Taxpayer Singer : सूरांची जादू, कर्तव्याचा बाणा, देशातील सर्वात महागडा गायक, देतो करांचा इतका नजराणा

Taxpayer Singer : भारतात सूरांची तर नदी वाहते. अनेक तगडे, मधूर गळा असणाऱ्या गायकांची भारतात रेलचेल आहे. त्यातील काहींनी तर मोठं स्थान, अढळ स्थान प्राप्त केलं आहे. काही गायक कर्तव्यातही कसूर करत नाहीत, हा महागडा गायक कर भरण्यात ही मागे नाही.

Taxpayer Singer : सूरांची जादू, कर्तव्याचा बाणा, देशातील सर्वात महागडा गायक, देतो करांचा इतका नजराणा
Follow us
| Updated on: Apr 25, 2023 | 11:56 AM

नवी दिल्ली : भारतात सूरांची सदैव मैफिल भरते. भारतीयांना संगितांची प्रचंड आवड आहे. सप्तसूरात भारतीय चिंब भिजतात. अनेक लाईव्ह शो, टीव्हीवरील विविध शो, मैफिली, सांस्कृतीक कार्यक्रमांची मेजवाणी आपल्या आवतभोवती नेहमी झडते. अनेक दिग्गज गायकांच्या मधूर स्वरांनी आपल्याला वेड लावलं आहे. काहींनी अढळ स्थान प्राप्त केलं आहे. तर काहींनी सर्वसामान्यांच्या हृद्यात स्थान कोरलंय. काही गायक कर्तव्यात ही अग्रेसर असतात. भारतातील महागड्या गायकांपैकी (Richest Singer) हा गायक कर भरण्यातही मागे नाही. त्याच्या कमाईचे आकडे तुमचे होश उडविल्याशिवाय राहणार नाही. तर त्याचे कर देण्याचा बाणा मन जिंकल्याशिवाय राहणार नाही.

अरिजीत सिंह (Arijit Singh) हा बॉलीवूडमधील मधाळ आवाजाचा बादशाह आहे. त्याच्या गायकीने प्रत्येक पिढीला आपलंस केलं आहे. वेड लावलं आहे. या गायकाचं गाणं कानापर्यंतच मर्यादित राहत नाही तर ते तुमचं संपूर्ण भावविश्व व्यापतं. अरजीत सिंह आज त्याचा 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. मधूर आवाज आणि सूरांचा बादशाह असलेल्या या गायकाचे नाव भारतातील सर्वोच्च गायकांमध्ये अग्रक्रमात येते. देशातच नाही तर परदेशातची त्याच्या आवाजाची मोहिनी पडली आहे. प्रचंड मिळकत असतानाही अरिजीत सिंह अत्यंत साधं जीवन जगतो.

कमाईचे आकडे साधं जावन जगणाऱ्या या गायकाकडे सूर आणि पैसा सारखाच वाहतो. त्याच्याकडे कोटवधींची संपत्ती (Arijit Singh Net worth) आहे. मेहनतीने त्याने आज हे स्थान मिळवलं आहे. त्याच्याकडे अपार संपत्ती असली तरी त्याचे पाय आजही जमिनीवर आहे. त्याच्या संपत्तीविषयी अनेक अंदाज आहेत. चला तर त्याच्या कमाईचा आकडा जाणून घेऊयात.

हे सुद्धा वाचा

कोट्यवधींच्या मालमत्तेचे मालक अरिजीत सिंह याला किंग ऑफ प्लॅबॅक सिंगिंग, असे म्हणतात. त्याच्या मधाळ आणि थेट हृदयाला भिडणाऱ्या आवाजामुळे तो सर्वाधिक कमाई करणाऱ्या गायकांत सहभागी आहे. अत्यंत साधेपणानं राहणारा अरिजीत सिंह एका तासाच्या लाईव्ह कॉन्सर्टसाठी 1.5 कोटी रुपये घेतो. तर एका गाण्यासाठी तो 8-10 लाख रुपये घेतो. अरिजीत सिंहची एकूण संपत्ती 7 दशलक्ष डॉलरपेक्षा अधिक आहे. म्हणजे अरिजीत सिंह हा 55 कोटी रुपयांपेक्षा अधिकचा मालक आहे.

मुंबईत आलिशान घर अरिजीत सिंह हा कमाई सोबतच सामाजिक कार्यातही अग्रेसर आहे. तो एका सामाजिक संस्थेचा सक्रीय सदस्य आहे. अरिजीत सिंहचे घर नवी मुंबईत अगदी मोक्याच्या ठिकाणी आहे. त्याच्या घराची किंमत जवळपास 8 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. त्याच्याकडे आलिशान कार ज्यामध्ये हमर, रेंज रोवर, मर्सिडीज-बेंज याचा समावेश आहे.

मासिक कमाई जर तुम्ही अरिजीत सिंहची मासिक कमाई म्हणाल, तर हे आकडे तुमचे होश उडवतील. अरिजित सिंह एका महिन्यात 50 लाख रुपयांहून अधिक कमाई करतो. एवढी कमाई करणारा हा स्टार गायक कर चुकता करण्यात ही मागे नाही. तो कर चुकवेगिरीपेक्षा कर देण्यात अग्रेसर आहे, असे म्हणतात. तो त्याच्या संपत्तीवर निश्चित कर भरतो. त्याविषयीच्या आकड्यांचा खुलासा झाला नसला तरी, दाव्यानुसार, तो सर्वात जास्त कर देणारा गायक आहे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.