Mutual Fund : म्युच्यूअल फंड सही है! लाखो गुंतणवणूकदारांनी ओतले कोट्यवधी रुपये,  SIP खात्यांची संख्या पोहचली 5.55 कोटींवर

Mutual fund news : शेअर बाजाराची घसरगुंडी उडाली असली तरी, म्युच्युअल फंडांतील गुंतवणूकीवर कसला ही विपरीत परिणाम झाला नाही, उलट त्यात गुंतवणूकदारांनी कोट्यवधी रुपये ओतले आहेत.

Mutual Fund : म्युच्यूअल फंड सही है! लाखो गुंतणवणूकदारांनी ओतले कोट्यवधी रुपये,  SIP खात्यांची संख्या पोहचली 5.55 कोटींवर
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 09, 2022 | 12:05 PM

Mutual Fund Sahi Hai : शेअर बाजारानंतर (Share Market) भरघोस परताव्यासाठी (Good Return) भारतीय कुठे गुंतवणूक करत असतील तर ती म्युच्यूअल फंडमध्ये (Mutual Fund) . या गुंतवणूकीत रिस्क फॅक्टर थोडा कमी असतो. तर रिटर्नही पॅसिव्ह असतात. कधी जोरदार परतावा मिळतो. तर एखाद्या वर्षी कमाई रिव्हर्स होते. तरीही गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंड सही है, असाच नारा दिला आहे. म्युच्यअल फंडातील गुंतवणूकीवर विश्वास जागवला आहे. सध्या भारतीय शेअर बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांची(FII) सततची विक्री सुरु आहे. जागतिक बाजारात घसरण, रुपयाची कमजोर पडला आहे, महागाईत वाढ झाली आहे या सर्व गोष्टी असूनही किरकोळ गुंतवणूकदारांचा म्युच्युअल फंडांवर विश्वास मात्र कायम आहे. गेल्या जूनमध्ये एसआयपी(SIP) खात्यांची संख्या 5.55 कोटींवर पोहोचली आहे. एवढेच नाही तर SIP द्वारे येणारी गुंतवणूक देखील 12,276 कोटी रुपयांवर पोहचली आहे. ही आतापर्यंतची सर्वकालीन उच्चांकी गुंतवणूक आहे. शेअर बाजारात एकाच दिवशी मोठं नुकसान करण्यापेक्षा म्युच्यूअल फंडातील नुकसान त्या मानाने कमी असल्याने आणि पडत्या काळातील गुंतवणूक भविष्यात फायदेशीर ठरणार असल्याने गुंतवणूकदारांनी म्युच्यूअल फंडातील गुंतवणूक सही ठरवली आहे.

म्युच्युअल फंड फोलिओमध्ये वार्षिक 31% वाढ

Amfi या म्युच्युअल फंड कंपन्यांच्या व्यवस्थापन संघटनेने आकडेवारी समोर आणली आहे. त्यानुसार, गेल्या वर्षी जूनमध्ये इक्विटी फंडांमध्ये सलग 16 व्या महिन्यात निव्वळ गुंतवणूक झाली. उद्योगाच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता(Equity Asset under Management) 35.64 लाख कोटी रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली आहे. म्युच्युअल फंड फोलिओच्या संख्येत वार्षिक 31% वाढ नोंद झाली आहे. जून 2021 मध्ये 10.25 कोटींचा फंड फोलिओ होता. तो यंदाच्या जून महिन्यात 13.46 कोटी झाला.

हे सुद्धा वाचा

SIP खात्यात लक्षणीय वाढ

यंदा SIP खात्यांची संख्या 5.55 कोटींवर पोहोचली आहे. रिटेल इक्विटी (इक्विटी + हायब्रीड + सोल्यूशन ओरिएंटेड) योजनांचे नेट एयूएम वार्षिक 16% वाढून 17.91 लाख कोटी रुपये झाले आहे. मार्च 2021 नंतर सलग 16 व्या महिन्यात किरकोळ योजनांनी जूनमध्ये 13,338 कोटी रुपयांचा खेळते भांडवल अनुभवले आहे. एवढ्या विपरीत परिस्थितीतही गुंतवणूकदारांनी एसआयपीला भरभरून प्रतिसाद दिल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर नवीन अनेक खाते उघडल्या गेल्याने म्युच्यूअल फंडातील गुंतवणूकीवर शिक्कामोर्तब झाले आहे.

थेंबे थेंबे साचे तळे

एम्फीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एनएस व्यंकटेश यांनी दैनिक भास्करला दिलेल्या माहितीनुसार, छोट्या गुंतवणूकदारांचा एसआयपीद्वारे बचत करण्याचा कल कायम असल्याचे समोर आले आहे. भारतीयांनी बचतीची कास सोडलेली नाही. बचतीचे आर्थिकीकरण करण्याचा मेगा ट्रेंड देशातही सुरू आहे. सर्व रिटेल इक्विटी योजना, निर्देशांक, ईटीएफ आणि एफओएफने जूनमध्ये सकारात्मक गुंतवणूक दर्शविली आहे. हे रिटेल म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांचा शेअर बाजारातील चढ-उतारांदरम्यान दीर्घकालीन गुंतवणूकीत वाढ होईल हा आशावाद व्यक्त करतात.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.