Today Petrol Diesel price : पेट्रोल-डिझेलचे आजचे दर काय? तुमच्या शहरातील भाव जाणून घ्या एका क्लिकवर

Today Petrol Diesel price : आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव काय? तुमच्या शहरातील इंधनाचे दर घरबसल्या जाणून घ्या. एका एसएमएसवर हे भाव जाणून घ्या. एका एसएमएसवर तुमच्या शहराचा भाव जाणून घेता येईल.

Today Petrol Diesel price : पेट्रोल-डिझेलचे आजचे दर काय? तुमच्या शहरातील भाव जाणून घ्या एका क्लिकवर
आजचा भाव काय
Follow us
| Updated on: Feb 15, 2023 | 8:33 AM

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत (Crude Oil Price) थोडी घसरण झाली आहे. कच्चा तेलाच्या किंमती आधारे देशातील तेल विपणन कंपन्या पेट्रोल-डिझेलचे भाव ठरवितात. हे भाव सकाळी 6 वाजता जारी करण्यात येतात. प्रत्येक शहरातील पेट्रोल-डिझेलच्या भावात (Petrol Diesel Price) थोडी तफावत आढळते. स्थानिक कर, राज्याचा कर पंप चालकांचे कमिशन यासर्वांचा समावेश इंधनाच्या किंमतीवर पडतो. देशात 22 मे 2022 पासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठा फरक पडलेला नाही. हरियाणातील नवीन सरकारने डिझेलवर तीन रुपयांचा अधिभार लावल्याने तिथे डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. तर देशातील काही राज्य सरकारांनी करात कपात केल्याने जनतेला थोडा दिलासा मिळाला आहे. ब्रेंट क्रूडचा भाव आज 85.15 डॉलर प्रति बॅरलवर स्थिर आहे. तर डब्ल्यूटीआयचा भाव 78.63 डॉलर प्रति बॅरल आहे.

सध्या भारत जागतिक तेल उत्पादक देशांकडून कच्चे तेल खरेदीवर भर देत आहे. 2006-07 मध्ये भारत 27 देशांकडून इंधन आयात करत होता. 2021-22 मध्ये ही संख्या 39 इतकी झाली आहे. कोलंबिया, रशिया, लिबिया यासह छोट्या राष्ट्रांकडूनही भारताने इंधन आयात सुरु केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत पेट्रोल-डिझेल स्वस्त मिळण्याची दाट शक्यता आहे.

तेल विपणन कंपन्या भारतात सकाळी 6 वाजता दर जाहीर करतात. त्याआधारे देशात विविध भागात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो. त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.

हे सुद्धा वाचा

पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक पाठवल्यास त्याला आजचे नवीन दर कळतील. त्यासाठी पेट्रोल पंपावर जायची गरज नाही.

तर बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात. त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा. त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल. एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

  1. महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठा बदल झालेला नाही
  2. मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे
  3. अहमदनगर पेट्रोल 106.23 तर डिझेल 92.75 रुपये प्रति लिटर
  4. अकोल्यात पेट्रोल 106.73 रुपये आणि डिझेल 93.26 रुपये प्रति लिटर
  5. अमरावतीत 107.18 तर डिझेल 93.69 रुपये प्रति लिटर
  6. औरंगाबाद 107.62 पेट्रोल आणि डिझेल 94.08 रुपये प्रति लिटर
  7. नागपूरमध्ये पेट्रोल 106.04 तर डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
  8. नांदेडमध्ये पेट्रोल 108.21 तर डिझेल 94.69 रुपये प्रति लिटर
  9. जळगावमध्ये पेट्रोल 106.33 आणि डिझेल 92.85 रुपये प्रति लिटर
  10. नाशिकमध्ये पेट्रोल 106.77 रुपये आणि डिझेल 93.38 रुपये प्रति लिटर
  11. लातूरमध्ये पेट्रोल 106.86 तर डिझेल 93.37 रुपये प्रति लिटर
  12. कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.05 आणि डिझेल 92.60 रुपये प्रति लिटर
  13. पुण्यात पेट्रोलचा भाव 106.99 आणि डिझेल 93.47 रुपये प्रति लिटर
  14. सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.78 रुपये तर डिझेल 93.30 रुपये प्रति लिटर आहे

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.