Indian Railway : एक सवलत बंद केल्याने भारतीय रेल्वे झाली श्रीमंत! कमावले 2500 कोटी, माहिती अधिकारात उघड झाली माहिती
Indian Railway : भारतीय रेल्वेला कोरोना काळात बंद केलेल्या सवलतीचा मोठा फायदा झाला..
नवी दिल्ली : कोरोना महामारीत (Corona) रेल्वे मंत्रालयाने (Railway Ministry) एक सवलत बंद केली होती. त्यामुळे रेल्वे मंत्रालय एकदम मालामाल झाले. ज्येष्ठ नागरिकांना तिकिटावर देण्यात येणारी सवलत रेल्वे मंत्रालयाने बंद केली होती. या निर्णयामुळे रेल्वे मालामाल झाली. अवघ्या दोन वर्षांत रेल्वेने ही सवलत (Concession) बंद करुन तब्बल 2500 कोटी रुपयांची कमाई (Earned Money) केली. सामाजिक उत्तरदायित्वाची जबाबदारी डावल्याने रेल्वे मंत्रालयावर टीका ही झाली. आता काही अटी आणि शर्तीवर रेल्वे ही सवलत पुन्हा सुरु करण्याचा विचार करत आहे.
रेल्वेने दोन वर्षांपूर्वी ज्येष्ठ नागरिकांना तिकीटावर देण्यात येणारी सवलत बंद केली होती. 19 मार्च,2020 रोजी रेल्वे मंत्रालयाने परिपत्रक काढत सवलतीवर रोख लावली होती. सवलत बंद केल्यानंतर रेल्वेला काय फायदा झाला याची माहिती, माहिती अधिकारात विचारण्यात आली होती.
माहिती अधिकारात विचारलेल्या या प्रश्नाला रेल्वेने उत्तर दिले. त्यानुसार, मार्च 2020 ते सप्टेंबर 2022 या दरम्यान ज्येष्ठ नागरिकांना तिकीटांवर देण्यात आलेली सवलत बंद करण्याचा निर्णय पथ्यावर पडला. या निर्णयामुळे रेल्वे खात्याच्या तिजोरीत 2560.9 कोटी रुपयांची गंगाजळी आली.
ज्येष्ठ नागरिकांनी कोरोना काळात प्रवास करु नये यासाठी ही सवलत बंद करण्यात आली होती. त्यानंतर आता कोरोना संबंधी सर्व नियमात ढील देण्यात आली आहे. नियम शिथिल करण्यात आले आहे. तरीही रेल्वे प्रशासनाने ही सवलत बहाल केलेली नाही.
मार्च 2020 पूर्वी 58 वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या महिलांना ट्रेन तिकीटांवर 50 टक्क्यांची सवलत देण्यात आली होती. तर 60 वर्ष आणि त्याहून अधिकच्या पुरुषांना रेल्वेच्या तिकीटावर 40 टक्क्यांची सवलत देण्यात येत होती. ही सवलत गरीब रथ, एक्स्प्रेस सोडून इतर सामान्य प्रवासावर मिळत होती.
मध्यप्रदेशातील आरटीआय कार्यकर्ते चंद्रशेखर गौड यांनी माहिती अधिकारात ही माहिती विचारली होती. त्यामध्ये मार्च 2020 ते सप्टेंबर 2022 या कालावधीत रेल्वेने वरिष्ठ नागरिकांची एकूण 5808.85 कोटी रुपयांची तिकीट विक्री केल्याचे स्पष्ट झाले.
आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये (सप्टेंबरपर्यंत) रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांना केलेल्या तिकीट विक्रीतून 2335.21 कोटी रुपये कमावले. तर आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांना केलेल्या तिकीट विक्रीतून केवळ 675.57 रुपये कमाई केल्याचे सांगितले.