मुंबई : खवय्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लवकरच सर्वसामान्यांचा वडापाव (Vada Pav) आता आणखी महाग होण्याची शक्यता आहे. वडापावच्या दरात तीन ते चार रुपयांनी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे झाल्यास महागाईचा (Inflation) आणखी एक फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसणार आहे. महाराष्ट्रात वडापाव प्रसिद्ध आहे. राज्यात वडापावला मोठी मागणी आहे. वडापावचे अनेक ब्रॅन्ड राज्यात आहेत. मात्र आणखी काही दिवसांमध्ये वडापाव खाण्यासाठी ग्राहकांना अतिरिक्त पैसे मोजावे लागू शकतात. पावाच्या दरात वाढ झाल्यानं वडापाव देखील महाग होण्याची शक्यता आहे. यंदा तिसऱ्यांदा पावाच्या दरात वाढ करण्यात आली आहे.
महागाई वाढत आहे. अन्न-धान्यापासून ते पेट्रोल, डिझेलपर्यंत सर्वच वस्तू महाग झाल्या आहेत. त्याचा फटका आता पावाला देखील बसला असून, पावाच्या किमती पुन्हा एकदा पन्नास पैशांनी वाढवण्यात आल्या आहेत. यंदा सलग तिसऱ्यांदा पावाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. पावाच्या दरात वाढ करण्यात आल्यानं त्यांचा फटका हा वडापावला देखील बसण्याची शक्यता आहे. पाव महाग झाल्यानं आता वडापावचे दर देखील वाढण्याची शक्यता आहे. वडापावचे दर विक्रेते तीन ते चार रुपयांनी वाढवण्याची शक्यता आहे. म्हणजे आता वडापाव प्रेमिंना वडापावसाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहे.
पावाच्या दरात पन्नास पैशांची वाढ करण्यात आली आहे. केवळ पावाचेच दर वाढले नाहीत तर ब्रेडच्या दरातही वाढ झाली आहे. ब्रेडचे दर देखील वाढले आहेत. त्यामुळे आता पाव आणि ब्रेडपासून तयार होणाऱ्या इतर पदार्थ्यांच्या दरात देखील वाढ होण्याची शक्यता आहे.