Cryptocurrency | बिटकॉईन 23,000 डॉलरच्या पुढे तर Ether ही तेजीत, आभासी चलन आठवड्याच्या सुरुवातीला सुसाट

Cryptocurrency | क्रिप्टो मार्केटमध्ये बिटकॉईन आणि इथरची चलती आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच अभासी चलनाने सुसाट वेग पडकला आहे.

Cryptocurrency | बिटकॉईन 23,000 डॉलरच्या पुढे तर Ether ही तेजीत, आभासी चलन आठवड्याच्या सुरुवातीला सुसाट
क्रिप्टो करन्सीत पुन्हा तेजीImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 08, 2022 | 2:48 PM

Cryptocurrencies Prices News Today | आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी क्रिप्टो मार्केटमध्ये (Crypto Market) तेजी पाहायला मिळाली. जगातील सर्वात मोठी आणि प्रसिद्ध क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency)असलेला बिटकॉइन (Bitcoin) 23000 डॉलरच्या वर व्यापार करत होता. आज बिटकॉइनने 1 टक्क्याच्या वाढीसह 23,287 डॉलरवर व्यापार केला. 2022 च्या सुरुवातीपासून बिटकॉइनमध्ये 55 टक्के घसरण झाली होती. तरुण गुंतवणूकदारांचे यंदा या आभासी चलनाने तोंडचे पाणी पळवले होते. कोट्यवधी रुपयांच्या नुकसानीमुळे अनेकांनी या चलनातील व्यापाराकडे पाठ फिरवली होती. शेअर मार्केटपेक्षा ही मोठे नुकसान यंदा क्रिप्टो करन्सीमध्ये झाले. मात्र, गेल्या काही महिन्यांत बिटकॉइनचा व्यवहार 19 हजार डॉलर ते 24 हजार डॉलरच्या घरात झाल्याचे दिसून येत आहे.  गेल्या 24 तासांत एक्सआरपी(XRP), सोलाना(Solana), बीएनबी(BNB), लाइटकॉइन(Litecoin), चेनलिंक (Chain-link), टेथर (Tether), पोल्काडोट(Polka dot), ट्रॉन(Tron), अॅव्हॅलन्चे (Avalanche), स्टेलर, अॅपेकॉइन, युनिस्वॅप, पॉलिगॉन या शेअरमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या आभासी चलनाकडे गुंतवणुकीचा (Investment) एक पर्याय म्हणून तरुणाईचा विश्वास वाढल्याचे दिसून आले.

ईथरचे बिटकॉनच्या पाऊलावर पाऊल

तज्ज्ञांच्या मते, बिटकॉइनने 23 हजार डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. तसेच त्याला गुंतवणूकदारांचा सपोर्ट मिळत आहे. सध्या बिटकॉइनला 23,000 डॉलरच्या दरम्यान सपोर्ट मिळत असल्याने तो लवकरच 24,000 डॉलरचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे. आता ईथरनेही (Ether) नवी झेप घेतली असून या चलनाने 1700 डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाची क्रिप्टोकरन्सी असलेल्या ईथरमध्ये 2 टक्क्यांची वाढ झाली आहे. हे चलन सध्या 1,713 डॉलर्सवर व्यापार करत आहे. क्रिप्टो मार्केटमधील तेजीत ईथर 1,700 डॉलर वर पोहचला आहे.

शीबा इनू आणि डोजकॉइन

शीबामध्ये इनू 2 टक्क्यांनी वधारला आणि तो 0.0012 डॉलरवर व्यापार करत आहे. डोजकॉइन(Dogecoin) मध्येही 2 टक्क्यांची वाढ झाली आणि तो 0.06 डॉलरवर पोहचला आहे.

हे सुद्धा वाचा

तर इतर क्रिप्टोजची स्थिती अशी आहे

गेल्या 24 तासांत एक्सआरपी(XRP), सोलाना(Solana), बीएनबी(BNB), लाइटकॉइन(Litecoin), चेनलिंक (Chain-link), टेथर (Tether), पोल्काडोट(Polka dot), ट्रॉन(Tron), अॅव्हॅलन्चे (Avalanche), स्टेलर, अॅपेकॉइन, युनिस्वॅप, पॉलिगॉन या शेअरमध्ये वाढ झाली आहे.

1 लाख कोटींचे क्रिप्टो मार्केट कॅप

जागतिक क्रिप्टोकरन्सी मार्केटची मार्केट कॅप गेल्या 24 तासांत 2 टक्क्यांनी वाढले आहे. ते सध्या 1 लाख कोटी रुपयांच्यावर पोहचले आहे. त्याचे बाजार भांडवल 1.15 ट्रिलियन डॉलर इतके होते. नोव्हेंबर 2021 मध्ये जागतिक क्रिप्टो मार्केटची मार्केट कॅप सर्वोच्च म्हणजे 2.9 ट्रिलियन डॉलरवर होती. सध्या हा टप्पा गाठायला क्रिप्टो मार्केटला खूप कालावधी लागणार आहे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.