Edible Oil Rate | आता तळा आषाढ ! खाद्यतेलाच्या किंमती दणक्यात कमी, अदानी विल्मरकडून 30 रुपयांची दर कपात, इतर कंपन्यांचीही लवकरच अंमलबजावणी

Big relief to Consumer | खाद्यतेलाच्या किंमती दणक्यात कमी झाल्या. गेल्या आठवड्यात सरकारसोबत झालेल्या बैठकीत अनेक कंपन्यांनी दर कपातीवर होकार भरला होता.

Edible Oil Rate | आता तळा आषाढ ! खाद्यतेलाच्या किंमती दणक्यात कमी, अदानी विल्मरकडून 30 रुपयांची दर कपात, इतर कंपन्यांचीही लवकरच अंमलबजावणी
आषाढ तळा Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 19, 2022 | 11:00 AM

Edible Oil Rate Reduce News | एका आघाडीवर दिलासा तर दुसऱ्या आघाडीवर शॉक अशा अवस्थेत भारतीय ग्राहक सध्या रोजच्या गरजा भागवण्याची कसरत करत आहे. कधी खाद्यतेलाचे भाव (Edible Oil Price) गगनाला जातात. तेव्हा पेट्रोल-डिझेल (Petrol Diesel News) स्वस्त होते. तर वीज दरवाढीचा शॉक बसतानाच खाद्यतेलाच्या किंमती झटक्यात कमी झाल्याची गोड बातमी येऊन धडकते. गेल्याच आठवड्यात खाद्यतेलाच्या किंमती या महिना अखेर कमालीच्या कमी होतील असे ठरले होते. तेल उत्पादक कंपन्यांशी (oil producing companies) सरकारने केलेली बातचीत यशस्वी ठरली आणि अनेक कंपन्यांनी त्याचवेळी 10 ते 15 रुपयांची दर कपातीची (rate cut News) घोषणा करत बाजारपेठेत नव्याने धाडण्यात येणाऱ्या पॅकेटवर ही सूट देण्यात आली. फॉर्च्यून ब्रँडने (Fortune Brand) यामध्ये आघाडी घेत, ग्राहकांना मोठा दिलासा दिला. जागतिक बाजारात खाद्यतेलाच्या दरात घसरण झाल्यामुळे भारतात तेलाच्या दरात कपात करण्यात आली आहे. सर्वाधिक कपात सोयाबीन तेलाच्या दरात झाली असून. नव्या किमतीची पाकिटे लवकरच बाजारात दाखल होतील. त्यामुळे ग्राहकांना आता आषाढ तळायला मुळीच हरकत नाही. गोडधोड करुन गरम पदार्थांनी रोगराई टाळण्यासाठी हा निर्णय कमालीचा फायदाचा ठरणार आहे.

फॉर्च्यून ब्रँडने केली कपात

अदानी विल्मर ग्रुपमधील फॉर्च्यून ब्रँड (Fortune Brand) खाद्यतेलाची निर्मिती करतो. या ब्रँडने खाद्य तेलाच्या किमतीत प्रति लीटर 30 रुपयांपर्यंत कपात करण्याची घोषणा सोमवारी केली. अदानी विल्मरच्या या निर्णयामुळे इतर ब्रँड्सच्या दरांतही कपात होणे अटळ आहे असे सूत्रांनी सांगितले. जागतिक बाजारात खाद्य तेलाच्या दरात घसरण झाल्यामुळे भारतात तेलाच्या दरात कपात करण्यात आली आहे. सर्वाधिक कपात सोयाबीन तेलाच्या दरात झाली असून. नव्या किमतीची पाकिटे लवकरच बाजारात दाखल होतील. तेव्हा ग्राहकांना जादा दराने नव्हे तर नव्या दराने कमी किंमतीत ही पाकिटे मिळतील. एक लिटर तेलाची बाटली आणि तेल पाऊचवर ही कपात लागू होईल. अदानी विल्मरने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, जागतिक बाजारातील दर कपातीचा लाभ ग्राहकांना मिळवून देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे निवेदन अदानी विल्मर कंपनीने जारी केले आहे. गेल्या महिन्यातही कंपनीने दर कपात केली होती.

हे सुद्धा वाचा

धाराने ही केली कपात

धारा ब्रँड (Dhara Brand) अंतर्गत खाद्य तेल विक्री करणाऱ्या मदर डेअरीने सोयाबीन आणि राईस ब्रॅन ऑईलच्या दरात प्रति लिटर 14 रुपयांची अलीकडेच कपात केली . केंद्रीय अन्न मंत्रालयाने 6 जुलै रोजी खाद्य तेलाच्या दरांवर तेल उत्पादक कंपन्यांशी चर्चा केली. त्यात जागतिक बाजारात तेलाचे दर घसरल्याने तेल किंमतीत कपातीचे आवाहन करण्यात आले. त्याला कंपन्यांनी प्रतिसाद दिला आणि तेलाच्या किंमती कमी झाल्या आहेत. गेल्या महिन्यात कंपन्यांनी खाद्य तेलाच्या किमती 10 ते 15 रुपयांनी कमी केल्या होत्या. अदानी विल्मरसह मदर डेअरी आणि इमामी ॲग्रोटेक या कंपन्यांनी पुढाकार घेतला होता.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.