Cheque LPG Banking | धनादेश, गॅसच्या किंमती आणि बँकिंग, 1 ऑगस्टपासून बदलतील हे नियम, तुमच्या बजेटवर काय होईल परिणाम?

Cheque LPG Banking | पुढचा महिना हा क्रांतीचा महिना म्हणून ओळखल्या जातो. 1 ऑगस्टपासून देशभरात गॅसच्या किंमती (LPG Price) आणि बँकेसंबंधीच्या घडामोडी होतील. तर बँक ऑफ बडोदा (BOB)त्यांच्या धनादेशाबाबत ( Cheque and Bank Holidays) नियमात बदल करणार आहे.

Cheque LPG Banking | धनादेश, गॅसच्या किंमती आणि बँकिंग, 1 ऑगस्टपासून बदलतील हे नियम, तुमच्या बजेटवर काय होईल परिणाम?
तर वाढेल बजेटImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 27, 2022 | 7:35 AM

Cheque LPG Banking | ऑगस्ट तसा तर क्रांतीचा महिना. देशाने या क्रांतीपर्वातच स्वातंत्र्य मिळवलं आणि गेल्या 75 वर्षांपासून देश ते स्वातंत्र्य उपभोगत आहेत. देशातील नियमात, कायद्यात अनेक बदल झाले आहेत. आता 1 ऑगस्टपासून घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमत (LPG gas Cylinder)नव्याने ठरवण्यात येणार आहे. तर ऑगस्ट महिन्यांत भरमसाठ सुट्यांचा पाडाव (Bank Holidays) आहे. या महिन्यांत अनेक दिवस बँका बंद राहणार आहेत. एवढेच नाही तर बँक ऑफ बडोदा (BOB)त्यांच्या धनादेशाविषयीच्या नियमात बदल करणार आहे. तसेच बँका व्यवहाराच्या (Cash Transaction)नियमांत काही बदल करण्याची शक्यता आहे. या बदलांचा तुमच्या जीवनावर परिणाम होणार आहे. घरगुती गॅसच्या किंमती वाढल्या तर तुमचा खिसा खाली होईल तर कमी झाल्या तर तुम्हाला फायदा होईल. तसेच तुम्ही बँक ऑफ बडोद्याचे ग्राहक असाल तर धनादेशाविषयीचे नियम माहिती असणे तुमच्यासाठी आवश्यक आहे. तसेच सुट्यांच्या दिवशी बँकेत जाण्याचे परिश्रम ही बातमी वाचल्यावर टळतील.

धनादेशाचे काय बदलले नियम

1 ऑगस्टपासून बँक ऑफ बडोद्याचे (BOB) धनादेशाचे नियम बदलले जातील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन बँक करणार आहे. बँक ऑफ बडोद्याने त्याअनुषंगाने धनादेश व्यवहारांचा नियम बदलणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या तारखेपासून पाच लाख रुपयांच्या वरील आर्थिक व्यवहारांसाठी बँकेने पॉझिटिव्ह पे सिस्टिम (Positive Pay System) लागू केली आहे. धनादेश देणाऱ्याला बँक आता धनादेश व्यवहाराची विषयीची अद्ययावत माहिती एसएमएस, नेटबँकिंग, मोबाईल अॅपद्वारे देईल. त्यामुळे धनादेश व्यवहाराच्या फसवणुकीचे प्रकार होणार नाही.

हे सुद्धा वाचा

काय आहे पॉझिटिव्ह पे सिस्टिम

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकेतील फसवणूक टाळण्यासाठी पॉझिटिव्ह पे सिस्टिम लागू केली आहे. फसवणूक रोखण्यासाठी 2020 पासून धनादेशासाठी केंद्रीय बँकेने पॉझिटिव्ह पे सिस्टिम सुरु केली आहे. या सिस्टिममुळे 50,000 आणि त्यावरील अधिकच्या पेमेंटसाठी नुकसान टाळण्यास येणार आहे. सिस्टिमनुसार, SMS,बँकेचे मोबाईल अॅप वा एटीएमद्वारे धनादेश देणाऱ्या व्यक्तीला धनादेशाविषयीची माहिती बँकेला द्यावी लागणार आहे. धनादेशाविषयी ही माहिती तपासली जाते. सर्व माहिती योग्य वाटल्यावरच धनादेशाची पुढील प्रक्रिया पूर्ण करता येते.

घरगुती गॅसच्या किंमती

दर महिन्याच्या एक तारखेला घरगुती गॅसच्या किंमती ठरवण्यात येतात. ऑगस्ट महिन्याच्या एक तारखेपासून हे भाव कमी जास्त होऊ शकतात. सरकारी तेल उत्पादक कंपन्या गॅस सिलिंडरच्या किंमती ठरवतात. गेल्यावेळेप्रमाणेच यावेळी सुद्धा गॅसच्या किंमती भडकण्याची शक्यता आहे. या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.

18 दिवस बँकेला ताळे

ऑगस्ट महिन्यात एकूण 18 दिवस बँकेला ताळे राहणार आहे. या दिवशी बँक बंद राहतील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI)ऑगस्ट महिन्यातील सुट्यांची यादी जाहीर केली आहे. ऑगस्ट महिन्यात मोहरम (Muharram), रक्षाबंधन (Raksha Bandhan), स्वातंत्र्य दिन (Independence Day), कृष्ण जन्माष्टमी (Janmashtami) आणि गणेश चतुर्थी असे महत्वाचे सण आहेत. यादिवशी बँकेचे कामकाज बंद असेल. याशिवाय दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी तसेच रविवारी साप्ताहिक सुट्टी असल्याने बँकांचे शटर डाऊन असेल. सगळ्या प्रकारच्या सुट्यांचा विचार करता, ऑगस्ट महिन्यांत बँकांना एकूण 18 दिवस सुट्टी असेल.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.