Ex-Dividend Stocks : कोणाला लागेल ही लॉटरी! या स्टॉकमध्ये केली होती गुंतवणूक?

Ex-Dividend Stocks : अनेक गुंतवणूकदारांचे नशीब उघडणार आहे. त्यांना लॉटरी लागणार आहे. अनेक दिग्गज कंपन्या एक्स डिव्हिडंडची घोषणा करणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना कमाई करता येईल.

Ex-Dividend Stocks : कोणाला लागेल ही लॉटरी! या स्टॉकमध्ये केली होती गुंतवणूक?
Follow us
| Updated on: Jul 30, 2023 | 4:36 PM

नवी दिल्ली | 30 जुलै 2023 : अनेक कंपन्यांचे निकालसत्र सुरु झाले आहे. कंपन्यांचा लेखाजोखा सर्वांसमोर मांडण्यात येत आहे. काही लंबी रेस के घोडे ठरले आहे तर काही भरवशाच्या म्हशीने टोणगा दिला आहे. तर निकालाचे सत्र तेजीत आहेत. काही कंपन्या निकालासोबतच डिव्हिडेंड देण्याची घोषणा करत आहेत. हजारो कंपन्यांनी पहिल्या तिमाहीतील निकाल तर घोषीत केलेच पण त्यांनी लाभांशाची (Ex-Dividend Stocks) पण घोषणा केली आहे. सोमवार पासून सुरु होणाऱ्या आठवड्यात अनेक कंपन्या त्यांचे निकाल आणि लाभांशाची घोषणा करतील. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांचे नशीब उघडणार आहे. त्यांना लॉटरी लागणार आहे. गुंतवणूकदारांना कमाई करता येणार आहे.

कमाईची मोठी संधी

डिव्हिडंड शेअर्ससाठी एक्स डिव्हिडेंड होण्याची तारीख अंतिम असते. नवीन आठवड्यात अनेक शेअर एक्स डिव्हिडंड (Ex-Dividend Stocks) होत आहे. यामध्ये L&T, बाटा इंडिया आणि मारुती सुझुकी यांचा समावेश आहे. येत्या आठवड्यात गुंतवणूकदारांना कमाईची मोठी संधी मिळेल.

हे सुद्धा वाचा

8 कंपन्यांमुळे लॉटरी

आठवड्याच्या पहिल्या दिवशी 31 जुलै, सोमवारी 8 कंपन्यांचे शेअर एक्स-डिव्हिडेंड होत आहे. यामध्ये ब्रिगेड इंटरप्राईजेस लिमिटेड, ईआयएच असोसिएशटेड होटल्स लिमिटेड, फेअरकेम ऑर्गेनिक्स लिमिटेड, इगारशी मोटर्स इंडिया लिमिटेड, जिंदल वर्ल्डवाईड लिमिटेड, वोल्टॅम्प ट्रान्सफॉर्मर्स लिमिटेड, व्हीआरएल लॉजिस्टिक्स लिमिटेड यांचा यामध्ये समावेश आहे.

1 ऑगस्ट

मंगळवारी एकूण 9 शेअर एक्स-डिव्हिडेंड होत आहे. यामध्ये डीबी कॉर्प लिमिटेड, एक्साईड इंडस्ट्रीज लिमिटेड, जे.के. सीमेंट लिमिटेड, ओरिएंट पेपर अँड इंडस्ट्रीज लिमिटेड, रेजोनेंस स्पेशलिटीज, रूपा अँड कंपनी, शारदा क्रॉपकेम लिमिटेड, शेट्रॉन लिमिटेड आणि एसआरएफ लिमिटेड यांचा समावेश आहे.

2 ऑगस्ट

आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी एकूण 18 शेअर्समधून कमाई होईल. यामध्ये एबीएम नॉलेजवेअर, एडोर वेल्डिंग लिमिटेड, बजाज कंझ्युमर केअर लिमिटेड, बीडीएच इंडस्ट्रीज लिमिटेड, सेंटम इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, क्रिसिल लिमिटेड, डेटा पॅटर्न्स (इंडिया), डायनेमिक केबल्स लिमिटेड, ईआईएच लिमिटेड, हॉकिन्स कुकर्स लिमिटेड, लार्सन अँड टुब्रो लिमिटेड, लक्ष्मी ऑटोमॅटिक लूम वर्क्स लिमिटेड , मेनन पिस्टन लिमिटेड, सह्याद्रि इंडस्ट्रीज लिमिटेड, शेअर इंडिया सिक्योरिटीज लिमिटेड, शेअर इंडिया सिक्युरिटीज लिमिटेड, स्टाईरेनिक्स परफॉर्मेंस मटेरियल्स लिमिटेड आणि टी डी पॉवर सिस्टम्स लिमिटेड यांचा समावेश आहे.

3 ऑगस्ट

आठवड्याच्या चौथ्या दिवशी 35 शेअर्स गुंतवणूकदारांना फायदा मिळवून देतील. एडीएफ फूड्स लिमिटेड, एजिस लॉजिस्टिक्स लिमिटेड, अल्बर्ट डेव्हिड लिमिटेड, एलेम्बिक लिमिटेड, एएमजे लँड होल्डिंग्स लिमिटेड, अवंती फीड्स लिमिटेड, बाटा इंडिया लिमिटेड, चेंबॉन्ड केमिकल्स लिमिटेड, चोलामंडलम फायनेंशियल होल्डिंग्स लिमिटेड, क्लीन सायन्स अँड टेक्नोलॉजी लिमिटेड, कोफोर्ज लिमिटेड, डिसा इंडिया लिमिटेड , एमके ग्लोबल फायनेंशियल सर्विसेज लिमिटेड, ईएसएबी इंडिया लिमिटेड, ग्रॅन्यूल्स इंडिया लिमिटेड, ग्रीव्स कॉटन लिमिटेड, हॅनीवेल ऑटोमेशन इंडिया लिमिटेड, होंडा इंडिया पावर प्रोडक्ट्स लिमिटेड, आईव्हीपी लिमिटेड, केलटेक एनर्जीज लिमिटेड, मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड, मॅट्रिमोनी डॉट कॉम लिमिटेड, ओरिएंटल एरोमॅटिक्स लिमिटेड , पुदुमजी पेपर प्रोडक्ट्स लिमिटेड, द रॅमको सीमेंट्स लिमिटेड, रॅमको इंडस्ट्रीज लिमिटेड, एस एच केलकर एंड कंपनी लिमिटेड, श्रेयांस इंडस्ट्रीज लिमिटेड, श्रेयांस इंडस्ट्रीज लिमिटेड, स्टार हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, टिप्स इंडस्ट्रीज लिमिटेड, यूनाइटेड ब्रुअरीज लिमिटेड, युपीएल लिमिटेड, उषा मार्टिन लिमिटेड, एक्सपीआरओ इंडिया लिमिटेड यांचा समावेश आहे.

4 ऑगस्ट

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी या कंपन्या मालामाल करती. 39 शेअर्स एक्स डिव्हिडेंड जाहीर करण्याची शक्यता आहे. यामध्ये आदित्य बिर्ला सन लाईफ एएमसी, एडीओआर फोनटेक लिमिटेड, एडवांस्ड एंजाइम टेक्नोलॉजीज लिमिटेड, अजंता फार्मा लिमिटेड, अजमेरा रिअल्टी एंड इंफ्रा इंडिया, आंध्रा पेपर लिमिटेड, अपार इंडस्ट्रीज लिमिटेड, एस्ट्रल लिमिटेड, बायर क्रॉपसाईंस, बर्जर पेंट्स इंडिया, चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन, चेविओट कंपनी लिमिटेड, डालमिया भारत शुगर एंड इंडस्ट्रीज लिमिटेड, डॉल्फिन रबर्स, एम्बी इंडस्ट्रीज, ईपीएल लिमिटेड, गोलकुंडा डायमंड्स एंड ज्वॅलरी, ग्राउर एंड वील (इंडिया) लिमिटेड, ग्रिंडवेल नॉर्टन लिमिटेड, हरक्यूलिस होइस्ट्स लिमिटेड, आईपी रिंग्स लिमिटेड, जेटीएल इंडस्ट्रीज लिमिटेड, कल्याण ज्वॅलर्स इंडिया , किर्लोस्कर ऑईल इंजन, किर्लोस्कर इंडस्ट्रीज लिमिटेड, कोटक महिंद्रा बँक लिमिटेड, माइंडटेक (इंडिया) लिमिटेड, मुंजाल शोवा, नवकार अर्बनस्ट्रक्चर लिमिटेड, प्राईमा प्लास्टिक्स लिमिटेड, रामइन्फो लिमिटेड, रूट मोबाइल लिमिटेड, सांघवी मूवर्स लिमिटेड, स्ट्राइड्स फार्मा साइंस, सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेड , सिम्फनी लिमिटेड, टिमकेन इंडिया लिमिटेड, विष्णु केमिकल्स लिमिटेड, व्हीएसटी इंडस्ट्रीज, विम प्लास्ट लिमिटेड या कंपन्यांचा समावेश आहे.

(विशेष सूचना : ही शेअर आणि त्यांच्यासंबंधीची माहिती आहे. बाजारातील गुंतवणूक बाजारातील जोखिमेअधीन आहे. गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा. TV9 मराठी कोणालाही गुंतवणुकीचा सल्ला देत नाही.)

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.