Bank Strike : चार दिवस बँकांना राहणार कुलूप, बजेटपूर्वीच कामे घ्या उरकून

860992,860973,860942,860925 Bank Strike : बँकांची कामे पटापट उरकून घ्या, बजेटपूर्वी बँका सलग चार दिवस राहतील बंद..

Bank Strike : चार दिवस बँकांना राहणार कुलूप, बजेटपूर्वीच कामे घ्या उरकून
बंदची हाक
Follow us
| Updated on: Jan 26, 2023 | 7:54 PM

नवी दिल्ली : 1 फेब्रुवारी 2023 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण देशाचा अर्थसंकल्प (Union Budget 2023) सादर करतील. पण त्यापूर्वी सलग चार दिवस बँका बंद राहणार आहेत. या काळात बँकांमधील कामकाज ठप्प होईल. बँक कर्मचाऱ्यांच्या अनेक संघटना सरकारी धोरणांविरोधात आक्रमक झाल्या आहेत. बँक कर्मचारी संघटनांची संघटना युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनने (UFBU) बंदची हाक दिली आहे. विविध मागण्यांसाठी संघटना दोन दिवस कामकाज बंद ठेवतील. अखिल भारतीय बँक कर्मचारी संघाच्या (AIBEA) अधिकाऱ्यांनी याविषयीची माहिती दिली. 30 आणि 31 जानेवारी बँकांचा संप (Bank Strike) होणार आहे. 28 जानेवारी रोजी चौथा शनिवार तर 29 जानेवारी रोजी रविवार असेल. ग्राहकांच्या सेवांवर त्याचा थेट परिणाम होईल.

सलग 4 दिवस बँका बंद राहणार असल्याने ग्राहकांना मोठा फटका बसू शकतो. एटीएममध्ये रोख रक्कम संपण्याची शक्यता आणि धनादेशांचा निपटारा न झाल्याने अडचण येऊ शकते. बँकांची ऑनलाईन सेवा सुरु राहील. युपीआय व्यवहारांमुळे सोय होईल. पण तरीही बँकेतील महत्वाची कामे लवकर उरकून घ्या.

एआईबीईएचे महासचिव सी. एच. वेंकटचलम यांनी यापूर्वीच संपाबाबतची माहिती दिली होती. त्यानुसार, युएफबीयूची यापूर्वीच मुंबईत बैठक झाली. अनेकदा अर्जफाटे करुनही भारतीय बँक संघाने (IBA) कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे संपाचे हत्यार उपासण्यात आले आहे.

भारतीय बँक संघाच्या भूमिकेविरोधात पुन्हा आंदोलनचा निर्णय घेण्यात आला आहे. 30 आणि 31 जानेवारी रोजी संप करण्यात येणार आहे. तसेच याच दरम्यान 28 जानेवारी रोजी चौथा शनिवार तर 29 जानेवारी रोजी रविवार असल्याने चार दिवस बँका बंद राहतील.

बँकेत 5 दिवसांचा कामाचा आठवडा असावा, पेन्शन अपडेट करावी. एनपीएस समाप्त करावी. वेतन सुधारणा करावी. सर्वच विभागात तात्काळ भरती करण्यात यावी, अशा मागण्या बँक संघटनेने केल्या आहेत.

30 आणि 31 जानेवारी रोजी सोमवार आणि मंगळवार येत आहेत. तर त्यापूर्वी 28 जानेवारी रोजी चौथा शनिवार तर 29 जानेवारी रोजी रविवार असल्याने बँका चार दिवस बंद राहतील. ऐन अर्थसंकल्पाच्या तोंडावरच हे आंदोलन होत आहे. त्याचा फटका सर्वसामान्य ठेवीदारांना बसेल.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.