Petrol Diesel Price Today | आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर पुन्हा कडाडले, तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर काय?

Petrol Diesel Price Today | आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड आईलच्या किंमती प्रति बॅरल $ 97 च्या वर गेल्या आहेत. त्यांची वाटचाल 100 डॉलरकडे सुरु आहे. मग तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलच्या किंमती स्थिर आहेत की वाढल्या, चला तर जाणून घेऊयात.

Petrol Diesel Price Today | आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर पुन्हा कडाडले, तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर काय?
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 23, 2022 | 1:16 PM

Petrol Diesel Price Today | कच्चा तेलाच्या किंमतीत आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) पुन्हा वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड आईलच्या (Brent Crude Oil) किंमती प्रति बॅरल 97 डॉलरच्या वर गेल्या आहेत. त्यांची वाटचाल 100 डॉलरकडे सुरु आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये अजून ही युद्धविराम झालेला नाही. दोन्ही देश अजूनही माघार घेण्याच्या तयारीत नाही. दुसरीकडे तैवानवरुन चीन आणि अमेरिका आमने-सामने आले आहेत. तर अनेक देशांत महागाईचा विस्फोट झाला आहे. अशा स्थितीतही काही दिवस आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत मोठी वाढ झाली नाही. आता पुन्हा तेलाच्या किंमती कडाडल्या आहेत. मात्र आज मंगळवारीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol Diesel Price) वाढ झालेली नाही. तेल कंपन्यांना पेट्रोल आणि डिझेलवर तोटा सहन करावा लागत आहे. जून तिमाहीत IOC, HPCL आणि BPCL चा एकत्रित तोटा सुमारे 18,480 कोटी रुपये आहे.

राज्यातील पेट्रोल आणि डिझेलचे दर

गुडरिटर्न्स या संकेतस्थळावर आज मंगळवारचे इंधन दर दिले आहेत. त्यानुसार, मुंबईत पेट्रोल प्रति लिटर 106.31 रुपये, तर डिझेलचा भाव प्रति लिटर 94.27 रुपये आहे. पुण्यात पेट्रोल प्रति लिटर 105.85 रुपये, तर डिझेलचा भाव प्रति लिटर 92.37 रुपये आहे. कोल्हापूरमध्ये पेट्रोल प्रति लिटर 106.31 रुपये, तर डिझेलचा भाव प्रति लिटर 93.90 रुपये आहे. ठाण्यात पेट्रोल प्रति लिटर 106.38 रुपये, तर डिझेलचा भाव प्रति लिटर 94.34 रुपये आहे. नाशिकमध्ये पेट्रोल प्रति लिटर 106.83 रुपये, तर डिझेलचा भाव प्रति लिटर 93.33 रुपये आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोल प्रति लिटर 106.42 रुपये, तर डिझेलचा भाव प्रति लिटर 92.93 रुपये आहे. अकोल्यात पेट्रोल प्रति लिटर 106.37 रुपये, तर डिझेलचा भाव प्रति लिटर 92.91 रुपये आहे. नागपूर शहरात पेट्रोल प्रति लिटर 106.04 रुपये, तर डिझेलचा भाव प्रति लिटर 92.59 रुपये आहे.

हे सुद्धा वाचा

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. नवे दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसतात.

एसएमएसवर दर

तुम्ही एसएमएसद्वारे (SMS) पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि तुमचा शहर कोड टाइप करून 9224992249 वर आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, HPCL ग्राहक HPPrice आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवल्यानंतर त्यांना ताजे दर एसएमएसद्वारे मिळतील.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.