Crorepati Club : देशात श्रीमंतांची मांदियाळी! 1 कोटींपेक्षा कमाईदारांची संख्या वाढली

Crorepati Club : कोरोना महामारी आणि लॉकडाऊनच्या मोठ्या अडथळ्यांना देशाने तोंड दिले. पण या तीन वर्षांत भारतात श्रीमंतांची मोठी संख्या वाढली आहे. देशात करोडपती करदात्यांची संख्या वाढल्याचे आयकर खात्याच्या डाटावरुन समोर येत आहे.

Crorepati Club : देशात श्रीमंतांची मांदियाळी! 1 कोटींपेक्षा कमाईदारांची संख्या वाढली
Follow us
| Updated on: Aug 20, 2023 | 6:50 PM

नवी दिल्ली | 20 ऑगस्ट 2023 : गेल्या काही वर्षांत देशातील श्रीमंतांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सर्वच काही थांबले होते. कोरोनाचे रौद्र रुप संपूर्ण विश्वाने अनुभवले. भारतासाठी त्याचा अनुभव वेगळा नव्हता. यामुळे अर्थचक्र जवळपास थांबले होते. पण त्यावर भारताने लस उत्पादन करुन झपाट्याने आगेकूच केली. कोरोनानंतर सर्वच क्षेत्रात पुन्हा तेजीचे वारे आले. भारतात नवश्रीमतांची (Rich Taxpayers) संख्या वाढली. करोडपती करदात्यांची संख्या जास्त आहे. आयकर खात्याच्या आकड्यांनी ही बाब समोर आणली आहे. पूर्वीपेक्षा करोडपती करदात्यांची संख्या वाढल्याचे आकडेवारी सांगते. या तीन वर्षांत करोडपतीची संख्या झपाट्याने वाढली आहे. भारतात स्टार्टअपचे प्रमाण वाढले आहे. युनिकॉर्नचे प्रस्थ झाले आहे. अर्थव्यवस्था (Economy) झेपावत आहे, त्याचा हा परिणाम आहे.

करोडपती करदाते

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) गेल्या तीन वर्षांतील आकडेवारी समोर आणली आहे. त्यामध्ये नवश्रीमंतांची संख्या झपाट्याने वाढल्याचे दिसून येते. गेल्या 3 वर्षांत 57,591 नवीन करोडपती करदाते समोर आले आहेत. त्यांची कमाई एक कोटींहून अधिक आहे. नवीन बदलांचा हा परिणाम असल्याचे अनेकांचे मत आहे.  तज्ज्ञांच्या मते कर भरण्याविषयी केंद्र सरकारने अनेक सुविधा दिल्या आहेत.  उत्पन्न वाढल्याने तसेच नवउद्योजकांमुळे, स्टार्टअपमुळे नवश्रीमंतांची फौज उभी झाली आहे.

हे सुद्धा वाचा

काय सांगते आकडेवारी

  1. कोविड पूर्वकाळात आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये करदात्यांची संख्या 1,11,939 होती
  2. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये ही संख्या कमी, 81,653 इतकी होती
  3. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये करोडपती करदात्यांची संख्या वाढून 1,69,890 वर पोहचली
  4. आर्थिक वर्ष 2016-17 मध्ये श्रीमंत करदात्यांची संख्या 68,263 इतकी होती

एकदाच संख्या होती कमी

गेल्या तीन वर्षांत कोरोनाचा परिणाम दिसून आला. देशात काही महिने लॉकडाऊन होता. देशातील कारखाने, उद्योग आणि उत्पादन होणारी ठिकाणं जवळपास ठप्प होती. अनेक जणांनी रोजगार गमावले होते. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये एक कोटींहून अधिकची कमाई करणाऱ्या करदात्यांची संख्या कमी म्हणजे 81,653 इतकी झाली होती.

या कारणांमुळे वाढले कोट्याधीश करदाते

कोट्याधीश करदात्यांची संख्या झपाट्याने वाढण्यामागे काही कारणे आहेत. कर तज्ज्ञांच्या मते गेल्या काही वर्षांपासून करदाते, उत्पन्न आणि कर यांचे आकडे संकलीत करण्याची प्रक्रिया पारदर्शी आणि प्रभावी झाली आहे. शेअर बाजार तेजीत आहे. स्टार्टअप कंपन्यांचे वारे वाहत आहेत. पगारात वाढ झाली आहे. तर ऑनलाईन माध्यमातून कमाई करणारे पण झपाट्याने वाढले आहेत.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.