‘सिबिल’चे विघ्न दूर; कर्ज मंजुरीसाठी नाही जीवाला घोर! लाखोंचे कर्ज मिळवा झटपट
कर्ज मिळवण्यासाठी सिबिल स्कोर तगडा असावा लागतो. सिबिल चांगलं नसेल तर बँका कर्जासाठी उभं ही करत नाही. अशावेळी घरातील सोनं तुमच्या मदतीला धावून येऊ शकतं. सोनं गहाण ठेऊन कर्ज काढता येतं आणि पुढे सिबिल स्कोर ही सुधारता येतो.
सिबिल स्कोर (Cibil Score) खराब असेल तर कोणती ही बँक (Bank) दारात ही उभी करत नाही. कर्जाची गरज असताना ज्यांचे सिबिल खराब आहे, त्यांना याची चांगली प्रचिती आलेली असते. स्कोर कमी (Score Down) असला तर कर्ज मिळेल ही ,पण त्याचा व्याजदर चढा असेल. जर गृहकर्ज घ्यायचे असेल तर सिबिल स्कोअर हा 750 पेक्षा अधिक असावा लागतो. पण जर सिबिल स्कोअर चांगला नसेल तर अशावेळी कर्ज मिळण्याचा पर्याय कोणता आहे? क्रेडिट कार्ड असेल तर एकवेळा थोड्याफार कर्जाची व्यवस्था होईल, पण तेही नसेल तर ? अशावेळी सर्वात चांगला उपाय म्हणजे सुवर्ण कर्ज (Gold Loan)हा आहे. गोल्ड लोन साठी ग्राहकाला त्याच्याकडील सोने गहाण ठेवावे लागते. त्यानंतर बँक कर्ज पुरवठा करते. कारण बँकेकडे कर्जा रक्कमे बदल्यात मोठी सुरक्षित वस्तू असते. कर्जाची रक्कम हाती आल्यावर पुढे वेळेत परतफेड केल्यास सिबिल स्कोर ही सुधारतो.
स्कोअरची सुवर्ण संधी
गोल्ड लोन च्या मदतीने भली मोठी रक्कम हाती येईल आणि अडलेले काम पूर्ण करता येईल. सिबिल स्कोअर खराब असो वा चांगले, त्यानंतर ही गोल्ड लोन घेतले असेल तर ही सिबिल स्कोअर सुधारण्याची सुवर्ण संधी आहे. वेळेत कर्जाच्या हप्त्यांची परतफेड केली, नियमीत हप्ते भरले तर क्रेडिट हिस्ट्री सुधारते आणि सिबिल स्कोअर ही सुधारतो. अनेक बँका ग्राहकांना 25,000 ते 25 लाख रुपयांचे सुवर्ण कर्ज देते. 6 ते 36 महिन्यांत हे कर्ज फेडावे लागते. गोल्ड लोनसाठी ज्या दिवशी बँकेकडे अर्ज कराल त्याच दिवशी खात्यात कर्ज रक्कम जमा होते.
असा सुधारा सिबिल स्कोर
सिबिल स्कोअर सुधारण्यासाठी बँकेने कर्ज हप्त्याचा जो दिवस निश्चित केला आहे, त्या दिवशी हप्त्याची परतफेड करा. हप्ते नियमीत भरा. परिणामी सिबिल स्कोअरमध्ये त्वरीत सुधारणा होईल. काही कारणांनी वेळेत हप्ता न भरता आल्यास तो लवकर भरण्याचा पहिला प्रयत्न करा. रक्कम येताच सर्व थकीत ईएमआय एकदाच भरा. जर अधिक हप्ते थकले तर बँक गहाण ठेवलेल्या सोन्याची विक्री करुन कर्जाची परतफेड करुन घेते.
सध्या गल्लीबोळात काही खासगी कंपन्यांचे सोने तारण कर्ज योजनाचे बोर्ड दिसतील. पण कमी व्याजदराच्या आमिषाने बहुमूल्य सोने कोणाच्या ही हातात देऊ नका. जिथे सोने सुरक्षित राहील आणि योग्य व्याजदराने रक्कम मिळेल, त्याच ठिकाणी कर्जासाठी अर्ज करा. वेळेत कर्ज परतफेड करा. तरच सिबिल स्कोअरमध्ये सुधारणा होईल.