Ratan Tata : भारतातील आधुनिक कर्ण! सर्वात ‘दानशूर’ उद्योगपती, रतन टाटांसह अझीम प्रेमजींपर्यंत अनेकांचा नंबर, सढळ हाताने केली मदत

Ratan Tata : HCL टेक्नॉलॉजीजचे संस्थापक शिव नाडर भारतातील सर्वात मोठे दानशूर व्यक्ती आहे. दानशूर उद्योगपतींच्या यादीत अझीम प्रेमजी, रतन टाटा आणि इतर अनेक उद्योजकांची नावे आहेत. त्यांनी सामाजिक कार्यासाठी खारीचा नाही तर मोठा वाटा उचलला आहे.

Ratan Tata : भारतातील आधुनिक कर्ण! सर्वात 'दानशूर' उद्योगपती, रतन टाटांसह अझीम प्रेमजींपर्यंत अनेकांचा नंबर, सढळ हाताने केली मदत
Follow us
| Updated on: Mar 05, 2023 | 4:53 PM

नवी दिल्ली : भारतातील उद्योगपती (Industrialist) व्यवसायसोबतच सामाजिक कार्यातही आग्रेसर आहे. त्यांनी शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरण क्षेत्रात मोठे कार्य केले आहे. त्यांच्या कमाईतील मोठा हिस्सा त्यांनी या कार्यासाठी सढळ हाताने वाटला आहे. फोर्ब्सच्या दानशूर (Philanthropic) भारतीय उद्योगपतींच्या यादीत अनेक मोठ्या उद्योगपतींची नावे आहेत. 2022 मध्ये एकूण 15 दानशूर उद्योगपतींनी 100 कोटी रुपयांपेक्षा अधिकचे वार्षिक दान केले आहे. तर 20 उद्योगपतींनी 50 कोटी रुपयांचे तर 43 यांनी 20 कोटी रुपयांपेक्षा अधिकची रक्कम सढळ हाताने सामाजिक कार्यासाठी वाटली आहे.

अब्जाधीश आणि HCL टेक्नॉलॉजीजचे संस्थापक शिव नाडर भारतातील सर्वात मोठे दानशूर व्यक्ती आहे. फोर्ब्सनुसार त्यांच्या शिव नाडर फाऊंडेशनने (Shiv Nadar Foundation) जवळपास सर्वच क्षेत्रात भरीव कार्य उभारले आहे. त्यांनी काही दशकात जवळपास 1.1 अब्ज डॉलरची संपत्ती दान केली आहे. 2022 मध्ये त्यांनी जवळपास 1,161 कोटी रुपयांचे दान केले आहे. शिक्षणासाठी यातील मोठा हिस्सा वापरण्यात आला आहे. त्यांच्या फाऊंडेशनच्या ट्रस्टीमध्ये त्यांची पत्नी किरण नाडर, मुलगी रोशनी नाडर मल्होत्रा, जावाई शिखर मल्होत्रा यांचा समावेश आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी हे पण दान करण्यात अग्रेसर आहेत. 2022 मध्ये जवळपास 411 कोटी रुपये त्यांनी दान केले आहे. यातील मोठी रक्कम त्यांनी शिक्षणासाठी दान केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, कोविड-19 महामारीच्या दुसऱ्या लाटेत रिलायन्सने एका दिवसात 1000 टन ऑक्सिजनचे उत्पादन केले आणि फ्रंटलाईन वर्कर्ससाठी भोजनाची व्यवस्था केली. त्यासाठी 8 कोटी रुपयांची सढळ हाताने मदत केली.

हे सुद्धा वाचा

रतन टाटा यांचे नाव तर जगभरात त्यांच्या सामाजिक कार्य आणि देशप्रेमासाठी ओळखले जाते. आपल्या संपत्तीतील मोठ हिस्सा त्यांनी सामाजिक कार्यासाठी दान केला आहे. 1919 मध्ये टाटा ट्रस्टची (Tata Trust) स्थापना करण्यात आली. त्यावेळी 80 लाख रुपये दान करण्यात आले. टाटा ट्रस्ट ही भारतातील सर्वात जुनी सामाजिक संस्था आहे. या संस्थेमार्फत अनेक मोठ्या कामांसाठी सढळ हाताने दान देण्यात येते.

एडलगिव हुरुन इंडिया यांच्यानुसार, अझीम प्रेमजी यांनी 2022 मध्ये 484 कोटी रुपयांचे दान केले आहे. अझीम प्रेमजी हे विप्रो लिमिटेडचे मालक आहेत. रिपोर्टसनुसारक अझीम प्रेमजी फाऊंडेशनचे मूल्य 21 अब्ज डॉलर म्हणजे 1,73,747 कोटी रुपये आहे. 2019 मध्ये त्यांनी 52,750 कोटींचे शेअर त्यांच्या फाऊंडेशनला दान केले. त्यामाध्यमातून गरीबांचे कल्याण आणि धार्मिक कार्यावर खर्च करण्यात येतो.

गौतम अदाणी यांनी 60,000 कोटी रुपये (7.7 दशलक्ष डॉलर) धर्मादाय कार्यासाठी देण्यासाठीचे अभिवचन दिले आहे. अदाणी यांना फोर्ब्सने त्यांच्या यादीत स्थान दिले आहे. अडाणी यांनी केलेले दान आरोग्य सेवा, शिक्षा आणि कौशल्य विकास कामांवर खर्च करण्यात येणार आहे. हा निधी अडाणी फाऊंडेशन यांच्या माध्यमातून खर्च करण्यात येणार आहे. हे फाऊंडेशन 1996 साली स्थापन करण्यात आले होते. 60 वर्षांच्या गौतम अदाणी यांचा समूह हा पोर्ट ऑपरेटर म्हणून अग्रेसर आहे. ऊर्जा, रिटेलसह अनेक उद्योगात या समूहाची मालकी आहे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.