Share Market FPI : बजेटपूर्वीच परदेशी पाहुण्यांचा अविश्वास! या निर्णयामुळे शेअर बाजाराला ताप

Share Market FPI : परदेशी पाहुण्यांनी बजेटपूर्वीच भारतीय बाजारावर अविश्वास दाखविल्याने चिंतेचे वातावरण आहे.

Share Market FPI : बजेटपूर्वीच परदेशी पाहुण्यांचा अविश्वास! या निर्णयामुळे शेअर बाजाराला ताप
Follow us
| Updated on: Jan 29, 2023 | 5:26 PM

नवी दिल्ली : परदेशी पाहुण्यांनी बजेटपूर्वीच भारतीय शेअर बाजारावर (Share Market) अविश्वास दाखविला आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी, मुद्दे यांचा परिणाम तर आहेच. पण भारतीय बाजारातही त्यांना राम सपडत नसल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते.  या जानेवारी महिन्यात परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPI) शेअर बाजारातून 17,000 कोटी रुपये काढले आहेत. चीनच्या शेअर बाजाराचं आकर्षण, भारतीय अर्थसंकल्पाविषयीचे (Union Budget 2023) ठोकताळे आणि अमेरिकने केंद्रीय बँक, फेडरल रिझर्व्हच्या धोरणाविषयी सतर्कतेमुळे त्यांनी हा पाऊल टाकले आहे. 27 जानेवारीपर्यंत एफपीआयने बाजारातून 17,023 कोटी रुपयांची विक्री केली आहे. अर्थात शेअर बाजारातून पैसा काढून घेतला आहे. या महिन्यात एफपीआयाने कर्ज आणि बॉंडमध्ये 3,685 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. भारतासारखंच इंडोनेशियाच्या बाजारावरही परदेशी पाहुण्यांनी अविश्वास दाखवला आहे.

बजेटपूर्वीच गुंतवणूकदार सतर्क झाले आहे. दुसरीकेड अमेरिकन फेडरल रिझर्व्हची बैठक आहे. त्यात पुन्हा कडक धोरण स्वीकारण्याची चर्चा असल्याने एफपीआयने विक्रीचा धडका लावला. 31 जानेवारी रोजी फेडरल रिझर्व्हची बैठक होत आहे.

निर्बंध शिथिल झाल्याने परदेशी गुंतवणूकदारांनी चीनच्या बाजारावर लक्ष केंद्रित केले आहे. भारत आणि इंडोनेशियातील बाजारातून रक्कम काढून परदेशी पाहुणे हा पैसा चीन, हॉंगकाँग, दक्षिण कोरिया आणि थायलंडमध्ये गुंतवत आहेत.

हे सुद्धा वाचा

यापूर्वी एफपीआयने डिसेंबर महिन्यात भारतीय बाजारावर विश्वास दाखविला होता. डिसेंबर 2022 मध्ये त्यांनी 11,119 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. तर नोव्हेंबर 2022 मध्ये 36,239 कोटी रुपये ओतले होते. गेल्या वर्षी 2022 मध्ये परदेशी पाहुण्यांनी भारतीय शेअर बाजारात 1.21 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती.

गेल्या दोन वर्षांत परदेशी पाहुण्यांनी विक्रीचा सपाटा लावला. सलग 9 महिने परदेशी पाहुण्यांनी बाजारातून निव्वळ पैसे काढले. तर जुलैमध्ये FPIs ने निव्वळ खरेदी केली. 2022 मधील ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात त्यांनी 14,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPIs) जुलैमध्ये सुमारे 5,000 कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक केली होती.

या अगोदर गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून परदेशी पाहुणे सातत्याने त्यांच्याकडील शेअरची विक्री करत होते. ऑक्टोबर 2021 ते जून 2022 दरम्यान, त्यांनी भारतीय इक्विटी मार्केटमध्ये तब्बल 2.46 लाख कोटी रुपये काढले.

जगातील केंद्रीय बँकांचे व्याजासंबंधीचे कडक धोरण, आक्रमक व्याजवृद्धी, कच्चा तेलातील चढउतार, रशिया-युक्रेन युद्ध यामुळे एफपीआयने अनेकदा आक्रमक होत भारतीय बाजारातून रक्कम काढून घेतली.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.