Demat Account | बाजाराची दिशा ठरवणार सर्वसामान्य गुंतवणूकदार, डी-मॅट खात्यांची संख्या इतके कोटी?
Demat Account | देशात कोविड -19 दाखल होण्यापूर्वी म्हणजेच मार्च 2020 मध्ये शेअर बाजारात 4.09 कोटी डीमॅट खाती होती. त्यानंतर अवघ्या अडीच वर्षात हा आकडा 6 कोटींवर पोहचला.
Demat Account | शेअर बाजारावर (Share Market)आता सर्वसामान्य नागरीकांचा विश्वास वाढत असल्याचे चित्र आहे. बाजारात प्रवेशासाठी डी-मॅट खाते (D-Mat Account) असणे आवश्यक आहे. बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांचे (Investors) प्रमाण कित्येक पटीने वाढले आहे. डी-मॅट खात्याचा ट्रेंड वाढला आहे. आसाम, अरुणाचल प्रदेश, बिहार, नागालँड, ओडीशा या राज्यातील सर्वसामान्य गुंतवणूकदारांनीही शेअर बाजाराचा रस्ता धरला आहे. देशातील डी-मॅट खातेदारांच्या संख्येने 10 कोटींचा टप्पा पार केला आहे.
देशात 10 कोटी डी-मॅट खाते
National Securities Depository Limited (NDSL) and Central Depository Services (CDSL) यांनी विषयीची आकडेवारी प्रसिद्द केली आहे. त्यानुसार, देशात कोविड -19 दाखल होण्यापूर्वी म्हणजेच मार्च 2020 मध्ये शेअर बाजारात 4.09 कोटी डीमॅट खाती होती. त्यानंतर अवघ्या अडीच वर्षात हा आकडा 6 कोटींवर पोहचला.आता हा आकडा दहा कोटींच्या पुढे गेला आहे.
ही आहेत कारणे
कोरोना महामारीच्या काळात ऑनलाईन काम करण्याचा प्रकार वाढला. शेअर बाजारात त्यादरम्यान तेजीचे सत्र आले. वर्क फ्रॉम होम, डी-मॅट खाते उघडण्याची सहज प्रक्रिया यामुळे सर्वसामान्य गुंतवणूकदार शेअर बाजाराकडे आकर्षित झाला.
बाजाराची दिशाही ठरवतो
काही दिवसांपासून शेअर बाजाराची दिशा ठरवण्यातही सर्वसामान्य गुंतवणूकदारांचा मोठा हात असल्याचे स्पष्ट होत आहे. अनेक सत्रात हे चित्र तीव्रतेने समोर आल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
NSDL कडील मूल्यात वाढ
CDSL चे MD & CEO नेहल वोरा (Nehal Vora) यांनी हा आकडा माईलस्टोन असल्याचे सांगितले. तर दोन वर्षांत डी-मॅट खाती वाढली आहेत. यामुळे NSDL चे कस्टडी व्हॅल्यू एप्रिल 2020 मध्ये 174 लाख कोटी रुपयावरुन 320 लाख रुपयांवर पोहचले आहे.
बाजारातील तेजीचा फायदा
बाजारातील तज्ज्ञांच्या अदाजानुसार, बाजारातील तेजी नवीन गुंतवणूकदारांना आकर्षित करेल. नवीन गुंतवणूकदार झपाट्याने वाढतील. मध्यंतरीच्या वाईट काळानंतर भारतीय बाजार पुन्हा तेजीच्या दिशेने घौडदौड करत आहे.
गुंतवणूकदारांनी फिरवली पाठ
जून महिन्यात बाजार दणकावून आपटला. त्यामुळे नवीन गुंतवणूकदारांनी बाजारापासून चार हात लांब राहणे पसंत केले. त्यामुळे डी-मॅट खाते उघडण्याच्या प्रक्रियेला खीळ बसली. 16 महिन्यांच्या नीचांकीस्तरावर हा आकडा पोहचला. त्यानंतर पुन्हा गुंतवणूकदारांची पावले बाजाराकडे वळत आहेत.
निम्न शहरातील मोठा वर्ग
YES Securities चे MD & CEO ई प्रशांत प्रभाकरन (E Prasanth Prabhakaran) यांच्या मते शेअर बाजाराला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. आता केवळ मेट्रो शहरातीलच नव्हे तर निम्न शहरातील गुंतवणूकदारही शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी इच्छुक असल्याचे ते म्हणाले.