Buyer Bazar : आता भारतातही सराफांचे नेटवर्किंग केंद्र, ऑगमोण्टकडून ‘बायर बाजार’ लॉन्च

Buyer Bazar : ऑगमोण्ट गोल्डटेकचा प्लॅटफॉर्म तसेच झवेरी बाजारात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या अव्वल दर्जाच्या प्रत्यक्ष कामकाजाच्या जागा यांचा उपयोग करून घेऊन, बायर बाजार या उद्योगक्षेत्रात व्यवहार करताना येणाऱ्या सर्व समस्यांवर खरेदीदार व विक्रेते मात करू शकतील.

Buyer Bazar : आता भारतातही सराफांचे नेटवर्किंग केंद्र, ऑगमोण्टकडून ‘बायर बाजार’ लॉन्च
आता भारतातही सराफांचे नेटवर्किंग केंद्र, ऑगमोण्टकडून ‘बायर बाजार’ लॉन्चImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 13, 2022 | 8:03 AM

मुंबई: बायर बाजार बाय ऑगमोण्ट हे भारतातील ‘गोल्ड डेस्टिनेशन’ अर्थात मुंबईतील (mumbai) झवेरी बाजारामधील क्रांतिकारी व एक्स्लुजिव असे दागिने विक्रेत्यांचे (सराफ) केंद्र आहे. या आरामदायी अत्याधुनिक कार्यालयामध्ये, दागिने व्यापाऱ्यांना, विक्रेत्यांशी सुलभ संपर्क, चांगल्या व्यवहारांद्वारे नफा, क्षेत्रातील अन्य व्यापाऱ्यांशी समन्वय आणि पैशांची बचत एवढे लाभ एका छताखालीमिळू शकतात. बायर बाजारचे व्यवस्थापकीय संचालक जीतेश जैन असून, ते या क्षेत्रातील दिग्गज समजले जातात. दागिने व्यापाऱ्यांची नाडी ते अचूक ओळखतात. बायर बाजारला इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) आणि जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिल (GJC) यांचे पाठबळ आहे. सध्या, भारतातील रिटेलर्स दागिने विक्रेत्यांशी व्यवहार करण्यासाठी नियमितपणे झवेरी बाजारात येतात, आणि बहुतेकदा विक्रेतेही त्यांच्या विक्रीकर्मचाऱ्यांना देशभरातील विविध रिटेलर्सकडे पाठवतात. हे जोखमीचे तर आहेच, पण वेळखाऊ व कार्यक्षमता कमी करणारेही आहे.

ऑगमोण्ट गोल्डटेकचा प्लॅटफॉर्म तसेच झवेरी बाजारात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या अव्वल दर्जाच्या प्रत्यक्ष कामकाजाच्या जागा यांचा उपयोग करून घेऊन, बायर बाजार या उद्योगक्षेत्रात व्यवहार करताना येणाऱ्या सर्व समस्यांवर खरेदीदार व विक्रेते मात करू शकतील. याशिवाय, जुने सोने रिसायकल करून नवीन दागिने खरेदी करण्याची किंवा भारत सरकारच्या गोल्ड मोनेटायझेशन स्कीममध्ये (जीएमएस) ठेव जमा करण्याची क्षमताही ऑगमोंट ज्वेलर ग्राहकांना देते. ज्वेलर्ससाठी तंत्रज्ञान व व्यवहार उपायांचा वापर करून, बायर बाजार हे भारतातील मोठ्या अलंकार उद्योगासाठी दीर्घकालीन क्रांतिकारी सोल्युशन आहे.

हे सुद्धा वाचा

डिजिटल आणि प्रत्यक्ष

यामुळे सर्व माध्यमांद्वारे बीटूबी कनेक्टिव्हिटी व व्यापार शक्य होतो.

वेळ व पैसा यांची बचत

अन्यथा योग्य त्या विक्रेत्यांना शोधण्यात व भेटण्यात खर्च केल्या जाणाऱ्या वेळेची व पैशाची यामुळे बचत होते.

चांगल्या व्यवहारांद्वारे नफा

अधिकाधिक पुरवठादारांशी संपर्क याचा अर्थ अधिक नफा मिळवून देणारे व्यवहार होय.

अधिक मोठी उत्पादनश्रेणी

अधिकाधिक पुरवठादार, खरेदीदारांना अधिक मोठी व वैविध्यपूर्ण उत्पादनश्रेणी उपलब्ध करून देतील.

नेटवर्किंग

तुमच्या उद्योगक्षेत्रातील लोकांशी जोडून घ्या, व्यवसायाची कक्षा वाढवा आणि नवीन संधींचा शोध घ्या.

अत्याधुनिक सुविधा

वीकेण्ड मार्केट्समध्ये प्राधान्याने प्रवेशाची संधी, लॉजिस्टिक्स व विमा सेवा, शॉवर रूम/ग्रीन रूम सुविधा, बॅकएण्ड सपोर्ट कर्मचारी आदी.

झवेरी बाजारात जागेचा तुटवडा आहे आणि येथील जागांच्या किंमतीही खूपच अधिक आहेत. असे असले तरीही भारतभरातील खरेदीदारांसाठी येथे आपले एक कार्यालय असणे आवश्यक आहे, विशेषत: वर्षातून काही वेळा येथे येणे गरजेचे असलेल्यांसाठी तर कार्यालयआवश्यक आहेच.‘बायर बाजार’चे सदस्यत्व घेणे म्हणूनच अर्थपूर्ण आहे आणि ही तफावत सदस्यत्वामुळे भरली जाईल. या जागेची अंतर्गत रचना अत्यंत आरामदायी आहे, ‘बुलियन हाउस’ या झवेरी बाजारातील सर्वोत्तम इमारतीत हे कार्यालय आहे. येथे पार्किंग, सिक्युरिटी, हाउसकीपिंग, खाद्यपदार्थ-पेये सर्व सुविधा उपलब्ध आहेत. स्वत:हून या सगळ्या व्यवस्था करणे अत्यंत डोकेदुखीचे आहे, असे रतलामच्या (मध्यप्रदेश) डीपी ज्वेलर्सचे विकास कटारिया म्हणाले. बायर बाजार सुरू झाल्यानंतर त्वरित कटारिया यांनी सदस्यत्व घेतले.

‘प्रत्येक कार्यस्थळाची अंतर्गत रचना ज्वेलर्सच्या गरजेनुरूप करण्यात आली आहे. या जागेत श्रीमंती इटालियन मार्बल व आरामदायी लाकडी फर्निचरचा वापर करण्यात आला आहे, अन्य व्यावसायिक को-वर्किंग स्पेसेसमध्ये हे दिसत नाही. यातील प्रत्येक केबिन हे सुवर्ण उद्योगासाठी महत्त्वाच्या असलेल्या जगातील एखाद्या प्रमुख शहराच्या थीमवर आधारित आहे. यांमध्ये लंडन, सिडनी, जोहान्सबर्ग, शिकागो, टोरंटो यांचा समावेश आहे. नंतरच्या काही टप्प्यांमध्ये अधिक जागा व टेरेस कॅफेची भर घातली जाणार आहे, असे बायर बाजारचे उपाध्यक्ष प्रियांक जैन यांनी सांगितले. खरेदीदारांना त्यांच्या व्यवहारांवर मोजकी टक्केवारी जरी वाचवता आली, तरी हे सदस्यत्व किफायतशीर ठरू शकते.

‘ऑगमॉण्ट गोल्ड फॉर ऑल हा भारतातील सर्वांत मोठा पूर्णपणे एकात्मिक गोल्ड प्लॅटफॉर्म असून, याद्वारे शुद्धीकरणापासून ते रिटेलिंगपर्यंत सर्व कामे केली जातात. ही कंपनी स्पॉट प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मोठाले बार्स खरेदी करण्यात किंवा विकण्यात ज्वेलर्सना मदत करते. ज्वेलर्स या प्लॅटफॉर्मच्या मदतीने डिजि गोल्ड व गोल्ड सिप आपल्या अखेरच्या ग्राहकांना विकू शकतात. ग्राहकांना आपल्याजवळील दागिने ईएमआय तत्त्वावर विकण्याची संधीही ऑगमोंट ज्वेलर्सना देते. रिटेल ज्वेलर्सना विविध उत्पादक व घाऊक विक्रेत्यांशी दागिन्यांचे व्यवहार करण्याची क्षमता एका ओम्नी-चॅनल प्लॅटफॉर्मवर देणे हा ज्वेलर्सना सोल्युशन्सचा संपूर्ण संच पुरवण्याच्या धोरणाचा नैसर्गिक विस्तार आहे. यासाठीच बायर बाजार आहे,” असे ऑगमोण्टचे संचालक केतन कोठारी म्हणाले.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.