Lady Elon Musk : धावते अशी की वाऱ्याला पण होतं थकायला, कोण आहे ही जगातील अब्जाधीश महिला

Lady Elon Musk : ती अगदी फिट अँड फाईन आहे. बुद्धीमत्तेच्या जोरावर तिने मोठंमोठ्या कंपन्या स्थापन केल्या आहेत. आज ती 36,11,60,80,000 रुपयांची मालकीण आहे. कोण आहे ही लेडी एलॉन मस्क..

Lady Elon Musk : धावते अशी की वाऱ्याला पण होतं थकायला, कोण आहे ही जगातील अब्जाधीश महिला
Follow us
| Updated on: Jun 30, 2023 | 5:15 PM

नवी दिल्ली : जगात सध्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्स धुमाकूळ घालत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून अनेक जणांच्या नोकऱ्यावर कुऱ्हाड कोसळेल, असे भाकित करण्यात येत आहे. पण काही जण या तंत्रज्ञानाच्या आधारे अब्जाधीश झाले आहेत. जगात Scale AI चा सीईओ ॲलेक्झांडर वांग सध्या सर्वाधिक चर्चेत आहे. स्वतःच्या हिंमतीवर त्याने कमी वयात साम्राज्य उभं केले आहे. तर या कंपनीची सहसंस्थापक पण कमी नाही. ती अगदी फिट अँड फाईन आहे. बुद्धीमत्तेच्या जोरावर तिने मोठंमोठ्या कंपन्या स्थापन केल्या आहेत. आज ती 36,11,60,80,000 रुपयांची मालकीण आहे. तिला सर्वच जण लेडी एलॉन मस्क (Lady Elon Musk) असे ओळखतात, कोण आहे ही अब्जाधीश

सेल्फ मेड महिला तर या तरुणीचे नाव लुसी गुओ (Lucy Guo) असे आहे. ती Scale AI ची सहसंस्थापक आहे. फोर्ब्सच्या सेल्फ मेड महिलांच्या यादीत ती दुसऱ्या क्रमांकावर आहे. पण तिने इतर ही कंपन्या उभारल्या आहेत. त्यातून तिला मोठे उत्पन्न मिळते. स्वतःच्या हिंमतीवर, बळावर तिने हे स्थान पटकावलं आहे. एवढंच नाही तर ती फिटनेस आयकॉन म्हणून पण ओळखल्या जाते.

कॉलेजमध्ये असतानाच कंपनी उभारली लुसीने 2018 मध्ये स्केल एआय ही कंपनी सोडली. या कंपनीत तिची अजूनही 6 टक्के वाटा आहे. या कंपनीचे सध्याचे भांडवल 7.3 बिलियन डॉलर आहे. कॉलेज सुरु असतानाच मित्र वांग सोबत लुसीने ही कंपनी सुरु केली होती. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, फिटनेसच नाही तर वित्तीय सेवांमध्ये पण तिने जम बसविला आहे. ती अनेकांसाठी रोल मॉडेल आहे.

हे सुद्धा वाचा

कोडिंगचे आकर्षण लुसी लहानपणापासूनच कोडिंगकडे आकर्षित झाली. तिचे आई-वडिल इलेक्ट्रिकल इंजिनिअर होते. मुलींनी तंत्रज्ञान क्षेत्रात येऊ नये, असे तिच्या आई-वडिलांचे मत होते. या क्षेत्रात जीवतोड मेहनत असते. स्वतःसाठी वेळ देता येत नाही, असा त्यांचा समज होता. पण लुसीला याच क्षेत्रात करिअर करायचे होते.

मिळाली फेलोशिप कंम्प्युटर सायन्समध्ये पदवी मिळविण्यासाठी ती कार्नीज मेलन (Carnegie Mellon) महाविद्यालयात गेली. 2014 मध्ये फेलोशिप मिळाल्याने तिने कॉलेज सोडले. पुढे लुसीने फेसबुक इंटर्नशीप केली. त्यानंतर कोरा, स्नॅपचॅटमध्ये डिझायनर म्हणून नशीब आजमावले.

2015 मध्ये कंपनी Scale AI चा सीईओ ॲलेक्झांडर वांग आणि लुसीची ओळख 2015 मध्ये झाली. दोघांनी ही कंपनी सुरु केली. दोघांनी दोनच वर्षांत कंपनी जागतिक नकाशावर आणली. पण 2018 मध्ये लुसीने वेगळी वाट निवडली. तिने बॅकएंड कॅपिटल नावाची कंपनी सुरु केली. त्यानंतर इतर कंपन्या सुरु केल्या.

इतकी आहे संपत्ती रिपोर्ट्सनुसार, लुसीची नेटवर्थ जवळपास 440 मिलियन डॉलर, 36,11,60,80,000 रुपये इतके आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, वित्तीय सेवासह इतर माध्यमातून तिला ही कमाई होते. ती प्रत्येक दिवशी 10-20 मैल धावते. तिचा फिटनेस वाखणण्याजोगा आहे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.