Mukesh Ambani : मुकेश अंबानी यांची ही कंपनी होणार स्वतंत्र, रिलायन्सपासून घेणार फारकत

Mukesh Ambani : रिलायन्समध्ये मोठा बदल होत आहे. ही कंपनी आता स्वतंत्र करण्यात येणार आहे. त्याचा ग्राहकांवर काय परिणाम होईल. त्यांचा काय फायदा होईल? ही उठाठेव कशासाठी करण्यात येत आहे?

Mukesh Ambani : मुकेश अंबानी यांची ही कंपनी होणार स्वतंत्र, रिलायन्सपासून घेणार फारकत
Follow us
| Updated on: Jul 09, 2023 | 5:21 PM

नवी दिल्ली : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) सहयोगी फर्म रिलायन्स स्ट्रॅटेजिक इन्व्हेसमेंट्स लिमिटेड (RSIL) स्वतंत्र कंपनी करणार आहे. या फारकतीसाठी तारीख पण निश्चित करण्यात आली आहे. त्यासाठी रिकॉर्ड डेट 20 जुलै निश्चित करण्यात आली आहे. रिलायन्स स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडच्या विलिगीकरणानंतर (Demerger) कंपनीचे नाव बदलेल. जिओ फायनेन्शिअल सर्व्हिसेज लिमिटेड (JFSL) असे नाव असेल. या निर्णयाचे अनेक परिणाम होतील. बाजारात परिणाम दिसून येईल. तर गुंतवणूकदारांना पण याचा फायदा मिळेल. जुन्या कंपनीचे किती इक्विटी शेअर गुंतवणूकदारांना द्यायचे याचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यासाठी 20 जुलै ही तारीख निश्चित करण्यात आली आहे.

कोण राहील कप्तान यावर्षी मार्च महिन्यात याविषयीची चर्चा झाली होती. त्यानुसार, रिलायन्स स्ट्रॅटेजिक इन्व्हेसमेंट लिमिटेडच्या विलिगीकरणासाठी योजना तयार करण्याचे ठरले होते. नवीन कंपनी पुढील व्यावसायिक वृद्धीसाठी तयार करण्यता येत आहे. हितेश कुमार सेठी हे या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ असतील.

कंपनीची नेटवर्थ या नवीन कंपनीचे एकूण भागभांडवल जवळपास 1,50,000 कोटी रुपये असेल. त्यामध्ये जवळपास 1,10,000 कोटी रुपये मूल्याचे रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर असतील. उर्वरीत रक्कम तिचे मुळ भांडवल असेल. त्या तुलनेत बजाज फायनान्सचा पसारा मोठा आहे. ही NBFC वित्तीय सेक्टरमधली मोठी कंपनी आहे. तिचे एकूण भांडवल जवळपास 44,000 कोटी रुपये आहे.

हे सुद्धा वाचा

शेअरधारकांचा फायदा काय या विलिगीकरणाचा शेअरधारकांना मोठा फायदा होईल. त्यांना रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरच्या मोबदल्यात स्ट्रॅटेजिक इन्व्हेसमेंट लिमिटेडचा एक शेअर मिळेल. या विलिगीकरणामुळे रिलायन्सला आता वित्त सेवांवर अधिक लक्ष केंद्रीत करता येईल. गुंतवणूकदारांना अजून एक फायदा होणार आहे. त्यांना रेकॉर्ड तारखेनंतर त्यांच्या डिमॅट खात्यात जिओ फायनेन्शिअलचे स्टॉक मिळतील. हा बोनस ठरु शकतो. हे शेअर वधारल्यावर गुंतवणूकदार मालामाल होतील.

या क्षेत्रात रिलायन्सचा दबदबा JFSL आता व्यापारी, ग्राहकांना कर्ज पुरवठा करु शकेल. त्यासाठी तरल संपत्ती कंपनीकडे असेल. येत्या तीन वर्षांत कंपनी कर्जासोबतच विमा, पेमेंट, डिजिटल ब्रोकिंग, एसेट मॅनेजमेंटमध्ये सेवा पुरवणार आहे. ग्राहकांना नवनवीन ऑफर्स मिळतील. बजाज फायनान्सला येत्या काही वर्षात मोठा स्पर्धक तयार होऊ शकतो.

भारतातील 5 वी मोठी वित्तीय संस्था जेफरीजच्या दाव्यानुसार, जिओ फायनान्शिअल सर्व्हिसचे मार्केट व्हॅल्यूएशन 90,000 ते 1.5 लाख कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. नवीन कंपनीच्या शेअरची किंमत 179 रुपयांच्या जवळपास असेल. तर मॅक्युरी रिसर्चनुसार, नवीन कंपनी झाल्यानंतर जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस देशातील आर्थिक क्षेत्रातील 5 वी मोठी बँका असेल. एचडीएफसी बँक, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक आणि ॲक्सिस बँक यानंतर जिओचा क्रमांक असेल. यंदा एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी या दोघांचे विलिनीकरण होणार आहे. या विलिनीकरणानंतर एचडीएफसी बँक देशातील सर्वात मोठी फायनान्स कंपनी ठरेल.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.