Gold Import : भारतीयांनी सोन्यालाच केले ‘आडवे’! आयात प्रचंड घसरली, महागाईचा असाही परिणाम

Gold Import : लग्नसराईमध्ये सोने खरेदीची मोठी धावपळ उडते. या काळात सराफा बाजार फुललेला असतो. बाजारात प्रचंड वर्दळ असते. पण सोन्याच्या किंमती भडकल्यापासून सोने आयात प्रचंड घसरली आहे. त्यामुळे बाजारात चिंतेचे वातावरण पसरलं आहे.

Gold Import : भारतीयांनी सोन्यालाच केले 'आडवे'! आयात प्रचंड घसरली, महागाईचा असाही परिणाम
आयात घटली
Follow us
| Updated on: Feb 17, 2023 | 10:00 AM

नवी दिल्ली : दिवाळीनंतर सोन्याने गिअर बदलला. सोने सूसाट धावत आहे. 50 हजारांच्या आत बाहेर खेळणाऱ्या सोन्याने अवघ्या चार महिन्यात 58,000 हजारांचा टप्पा ओलांडला. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांनी सराफा बाजाराचा रस्ता चुकवला आहे. सोन्याच्या वाढत्या किंमतीचा (Gold Price) परिणाम लागलीच दिसून आली. सराफा बाजारात सोने-चांदीची मागणी कमी झाली. आकडेवारीने तर अनेकांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. गेल्या वर्षी पेक्षा यंदा आयात (Gold Import) प्रचंड घसरली आहे. ग्राहकांनी महागड्या सोन्याला दुरुनच नमस्कार घातला आहे. त्यामुळे सोन्याच्या आयातीला प्रचंड फटका बसला आहे. घरगुती बाजारात किंमती वाढल्याने आणि मागणी घसरल्याने सोन्याची आयात घसरली. जानेवारी, 2023 मध्ये सोन्याची आयात 76 टक्के घसरली आहे. गेल्या 32 महिन्यातील हा नीच्चांकी आकडा आहे. आकड्यानुसार, आयात घसरली असली तरी ही पथ्यावर पडली आहे. त्यामुळे व्यापारी घाटा कमी झाला आहे.

सरकारी सूत्रांनुसार गुरुवारी याविषयीची माहिती समोर आली. त्यात जानेवारी महिन्यात केवळ 11 टन सोन्याची आयात करण्यात आली आहे. तर गेल्यावर्षी जानेवारी, 2022 मध्ये देशात 45 टन सोन्याची आयात करण्यात आली होती. गेल्यावर्षी देशात 69.7 कोटी डॉलर सोने आयात करण्यात आले होते. यंदा आकड्यांनी खरी परिस्थिती विषद केली आहे. यंदा केवळ 2.38 अब्ज डॉलरचे सोने आयात करण्यात आले आहे.

स्थानिक बाजारात सोने जास्तच चमकले. सोन्याने प्रति 10 ग्रॅम 58 हजारांच्या पुढे पोहचले. हे दर 60,000 रुपये ते 62,000 रुपयांच्या घरात पोहचतील असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. याचा खरेदीदारांच्या मनोभूमिकेवर मोठा परिणाम झाला. सोन्याच्या वाढत्या किंमतींमुळे सोन्यातील गुंतवणूक कमी झाली आहे. ठराविक आणि श्रीमंतच सोन्यात गुंतवणूक वाढवत आहे. सर्वसामान्यांनी आणि गरिबांनी सोन्याची गल्ली बदलवली आहे.

हे सुद्धा वाचा

ऐन लग्नसराईच्या तोंडावर सोन्याची आयात घसरल्याने सराफा बाजारात चिंतेचे वातावरण आहे. तरीही सराफा व्यापाऱ्यांना लग्नसराईत सोन्याची मागणी आणखी वाढेल अशी आशा आहे. येत्या तीन महिन्यात सोन्याची मागणी प्रचंड वाढण्याची शक्यता आहे. सोन्यावरील आयात शुल्क कमी होण्याची अपेक्षा या अर्थसंकल्पात होती. पण ही अपेक्षा फोल ठरली. उलट केंद्र सरकारने चांदीवरील आयात शुल्क वाढले आहे.

सराफा बाजारातील तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, जानेवारीने निराशा केली असली तरी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात सोन्याच्या आयातीत मोठी मागणी नोंदवली जाऊ शकते. आयात शुल्काकडे दुर्लक्ष करत सोन्याची आयात वाढवू शकतात. त्यामुळे येत्या काही महिन्यात सोन्यावरील मळभ कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.