Multibagger Share : दोनच वर्षांत गुंतवणूकदारांना लॉटरी! या स्टॉकने भरली झोळी

Multibagger Share : या कंपनीच्या स्टॉकने दोनच वर्षात जोरदार कामगिरी बजावली. गुंतवणूकदारांना मोठा फायदा मिळवून दिला. ही कंपनी रेल्वेसाठी काम करते. विविध उत्पादने तयार करते. या कंपनीने दोन वर्षांत 363 टक्के परतावा दिला आहे.

Multibagger Share : दोनच वर्षांत गुंतवणूकदारांना लॉटरी! या स्टॉकने भरली झोळी
Follow us
| Updated on: Aug 27, 2023 | 5:46 PM

नवी दिल्ली | 27 ऑगस्ट 2023 : शेअर बाजारात (Share Market) गुंतवणूकदारांना काही शेअर जोरदार परतावा देतात. काही शेअर दीर्घकाळात मोठा फायदा करुन देतात. तर काही शेअर अवघ्या काही वर्षांतच मालामाल करतात. या कंपनीचा शेअर जोरदार वधारला आहे. ही कंपनी रेल्वेसाठी सेवा आणि उत्पादने पुरविते. या कंपनीच्या स्टॉकने दोनच वर्षात जोरदार कमागिरी बजावली आहे. गुंतवणूकदारांना मोठा फायदा मिळवून दिला. ही कंपनी विविध उत्पादने तयार करते. या कंपनीने दोन वर्षांत 363 टक्के परतावा दिला आहे. काही शेअर मल्टिबॅगर (Multibagger Stock) ठरतात. त्यासाठी कंपनीचा, शेअर बाजाराचा अभ्यास असणे गरजेचे आहे. बाजारातील तज्ज्ञांचा सल्ला पण मोलाचा ठरतो.

29 रुपयांहून स्टॉकने घेतली भरारी

या दोन वर्षांत या मल्टिबॅगर स्टॉकने गुंतणूकदारांना तगडा रिटर्न दिला आहे. दोन वर्षांपूर्वी 24 ऑगस्ट 2021 रोजी हा स्टॉक 29.15 रुपयांवर होता. BSE वर 25 ऑगस्ट 2023 रोजी हा शेअर 134.95 रुपयांवर ट्रेड करत होता. या दोन वर्षांत या शेअरने 363 टक्के परतावा दिला आहे.

हे सुद्धा वाचा

कोणती आहे ही कंपनी

Texmaco Rail & Engineering Ltd या कंपनीचा हा स्टॉक आहे. एखाद्या गुंतवणूकदाराने या स्टॉकमध्ये दोन वर्षांपूर्वी एक लाख रुपये गुंतवले असते तर आज ते 4.62 लाख रुपये असते. या दरम्यान शेअर बाजार निर्देशांकाने 16.07 टक्क्यांची झेप घेतली आहे. या स्टॉकमधील दोन वर्षांची गुंतवणूक आता फायदेशीर ठरली असती.

मार्केट कॅप वाढला

शुक्रवारी या कंपनीचा शेअर 52 आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर 134.95 रुपये प्रति शेअरवर पोहचला. या शेअरने एकाच दिवसात 8.65 टक्क्यांची उसळी घेतली. या कंपनीचे मार्केट कॅप वाढून ते 4235.81 कोटी रुपयांवर पोहचले आहे. टेक्समॅको रेल्वे शेअर 5, 20, 50, 100 दिवस आणि 200 दिवसांच्या उच्चांकावर आहे.

कंपनीची शेअर हिस्ट्री

गेल्या एका वर्षांत टेक्समॅको रेल्वे स्टॉकमध्ये 169.78 टक्के उसळी आली. 29 मार्च 2023 रोजी हा स्टॉक 52 आठवड्यांच्या निचांकीस्तरावर 40.49 रुपयांवर पोहचले. या स्टॉकने निच्चांकाहून 233.29 टक्के रिकव्हरी केली आहे. गेल्या सहा महिन्यात या स्टॉकने 199.77 टक्के वाढ नोंदवली. जानेवारीपासून या स्टॉकने 127.09 टक्क्यांची उसळी नोंदवली. जून तिमाहीत या कंपनीच्या 23 प्रमोटर्सकडे या कंपनीत 58.70 टक्के हिस्सेदारी होती.

काय करते ही कंपनी

टेक्समॅको रेल्वे अँड इंजिनिअरिंग रेल्वेसाठी हायड्रो मॅकनिकल उपकरण, औद्योगिक संरचनात्मक, लोको घटको, लोको शैल, रेल्वे पुलसाठी स्टील गर्डर, स्टील कास्टिंग, अभियांत्रिकीकरण अशा अनेक उत्पादने तयार करते. बेलूर इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड, टेक्समॅको ट्रान्सट्रॅक प्रायव्हेट लिमिटेड या टेक्समॅकोच्या सहायक कंपन्या आहेत.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.