Repo Rate EMI Connection | रेपो रेट वाढला, तुमच्या कार आणि घराच्या ईएमआयमध्ये किती रुपयांची वाढ होणार?; जाणून घ्या एका क्लिकवर

Repo Rate EMI Connection News | रेपो दर वाढीचा थेट परिणाम तुमच्या कर्जाच्या हप्त्यावर होतो. कर्जाचा दर वाढला की तुमचा ईएमआय वाढतो, काय आहे गणित समजून घेऊयात

Repo Rate EMI Connection |  रेपो रेट वाढला, तुमच्या कार आणि घराच्या ईएमआयमध्ये किती रुपयांची वाढ होणार?; जाणून घ्या एका क्लिकवर
असा वाढणार ईएमआयImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 05, 2022 | 12:16 PM

Repo Rate EMI Connection | भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) मौद्रिक नीती समितीच्या(MPC Meeting) बैठकीत अखेर रेपो दर वृद्धीवर शिक्कामोर्तब झाले. रेपो दर 4.90 टक्क्यांहून 5.40 टक्के झाला. केंद्रीय बँकेने रेपो दरात (Repo Rate) चार महिन्यांत 1.40 टक्क्यांची वाढ केली आहे. यावेळी रेपो दरात 0.50 टक्क्यांच्या वाढीचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. यामुळे महागाई (Inflation) भडकण्याची शक्यता आहे. आता नागरिकांचे गृहकर्ज(Home Loan) , वाहन कर्ज (Vehicle Loan) , वैयक्तिक कर्जावरील (Personal Loan) ईएमआय (EMI) वाढणार आहे. यामुळे महागाई भडकणार आहे. कर्जावरील ईएमआयचा बोजा वाढणार आहे. त्यात किती वाढ होईल असा सर्वांना प्रश्न पडला आहे. यापूर्वीच्या हप्त्या आणि नव्या हप्त्यात साधारणतः किती रुपयांची वाढ होईल, या प्रश्नांची उत्तरे शोधुयात. या वाढीचा थेट परिणाम तुमच्या खिश्यावर कसा होतो ते समजून घेऊयात.

आता वाढलेल्या रेपो दरामुळे किती फरक पडेल?

आजच्या रेपो दरात आरबीआयने 0.50 टक्क्यांची वाढ केली आहे. त्याचा काय परिणाम होतो ते पाहुयात. समजा तुम्ही 7.55% दराने 20 वर्षांसाठी 30 लाख रुपयांचे घर कर्ज घेतले आहे. या कर्जावर तुम्हाला 24,260 रुपयांचा ईएमआय चुकता करावा लागतो. 20 वर्षात त्याला या दराने 28,22,304 रुपये व्याज द्यावे लागेल. म्हणजेच 30 लाख रुपयांच्या बदल्यात त्याला एकूण 58,22,304 रुपये भरावे लागतील. आता कर्ज घेतल्यानंतर आरबीआयने रेपो दरात 0.50% वाढ केली. परिणामी बँकही व्याजदरात 0.50 टक्क्यांनी वाढ करेल. त्यामुळे बँक आता 7.55टक्क्यां ऐवजी 8.05 टक्के व्याज दर जाहीर करेल. म्हणजेच 20 वर्षांसाठी 30 लाख रुपयांचं कर्ज घेतल्यास त्याचा ईएमआय 25,187 रुपये राहील. याचा अर्थ तुमच्या ईएमआयपेक्षा 927 रुपये जास्त दर महिन्याला भरावे लागतील. 20 वर्षात एकूण 60 लाख 44 हजार 793 रुपये मोजावे लागतील. ही रक्कम तुमच्या कर्जफेड रक्कमेपेक्षा 2,22,489 ने अधिक असेल.

आता तुमचा ईएमआय कितीने वाढेल?

कर्जावरील दोन प्रकारचे व्याजदर असतात. पहिला असतो तो फ्लोटर म्हणजेच लवचिक, जसे व्याजदर बदलतील तसा ईएमआय बदलेल. तर दुसरा स्थिर व्याजदर आहे. यामध्ये एकदा जो व्याजदर ठरलेला आहे. तोच शेवटपर्यंत लागू राहिल. या दोन्ही प्रकाराचे फायदे आणि तोटे आहेत. बदलत्या परिस्थितीनूसार त्याचे नुकसान आणि फायदे ग्राहकांना मिळतात.

हे सुद्धा वाचा

यंदा हा दर तिप्पट

दर दोन महिन्यांनी मौद्रिक नीती समिती बैठक घेते. या आर्थिक वर्षाची पहिली बैठक एप्रिलमध्ये झाली. त्यानंतर आरबीआयने रेपो रेट 4 टक्क्यांवर स्थिर ठेवला होता. पण आरबीआयने 2 आणि 3 मे रोजी तातडीची बैठक बोलावली होती, ज्यात रेपो रेट 0.40% ने वाढवून 4.40% करण्यात आला होता. रेपो रेटमध्ये हा बदल 22 मे 2020 नंतर झाला. या आर्थिक वर्षातील पहिली बैठक 6- 8 एप्रिल रोजी झाली. यानंतर 6 जून 8 रोजी झालेल्या मॉनेटरी पॉलिसीच्या बैठकीत रेपो रेटमध्ये 0.50% वाढ करण्यात आली आहे. यामुळे रेपो रेट 4.40% वरून 4.90% पर्यंत वाढला. आता ऑगस्टमध्ये त्यात अजून 0.50% वाढ करण्यात आल्याने हा दर 5.40% पर्यंत गेला आहे.

रेपो रेट वाढ आणि घटीचे कारण काय?

महागाई काबूत ठेवण्यासाठी केंद्रीय बँक खटाटोप करत असते. रेपो रेट हे महागाईशी लढण्याचे आरबीआयकडे असलेले मजबूत शस्त्र आहे. महागाई खूप जास्त असताना आरबीआय रेपो रेट वाढवून अर्थव्यवस्थेतील पैशाचा ओघ कमी करते. रेपो रेट जास्त असेल तर आरबीआयकडून बँकांना मिळणारी कर्जे महाग होतात. त्यामुळे ग्राहकांना ही मोठ्या व्याजदराने कर्ज मिळते. त्याचा परिणाम थेट मागणीवर होतो. महागाई वाढली की मागणी घटते. जेव्हा अर्थव्यवस्था वाईट अवस्थेतून जाते, तेव्हा वसुलीसाठी पैशाचा ओघ वाढण्याची गरज असते. अशा परिस्थितीत आरबीआय रेपो रेट कमी करते. यामुळे आरबीआयकडून बँकांना मिळणारी कर्जे स्वस्त होतात आणि ग्राहकांनाही स्वस्त दरात कर्ज मिळते. कोरोना काळात बाजारात पैसाच नसल्याने आणि व्यवहार मंदावल्याने आरबीआयने व्याजदर कमी करून अर्थव्यवस्थेतील पैशाचा ओघ वाढवला होता.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.