Pan Card : लग्नानंतर पॅनकार्डमध्ये बदलावा सरनेम..इतकी सोप्पी आहे प्रक्रिया

Pan Card : लग्नानंतर तुम्हाला आडनावात बदल करायचा असेल तर ही सोप्पी पद्धत अवलंबवावी लागेल..

Pan Card : लग्नानंतर पॅनकार्डमध्ये बदलावा सरनेम..इतकी सोप्पी आहे प्रक्रिया
असे बदलवा आडनावImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Oct 20, 2022 | 7:11 PM

नवी दिल्ली : आधार कार्ड (Aadhaar Card), पॅन कार्ड (Pan Card) अथवा राशन कार्ड हे सर्व दस्तावेज महत्वाचे आहेत. ते नेहमी जवळ ठेवणे आवश्यक असतात. परंतु, मुलींना लग्नानंतर माहेर सोडून सासरी यावे लागते आणि त्यांचे विश्वच बदलून जाते. पतीचे घरचं तिचे होऊन जाते. विवाहानंतर तिला आडनाव (surname) बदलावे लागते.

Pan Card आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचा दस्तावेज आहे. त्याची गरज तुम्हाला अनेक ठिकाणी पडते. हे अत्यंत महत्वाचे कागदपत्र आहे. त्याशिवाय तुम्हाला प्राप्तिकर विवरण पत्र भरता येत नाही. जर तुम्हीही पॅनकार्डवरील आडनाव बदलू इच्छित असाल तर त्यासाठी एकदम सोप्पी पद्धत आहे..

पॅनकार्डवरील नाव बदलण्यासाठी तुम्हाला एक अर्ज भरून द्यावा लागतो. त्यासाठी शुल्क अदा करावे लागेल.हे शुल्क तुम्ही नेटबँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड अथवा रोखीत देऊ शकता.

हे सुद्धा वाचा

जर तुम्ही भारतामध्येच तुमचा पत्ता बदलवू इच्छित असाल तर त्यासाठी 110 रुपये आणि बाहेरील देशातील पत्त्यासाठी हे शुल्क 1020 रुपये असेल. देशातंर्गत पत्ता बदलण्यासाठी तुम्हाला नगण्य शुल्क आकारण्यात येणार आहे.

पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला PAN निवेदन अर्ज डाऊनलोड करुन तो भरावा लागेल. त्यानंतर या भरलेल्या अर्जाची एक प्रिंट आऊट काढावी लागेल. यासंबंधीत अर्जावर तुम्हाला 2 पासपोर्ट साईज छायाचित्र लावावी लागतील. त्यानंतर स्वाक्षरी करुन तो जमा करावा लागेल.

अर्जसोबत तुम्हाला काही कागदपत्रे द्यावे लागतील. ही कागदपत्रे तुम्हाला स्व साक्षांकित (Self Attested) करावी लागतील. ही सर्व कागदपत्रे आणि अर्ज तुम्हाला NSDL साठी पाठवावा लागेल.

पॅन कार्डवरील आडनाव बदलण्यासाठी https://www.onlineservices.nsdl.com/paam/endUserRegisterContact.html  यावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर अर्ज भरावा लागेल. तपशील देऊन हा अर्ज जमा करावा लागेल. त्यानंतर सध्याचे पॅन कार्ड नंबर द्या. जो पत्ता बदलायचा आहे त्याचा तपशील द्यावा लागेल. त्यानंतर अर्ज जमा करावा लागेल.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.