Top 10 Startup Mistakes : स्टार्टअप कंपनीचे शिवधनुष्य उचलण्यासाठी टाळा या 10 चुका आणि गाठा टार्गेट!

उद्योन्मुख उद्योजकांसाठी आरपीजी इंटरप्राईजेसचे मुख्य हर्ष गोयनका यांनी यशाचा कानमंत्र दिला आहे.

Top 10 Startup Mistakes : स्टार्टअप कंपनीचे शिवधनुष्य उचलण्यासाठी  टाळा या 10 चुका आणि गाठा टार्गेट!
स्टार्टअपImage Credit source: social
Follow us
| Updated on: May 17, 2022 | 10:45 AM

मुंबई : हटके आणि लोकांच्या गरजेची आयडीयाची (Idea) कल्पना लढवली तरच स्टार्टअप उद्योगात तुम्हाला मजल मारता येते. स्टार्टअप कंपनी (Startup Company) सुरु करणे येड्यागबाळ्याचे काम नाही. स्टार्टअपसाठी गुंतवणुकदारांच्या (Investor) खिश्यातून रक्कम काढण्यासाठी तुमची नाविन्यपूर्ण कल्पना (Innovative Idea) दमदार असावी लागते. असा निधी उभारणे सोप्पं नसतं. जास्त निधी (Funding) उभारण्यासाठी आणि मुल्यांकन (Valuation) वाढविण्याच्या नादात कंपन्या नको ती चूक करतात, उद्दिष्टांपासून भरकटतात. अशा उद्योन्मुख उद्योजकांसाठी आरपीजी इंटरप्राईजेसचे मुख्य हर्ष गोयनका यांनी यशाचा कानमंत्र दिला आहे. त्यांनी बाकायदा ट्विट करत या तरुणांना भविष्यातील या दहा चूका न करण्याचा अनाहूत सल्ला दिला आहे. ज्यांना भविष्यात त्यांच्या उद्योगांना उच्चत्तम पातळीवर घेऊन जायचे आहे, त्यांना गोयनका यांचे सल्ले पथदर्शक ठरतील. पुढच्याला ठेचा मागचा शहाणा या म्हणीप्रमाणे उद्योन्मुख तरुणांसाठी हे अनुभवाचे बोल भविष्यातील अनेक चूका टाळण्यासाठी फायद्याची ठरेल. हा कार्यगीता मंत्र गाठीशी बांधला तर वेळ आणि पैसा दोन्ही वाचून नवउद्योजक उत्तुंग भरारी घेऊ शकतील.

जाऊ नका चुकाच्या गावा

गोयनका यांनी ट्विटमध्ये एक ग्राफ शेअर केला आहे. आणि त्याखाली एक छायाचित्र परिचय ओळ (caption) लिहिली आगहे. टॉप 10 स्टार्टअप मिस्टेक्स (Top 10 Startup Mistakes) अशा मथळ्याखाली त्यांनी हा ग्राफ समायोजीत केला आहे. बाजाराचा नीट अभ्यास करुन बाजारात उतरा, लोकांचे नावडते उत्पादन घेऊन बाजारात उतरला तर तो आत्मघात ठरेल असा मंत्र आरपीजी इंटरप्राईजेसचे हर्ष गोयनका यांनी नवीन स्टार्टअप कंपनी सुरु करणा-या तरुणांना दिला आहे. चुकीच्या माणसांची निवड आणि नियुक्ती, ग्राहकांऐवजी गुंतवणुकदारांच्या मागे पळणे, मुख्य कंपनी प्रवर्तकांच्या हाती वाजवी रक्कम नसणे, गरजेपेक्षा अधिक पैसा खर्च करणे, सहायता मागण्यासाठी लाजणे आणि सर्वात मोठी चूक म्हणजे समाज माध्यमांकडे दुर्लक्ष करणे या चूका उदयन्मुख उद्योजकाला मागे ओढू शकतात. त्यामुळे या चूका टाळण्याचा मंत्र गाठीशी बांधला तर तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचून तुम्ही योग्य दिशने आगेकूच कराल.

हे सुद्धा वाचा

यांनी गाडले किर्तीचे झेंडे

ब्ल्यू कॉलर वर्कर्ससाठी काम करणारे Vahan, जगातील पहिला ओपन मार्केट फ्रंट मॅनेजमेंट प्लॅटफॉर्म Pandocorp, प्लांट प्रोटीन बेस्ड इनग्रेडिएंट इनोवेटर Proeon, आशिया खंडातील पहिला अर्थव्यवस्थेचा प्रतिनिधी Recykal आणि तंत्रज्ञानाधारित आर्थिक प्लॅटफॉर्म Smartcoin या भारतीय स्टार्टअपने वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या टेक्नॉलॉजी पायोनिअर्स कम्युनिटीमध्ये स्वतःच्या किर्तीचा डंका वाजविला आहे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.