US Stocks : घर बसल्या अमेरिकन शेअर बाजारात करा चढाई, खरेदी करा ॲप्पल-गुगलचे शेअर

US Stocks : भारतीय शेअर बाजाराने कात टाकली आहे. डिजिटलायझेशनमुळे खूप बदल झाला आहे. तंत्रज्ञान हाती आल्याने अगदी सहज कुठूनही मोबाईल ॲपच्या माध्यमातून ट्रेडिंग करता येते. आता तर तुम्ही अमेरिकेतील शेअर बाजारात ही घर बसल्या ट्रेडिंग करु शकता.

US Stocks : घर बसल्या अमेरिकन शेअर बाजारात करा चढाई, खरेदी करा ॲप्पल-गुगलचे शेअर
Follow us
| Updated on: Jun 25, 2023 | 3:46 PM

नवी दिल्ली : शेअर बाजार (Share Market) हा पैशांची खाण आहे. अभ्यास आणि नियोजनाआधारे अनेक जण करोडपती झाले आहे. पण कुठे आणि कधी गुंतवणूक करायची हे सूत्र त्याला कळायला हवे. कंपन्याचा अभ्यास, त्यांच्याशी संबंधित घडामोडी, बाजाराची चाल याविषयी अपडेट राहता आले तर तुम्हाला शेअर बाजारातून कमाई करता येते. भारतीय शेअर बाजाराने कात टाकली आहे. डिजिटलायझेशनमुळे खूप बदल झाला आहे. तंत्रज्ञान हाती आल्याने अगदी सहज कुठूनही मोबाईल ॲपच्या माध्यमातून ट्रेडिंग करता येते. आता तर तुम्ही अमेरिकेतील शेअर बाजारात ही घर बसल्या ट्रेडिंग करु शकता. जागतिक कंपन्यांमध्ये गुंतवणूक करुन फायदा मिळवू शकता.

असे करा ट्रेडिंग अमेरिकन बाजारात ट्रेडिंगचा (US Stock Trading) फायदा घ्यायचा असेल तर म्युच्युअल फंड हा सर्वात चांगला पर्याय आहे. अनेक आंतरराष्ट्रीय म्युच्युअल फंड स्कीममध्ये (International Mutual Fund Scheme) गुंतवणूक करता येईल. त्याआधारे तुम्ही पोर्टफोलिओत अमेरिकन शेअरचा समावेश करु शकता. याशिवाय भारतीय गुंतवणूकदारांसमोर एक्सचेंज ट्रेडेड फंडचा (Exchange Traded Fund) पर्याय आहे. भारतीय गुंतवणूकदार ईटीएफ (ETF) वा फंड ऑफ फंड्स (Fund Of Funds) या माध्यमातून अमेरिकन शेअर्समध्ये ट्रेड करु शकता.

एनएसईचा हा उपक्रम महत्वाचा तुम्हाला अमेरिकन शेअर बाजारात थेट ट्रेड करायचा असेल तर त्याची पण सोय आहे. एनएसई इंटरनॅशनल एक्सचेंज (NSE International Exchange) त्यासाठी मदत करेल. देशातील सर्वात मोठा शेअर बाजार एनएसई च्या (NSE) मदतीने तुम्ही टॉप अमेरिकन शेअरमध्ये ट्रेड करु शकता. त्यासाठी एनएसईने गेल्या वर्षी मार्च महिन्यात अमेरिकेतील टॉप 8 कंपन्यांसह सुरुवात केली.

हे सुद्धा वाचा

या कंपन्यांमध्ये मिळते सुविधा एनएसईच्या या सुविधेचा तुम्ही लाभ घेऊ शकता. जगातील सर्वात मोठी कंपनी ॲप्पल, गुगलची मुळ कंपनी अल्फाबेट, मायक्रोसॉफ्ट, ॲमेझॉन, फेसबुकची मुळ कंपनी मेटा इंक, नेटफ्लिक्स, वॉलमार्ट आणि एलॉन मस्क यांची इलेक्ट्रिक व्हेईकल कंपनी टेस्लाच्या शेअरची खरेदी-विक्री करता येईल.

एनएसईची सुविधा एनएसईने काही दिवसांपूर्वी गिफ्ट सिटी (Gift City) मध्ये एनएसई आयएफएससी (NSE IFSC) नावाने आंतरराष्ट्रीय एक्सचेंज (NSE International Exchange) उपकंपनी तयार केली होती. त्याआधारे अमेरिकन कंपन्यांच्या शेअरच्या बदल्यात डिपॉझिटरी रिसीट (Depository Receipt) तयार करण्यात येते.

करावे लागेल हे काम या सुविधेचा लाभ घेण्यासाठी सर्वात अगोदर गुंतवणूकदारांना एनएसई आयएफएससी मध्ये स्वतंत्र डीमॅट खाते (Demat Account) उघडावे लागते. एका भारतीय गुंतवणूकदाराला अमेरिकन कंपन्यांमध्ये जास्तीत जास्त 1.9 कोटी रुपये गुंतवणूक करता येते. या बाजारात सोमवार ते शुक्रवारपर्यंत रात्री 8:30 ते दुसऱ्या दिवशी दुपारी 2:30 वाजे पर्यंत ट्रेडिंग करता येते.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.