Banking Crisis : या 30 बँकांपैकी एक ही बुडाली तर येईल त्सुनामी! या यादीत भारतातील किती बँका

Banking Crisis : जगात मोठ्या घडामोडी घडत आहेत. बँकिंग क्षेत्राला मोठा दणका बसला आहे. अमेरिकेतील बँका धडाधड धराशायी होत आहे. त्यामुळे जगावर मंदीचे संकट येणार का? त्याचा भारतीय बँकांवर, अर्थ व्यवस्थेवर काय परिणाम होणार, असे अनेक प्रश्न सर्वांनाच पडले आहे. त्याची उत्तरं शोधण्याचा हा प्रयत्न..

Banking Crisis : या 30 बँकांपैकी एक ही बुडाली तर येईल त्सुनामी! या यादीत भारतातील किती बँका
Follow us
| Updated on: Mar 22, 2023 | 7:26 PM

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून जगभरातील बँकिंग सेक्टरवर (Banking Crisis) संकटांचे वारे घोंगावत आहे. त्यातच अमेरिकेतील एक एक बँक धराशायी होत असल्याने सर्वांच्याच चिंता वाढल्या आहेत. या बँकांना धडाधड कुलूप लागले आहे. स्टार्टअप कंपन्यांची आर्थिक नाडी मानली जाणारी सिलीकॉन व्हॅली बँक (Silicon Valley Bank) सर्वात अगोदर बुडाली. ही अमेरिकेतील 16 वी सर्वात मोठी बँक होती. क्रिप्टो कंपन्यांना कर्ज देणारी सिग्नेचर बँक (Signature Bank) गुंडाळल्या गेली. तर फर्स्ट रिपब्लिक (First Republic) आता गाशा गुंडाळण्याच्या तयारीत आहे. युरोपमधील दिग्गज क्रेडिट सुइस (Credit Suisse) या बँकेलाही झळ पोहचल्याने जगात हाहाकार माजला.

अर्थतज्ज्ञांनी जगातील 30 अशा बँकांची यादी तयार केली आहे. ज्या बुडाल्या तर मोठं आर्थिक संकट चालून येईल, अशी भीती त्यांना वाटत आहे. त्यामुळे जगावर मंदीचे संकट येणार का? त्याचा भारतीय बँकांवर, अर्थ व्यवस्थेवर काय परिणाम होणार, असे अनेक प्रश्न सर्वांनाच पडले आहे. या तीस बँकांमध्ये किती भारतीय बँका आहेत. आपली भारतीय बँकिंग प्रणाली किती सुरक्षित आहे, याविषयी प्रश्न विचारण्यात येत आहेत.

जी-एसआयबी काय आहे

हे सुद्धा वाचा

क्रेडिट सुईस ही स्वित्झर्लंडची दुसरी सर्वात मोठी बँक आहे. तर जगातील सर्वात महत्वाच्या 30 बँकांमध्ये तिचा समावेश होतो. फायनेशिअल स्टॅबिलिटी बोर्ड (Financial Stability Board) दरवर्षी आर्थिक सुस्थितीत असणाऱ्या 30 बँकांची यादी तयार करते. त्यांना ग्लोबल सिस्टेमॅकली इम्पोर्टेड बँक (G-SIB) असे म्हटल्या जाते. या बँका अशा आहेत, ज्या जगाच्या अर्थव्यवस्थेला बुडू देणार नाहीत, असे मानण्यात येते. यातील एक बँक जर बुडाली तर आर्थिक संकट ओढावू शकते, असे मत आहे.

चीनच्या चार बँका, भारताची एक ही नाही

G-SIB च्या यादीत युरोपातील 13, उत्तर अमेरिकेतील 10, आशियातील 7 बँकांचा समावेश आहे. उत्तर अमेरिकाचा विचार करता, त्यातील 9 बँका अमेरिकेच्या तर एक बँक कॅनडाची आहे. अमेरिकेच्या बँकांमध्ये जेपी मॉर्गन, बँक ऑफ अमेरिका, सिटी ग्रूप, एचएसबीसी, गोल्डमॅन सॅस, बँक ऑफ न्यूयॉर्क, मॉर्गन स्टॅनली, स्टेट स्ट्रीट आणि वेल्स फार्गो यांचा समावेश आहे.

आशियातील बँकांमध्ये चीनच्या चार बँका तर जपानचा तीन बँकांचा समावेश आहे. चीनमधील बँकांमध्ये इंडस्ट्रियल आणि कमर्शियल बँक ऑफ चायना, एग्रीकल्चरल बँक ऑफ चायना, चायना कंस्ट्रक्शन बँक आणि बँक ऑफ चायनाचा समावेश आहे. युरोपच्या बँकांचा विचार करता यामध्ये बार्कलेज, बीएनबी परिबा, डॉयचे बँक, क्रेडीट सुइस, ग्रुप बीपीसीई, ग्रुप क्रेडिट एग्रीकोल, आईएजी, Santander, Societe Generale, Standard Chartered, UBS आणि UniCredit यांचा समावेश आहे.

तीन सुरक्षित बँका

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) नुकतीच देशातील सर्वाधिक सुरक्षित बँकांची यादी (Safest Bank in India) जाहीर केली. या बँकांमध्ये एचडीएफसी, आयसीआयसीआय आणि एसबीआय (HDFC, ICICI, SBI) यांचा समावेश आहे. या बँकांना D-SIB असे ही म्हणतात. D-SIB चा अर्थ डोमेस्टिक सिस्टमॅटिकली इंपोर्टेंट बँक असा आहे. दरवर्षी केंद्रीय रिझर्व्ह बँक देशातील सर्वात सुरक्षित बँकांची यादी जाहीर करते. या बँका बुडीत खात्यात गेल्या. त्यांनी दिवाळखोरी घोषीत केली तर देशाच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडू शकते. त्यामुळे केंद्र सरकारसह आरबीआय या बँका बुडू नये यासाठी सातत्याने प्रयत्न करतात.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.