Mukesh Ambani : मोठी बातमी! कार उत्पादक कंपन्यांना रिलायन्सची लवकरच टक्कर, काय मुकेश अंबानी यांचा मास्टर स्ट्रोक

Mukesh Ambani : रिलायन्स उद्योग समूहाची भूक वाढली आहे. किराणा, बिव्हरेज आणि इतर अनेक क्षेत्रानंतर कंपनी आता थेट चारचाकीच्या बाजारपेठेत, ऑटो सेक्टरमध्ये धुमाकूळ घालण्याचा प्लॅन करतेय...

Mukesh Ambani : मोठी बातमी! कार उत्पादक कंपन्यांना रिलायन्सची लवकरच टक्कर, काय मुकेश अंबानी यांचा मास्टर स्ट्रोक
Follow us
| Updated on: May 11, 2023 | 7:49 PM

नवी दिल्ली : रिलायन्स उद्योग समूह (Reliance Group) आता वेगवान विस्ताराच्या दिशेने धावत आहे. अनेक क्षेत्रात या रिलायन्स लांब पल्ला गाठला आहे. गेल्या दोन वर्षांत कंपनीने अनेक दिग्गज ब्रँड खरेदी केले आहे. काही योजना पाईपलाईनमध्ये आहे. किराणा, बिव्हरेजसह वित्तीय संस्था आणि इतर क्षेत्रात रिलायन्सचा विस्तार होत आहे. जिओच्या माध्यमातून टेलिकॉम क्षेत्रात कंपनीचा दबदबा आहे. आता उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) रिलायन्सच्या माध्यमातून चारचाकी बाजारपेठेत धुमाकूळ घालण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी कंपनीने प्लॅन आखला आहे. बोलणी यशस्वी ठरली तर हा जागतिक कार उत्पादक (Four Wheeler) ब्रँड रिलायन्सच्या ताफ्यात असेल.

या कंपनीचा व्यवसाय येईल ताब्यात चीनची दिग्गज ऑटो कंपनी SAIC यांच्या मालकीची MG Motor भारतातील त्यांच्या व्यवसाय विक्री करण्याच्या तयारीत आहे. ही कंपनी ऑटो सेक्टरमधील दिग्गज कंपन्यांशी याबाबत चर्चा पण करत आहे. यामध्ये हिरो ग्रुप, प्रेमजी इनवेस्ट, जेएसडब्ल्यू ग्रुप यांचा समावेश आहे. यामध्ये आता रिलायन्सचे नाव जोडल्या गेले आहे. टाईम्स ऑफ इंडियाने गुरुवारी सूत्रांच्या आधारे याविषयीची माहिती दिली. यावर्षाच्या अखेरपर्यंत एमजी मोटर भारतातील त्यांच्या व्यवसायची विक्री करण्याच्या तयारीत आहे. याविषयीचा करार लवकरच होईल, अशी कंपनीला आशा आहे. सध्या एमजी मोटर्सला तात्काळ निधी गरज आहे. त्यामुळे कंपनी हा करार होण्यासाठी घाई करत आहे.

या केवळ चर्चा एमजी मोटर्सच्या व्यवस्थापनाने त्यासाठी खास मूल्यांकन ऑफर ठेवल्याचे बोलले जात आहे. पण यासर्व घडामोडींवर एमजी मोटर्सने मत व्यक्त केले आहे. रिलायन्स, हिरो ग्रुप, प्रेमजी इनवेस्ट, जेएसडब्ल्यू याविषयीचे वृत्त केवळ चर्चा असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

चीन कंपन्या अडचणीत भारत-चीन सीमा वादामुळे चीनच्या कंपन्या सध्या अडचणीत आहेत. त्यांना विविध गुंतवणुकीच्या अथवा इतर परवानग्यांसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. इंडस्ट्री सूत्रानुसार, कंपनी जवळपास 2 वर्षांपासून त्यांच्या मूळ कंपनीसाठी निधी जमविण्याचा प्रयत्न करत आहे. पण त्याला अद्याप सरकारकडून मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे फंड जमविण्यासाठी हा दुसरा पर्याय शोधण्यात आला आहे.

भारतीयकरणावर भर एमजी मोटर इंडियाचे सीईओ राजीव चाबा यांच्या मते, कंपनी देशातील वित्तीय संस्था, भागीदार आणि इतर स्वतंत्र व्यावसायिकांच्या माध्यमातून भारतीयकरणावर भर देत आहे. येत्या दोन ते चार वर्षांत कंपनीचे शेअरहोल्डिंग, बोर्ड, व्यवस्थापन, सप्लाई चेन भारतीयांच्या हातात असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. कंपनीने येत्या काही दिवसात बाजारातून 5,000 कोटी रुपये जमा करण्याची योजना आखली आहे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.