Cabinet : पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त? मोदी सरकारचा अॅक्शन प्लॅन, दिवाळी होणार का गोड?
Cabinet : ऐन दिवाळीत सरकार पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामागील कारण तरी काय आहे.
नवी दिल्ली : केंद्र सरकारने (Central Government) तेल कंपन्यांना (Oil Companies) मोठा दिलासा दिला आहे. त्यामुळे सरकार पेट्रोल-डिझेलच्या दरात (Petrol-Diesel Price) कपात करुन सर्वसामान्यांना दिवाळी भेट देणार असल्याच्या चर्चांना पेव फुटले आहे. सरकारचे धोरण आणि वाटचाल त्याच दिशेने असल्याचा तज्ज्ञांचा व्होरा आहे. अर्थात पेट्रोल-डिझेलच्या किंमती जोपर्यंत कमी होत नाही, तोपर्यंत यावर अधिक भाष्य करणे उचित ठरणार नाही.
केंद्र सरकारने तेल कंपन्यांना मोठा दिलासा दिला आहे. बुधवारी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत केंद्र सरकारने तेल कंपन्यांना मदतीचा हात पुढे केला आहे. महागड्या गॅसपासून ग्राहकांची सूटका व्हावी यासाठीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक घेण्यात आली.
या बैठकीत मोदी सरकारने तेल कंपन्यांसाठी मोठ्या पॅकेजची घोषणा केली. तेल कंपन्यांना एकरक्कमी 22 हजार कोटी रुपये देण्याचा निर्णय कॅबिनेटच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे तेल कंपन्यांची नुकसान भरपाईची ओरड कमी होण्याची शक्यता आहे.
पेट्रोलियम मंत्रालयाने यापूर्वी केंद्र सरकारकडे 30 हजार कोटी रुपयांच्या सबसिडीची मागणी केली होती. कंपन्यांनी केलेल्या दाव्यानुसार, घरगुती गॅसवर या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे. ही नुकसान भरपाई भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने मदत करण्याचे आवाहन कंपन्यांनी केले होते.
देशात CNG, PNG चे दर वाढले असले तरी, LPG गॅस दरवाढीला सध्या तरी ब्रेक लागला आहे. पण एकूणच दरवाढ प्रचंड वाढली आहे. या महिन्यात व्यावसायिक वापरासाठीच्या सिलिंडरच्या किंमती 25.50 रुपयांनी कमी झाल्या आहेत.
19 किलोग्रॅमच्या व्यावसायिक LPG सिलिंडरचा भाव 1885 रुपयांवरुन 1859.50 रुपये इतका झाला आहे. व्यावसायिक सिलिंडर पुरता विचार केला तर या वर्षात आतापर्यंत एकूण 494.50 रुपये प्रति सिलिंडर दर कपात झाली आहे. परंतु, घरगुती गॅसच्या किंमती 1053 रुपये प्रति सिलिंडर झाल्या आहेत.