Cough Syrup : बालकांच्या जीवाशी खेळ? या कंपनीचे कप सिरप वादात, राज्य सरकाने घेतला हा निर्णय..

Cough Syrup : गांबियामध्ये देशातील एका कफ सिरपमुळे काही बालके दगावल्याचा आरोप केल्यानंतर महाराष्ट्र सरकारने या कप सिरप बाबत हा मोठा निर्णय घेतला आहे..

Cough Syrup : बालकांच्या जीवाशी खेळ? या कंपनीचे कप सिरप वादात, राज्य सरकाने घेतला हा निर्णय..
जीवघेण्या औषधाची तपासणीImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Oct 13, 2022 | 3:05 PM

मुंबई : पश्चिम आफ्रिकेतील देश गांबियामध्ये (Gambia) भारतीय कफ सिरपमुळे (Cough Syrup) काही बालके दगावल्याचा आरोप करण्यात येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WTO) याविषयीची शंका उपस्थित केली आहे. तसेच या कप सिरपचे जे नमुने घेण्यात आले, त्यातील काही नमुन्यात केमिकल आढळल्याने चिंता व्यक्त होत आहे. ही परिस्थिती पाहता महाराष्ट्र सरकार (Maharashatra Government) ही सजग झाली आहे..

बालकं दगावल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनंतर महाराष्ट्र सरकारनेही या कप सिरपबाबत कडक पाऊले टाकली आहेत. राज्य सरकारने मेडेन फार्मास्युटिकल (Maiden Pharmaceuticals) कंपनीचे विक्रीसाठी आणलेले कप सिरप पुन्हा कंपनीकडे पाठविण्याचे आदेश दिले आहेत. कंपनीला हा मोठा झटका मानण्यात येत आहे.

या कंपनीचे उत्पादन हरियाणा राज्यात सुरु आहे. गांबिया देशात या कप सिरपमुळे काही बालकांचा मृत्यू ओढावल्याचा दावा करण्यात आल्याने केंद्र सरकारसह राज्य सरकार सतर्क झाले आहे. त्यांनी या कंपनीच्या उत्पादनावर थेट रोख लावली नसली तर माल परत पाठविण्याचे आदेश दिले आहेत.

हे सुद्धा वाचा

राज्याच्या अन्न आणि औषधी नियंत्रक विभागाने (FDA) महाराष्ट्रात विक्री झालेल्या कप सिरपच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.इकोनॉमिक्स टाईम्सने याविषयीचे वृत्त दिले आहे. त्यामुळे अशी काही घटना घडण्यापूर्वीच राज्य सरकारने सुरक्षेच्या उपाय योजना केल्याचे स्पष्ट होत आहे.

राज्य सरकारने याच कंपनीचे नाही तर सर्वच कप सिरप, एक्सिपियंट, सॉलवेंट आणि लिक्विड ओरलच्या तपासणीचे आदेश दिले आहेत. राज्यात तयार होणाऱ्या औषधींचीही तपासणी करण्यात येणार आहे.

औषधी उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी इंडस्ट्रियल ग्रेड सॉलवेंटचा तर वापर केलेला नाही ना, याची एफडीए तपासणी करणार आहे. याविषयीची संपूर्ण तपासणी करुन अहवाल सादर करण्यात येणार आहे.

राज्यात सध्या 250 कफ सिरप तयार करणारे उत्पादन संच (Manufacturing Unit) सुरू आहे. या सर्व औषधांची तपासणी करुन याविषयाचा अहवाल 31 ऑक्टोबरपर्यंत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सिरपमध्ये कुठले रसायन वापरण्यात आले याचा तपास लावण्यात येणार आहे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.