91 रुपये आहे. या शेअरने 2011 पासून 29 वेळा गुंतवणूकदारांना लाभांश देऊन मालामाल केले आहे. कंपनीने गुंतवणूकदारांना 25 मार्च 2022 रोजी प्रत्येक शेअरवर 0.6 रुपये लाभांश दिला होता.

हे सुद्धा वाचा

आरईसी आरईसी (REC) स्टॉकचा सध्याचा भाव 116 रुपये आहे. या कंपनीने 9 फेब्रुवारी 2023 रोजी 3.25 रुपये प्रति शेअर लाभांश दिला होता. 2011 रोजीपासून कंपनीने आतापर्यंत 27 वेळा डिव्हिडंड दिला आहे.

राष्ट्रीय ॲल्युमिनियम कंपनी राष्ट्रीय ॲल्युमिनियम कंपनीच्या (National Aluminium Company) स्टॉकचा भाव सध्या 77 रुपये आहे. या कंपनीने वर्ष 2011 पासून आतापर्यंत गुंतवणूकदारांना 26 वेळा लाभांश जाहीर केला आहे. कंपनीने 21 मार्च 2023 रोजी 2.5 रुपये प्रति शेअर लाभांश दिला.

ऑईल इंडिया ऑईल इंडिया (Oil India) स्टॉकने 2011 पासून आतापर्यंत 29 वेळा गुंतवणूकदारांना लाभांश दिला. सध्या या शेअरची किंमत 262 रुपये आहे. शेवटच्या वेळी 10 रुपये लाभांश देण्यात आला.

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन (Power Grid Corporation) स्टॉकचा भाव 222 रुपये आहे. या कंपनीच्या शेअरचा भाव सध्या 222 रुपये आहे. या कंपनीने 8 फेब्रुवारी 2023 रोजी 5 रुपये प्रति शेअर असा लाभांश दिला होता. या कंपनीने 2011 पासून आतापर्यंत 29 वेळा गुंतवणूकदारांना लाभांश दिला.

एनटीपीसी एनटीपीसी (NTPC) स्टॉकचा भाव 174 रुपये आहे. या कंपनीने आतापर्यंत गुंतवणूकदारांना 26 वेळा लाभांश दिला आहे. 4 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीने 4.25 प्रति शेअरप्रमाणे लाभांश दिला.

पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन (PFC) स्टॉकने आतापर्यंत, वर्ष 2011पासून 26 वेळा लाभांश जाहीर केला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला आहे. हा स्टॉक सध्या 151 रुपयांवर आहे. 24 फेब्रुवारी 2022 रोजी अंतिम वेळा या कंपनीने 3.5 रुपये प्रति शेअर या प्रमाणे लाभांश दिला.

भारतीय कंटेनर निगम भारतीय कंटेनर निगम (Container Corporation of India) शेअरने 2011 पासून आतापर्यंत गुंतवणूकदारांना 27 वेळा लाभांश दिला आहे. 5 फेब्रुवारी 2022 रोजी या कंपनीने 4 रुपये प्रति शेअरप्रमाणे लाभांश दिला. सध्या या शेअरची किंमत 570 रुपये आहे.

इंजिनिअर्स इंडिया इंजिनिअर्स इंडिया (Engineers India) हा शेअर सध्या 72 रुपयांना आहे. या स्टॉकने दोन दशकात गुंतवणूकदारांना 25 वेळा लाभांश दिला आहे. 13 फेब्रुवारी 2023 रोजी 2 रुपये प्रति शेअर प्रमाणे कंपनीने लाभांश दिला.

हा कोणताही गुंतवणुकीचा सल्ला नाही. गुंतवणुकीपूर्वी तुमचा अभ्यास आणि तज्ज्ञांचा सल्ला मोलाचा ठरेल.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.