ITR Filing Update | इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याच्या अंतिम तारखेबाबत अपडेट! सरकारने काय दिली डेडलाईन?

Income Tax Return Update | इन्कम टॅक्स रिटर्न भरत असाल आणि अद्यापही तुम्ही हे काम केले नसेल तर लवकरात लवकर हे काम करून घ्या. अंतिम तारखेविषयी सरकारने काय केला आहे खुलासा? तुम्हाला माहिती आहे का?

ITR Filing Update | इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याच्या अंतिम तारखेबाबत अपडेट! सरकारने काय दिली डेडलाईन?
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 24, 2022 | 9:04 AM

Income Tax Return AY 2022-23 | तुम्ही आयकर भरत असाल आणि हे काम तुम्ही अद्यापही केले नसेल तर मग वाट कशाची पाहत आहात. अद्यापही वेळ गेलेली नाही. लवकरात लवकर हे काम हातावेगळं करा. कारण चालढकल करण्यात तुमचा महिना उलटून गेला आहे आणि सरकारने अंतिम तारखेविषयी (ITR Last Date) ही मोठा खुलासा केला आहे. आर्थिक वर्ष 2021-22 आणि करनिर्धारण वर्ष 2022-23 साठी 15 जून 2022 पासून आयकर रिटर्न ( Income Tax Return) भरण्याची सुरुवात झाली आहे. सरकारने प्राप्ती कर भरण्याची अंतिम तारीख यापूर्वीच 31 जुलै निश्चित केली आहे. पण अनेक करदात्यांना (Tax Payer) ही अंतिम तारीख वाढण्याची शक्यता वाटत आहे. सरकारने ही तारखेविषयी मोठा खुलासा केला आहे. पण आपलं काम वेळेच्या वेळेत पूर्ण करणाऱ्या करदात्यांना तारखेचा आता कुठला ही फरक पडणार नाही. कारण त्याने त्याचे कर्तव्य बजावलेले आहे.

तारखेविषयी काय आहे निर्णय ?

आतापर्यंत रिटर्न फाईल केलं नसेल तर तुम्ही ते ताबडतोब भरा. दरम्यान, शेवटची तारीख वाढवण्याबाबतही सरकारने मोठं वक्तव्य केलं आहे. इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे. म्हणजेच आता प्रत्येक प्रकरणात 31 जुलैपूर्वी तुम्हाला आयकर भरावा लागणार आहे. ITR ची ही अंतिम मुदत वाढवण्यासंदर्भात सध्या तरी सरकारचा कोणताही हेतू नसल्याची माहिती महसूल सचिवांनी दिली आहे. त्यामुळे तुम्हाला आता या अंतिम मुदतीच्या आतच आयटीआर दाखल करावं लागणार आहे. आर्थिक वर्ष 2021-22 आणि करनिर्धारण वर्ष (assessment year) 2022-23 साठी आयकर विवरणपत्र भरण्यास 15 जून 2022 पासून सुरुवात झाली आहे

आर्थिक दंडाची तरतूद

तुम्ही आयटीआर मुदतीपूर्वी भरले नाही तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. याशिवाय अधिक करदाते इन्कम टॅक्स वेबसाइटच्या ई-फायलिंगवर रिटर्न भरतात, तेव्हा त्यावर गर्दी होते आणि संकेतस्थळ हँग होण्याचे प्रकार सातत्याने घडतात. त्यामुळे वेळेत आयकर रिटर्न भरायचा असेल तर या आठवड्यातच हा विषय मार्गी लावा. नाहीतर तांत्रिक कारण अथवा इतर कारणामुळे तुम्हाला दंडाला सामोरे जावं लागू शकते.

हे सुद्धा वाचा

तर दंडासहित व्याज

आर्थिक वर्ष 2021-22 आणि करनिर्धारण वर्ष 2022-23 साठी 31 जुलै 2022 ही अंतिम मुदत आहे. त्यासाठी तुम्हाला कोणतेही विलंब शुल्क आकारण्यात येणार नाही. मुदतीनंतर आयकर विवरणपत्र भरल्यास कलम 234 A आणि आयकर कलम 234 F अंतर्गत दंडासह करावरील व्याज भरावे लागेल.

इतर अंतिम मुदत काय?

वैयक्तिक हिंदु विभक्त कुटुंबासाठी (HUF) आयकर विवरणपत्र भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2022 आहे. त्याचबरोबर ज्यांना ऑडिटची गरज आहे, त्यांच्यासाठी इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2022 आहे. आणि ज्यांचा व्यवसाय आहे आणि ज्यांना टीपी रिपोर्टची आवश्यकता आहे, त्यांच्यासाठी आयकर विवरणपत्र भरण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2022 आहे. म्हणजेच या विभागाने सर्व प्रकारच्या आयकरदात्यांना अंतिम मुदत दिली आहे, मुदतीपूर्वी कर भरला नाही तर तुम्हाला दंड भरावा लागेल आणि व्याजाची रक्कम ही भरावी लागणार आहे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.