Startup : पुणे बॉईज रॉक्स! स्टार्टअपमध्ये दिग्गजांची गुंतवणूक, आज 53 देशांत जातो माल

Startup : पुण्यातील दोन भावांनी एकदम कमाल केली आहे. त्यांच्या स्टार्टअपला बॉलिवूडच नाही तर क्रिकेटमधील दिग्गजांनी पाठिंबा दिला आहे. अक्षरशः पैसा ओतला आहे. काय आहे या पुणे बॉईजची हटके कहाणी...

Startup : पुणे बॉईज रॉक्स! स्टार्टअपमध्ये दिग्गजांची गुंतवणूक, आज 53 देशांत जातो माल
Follow us
| Updated on: Apr 22, 2023 | 12:21 PM

नवी दिल्ली : आता देशभरात ग्रामीण भागापर्यंत स्टार्टअपचं (Startup) लोण पसरलं आहे. अनेक होतकरु तरुण त्यांच्या स्वप्नांना आकार देत आहे. नाविन्यपूर्ण कल्पना घेऊन बाजारात उतरायचं, निधी जमवायचा आणि धडक व्यवसाय सुरु करायचा, असा हा सर्व मामला आहे. तुमच्या कल्पनेत दम असेल तर जगातील अनेक कंपन्या, उद्योजकच नाही तर सेलिब्रिटीसुद्धा तुम्हाला डोक्यावर घेतील. तुमच्या स्टार्टअपमध्ये भलीमोठी गुंतवणूक (Investment) करतील. आजच्या इंटरनेट आणि तंत्रज्ञानाच्या युगात स्वप्न साकार करणं अधिक सोपं झालं आहे. पुण्यातील दोन भावांनी उभारलेल्या स्टार्टअपने यशाचं मापदंड घालून दिले आहेत.

सेलिब्रिटींचं फंडिंग पुण्यातील या स्टार्टअपला बॉलिवूड स्टार अक्षय कुमार आणि धडाकेबाज क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग यांनी पाठिंबा दिला आहे. या दोघांनी या स्टार्टअपमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. प्री-सिरीज ए फंडिंग राऊंडच्या माध्यमातून या स्टार्टअपने मोठा निधी जमाविला आहे. यामध्ये अक्षय कुमार, सेहवाग आणि इतर सेलिब्रिटींनी एकूण 14.5 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

कोणती आहे ही कंपनी आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, हे स्टार्टअप कोणते आहे आणि हे कोणत्या क्षेत्रात काम करत आहे. तर पुण्यातील या स्टार्टअपचे नाव ब्रदर्स ऑर्गेनिक फार्म (TBOF) आहे. पुण्याजवळील बोधनी हे छोटे गाव. या गावातील दोन भावांनी हा करिष्मा केला आहे. त्यांच्या कंपनीसाठी अनेक दिग्गजांनी निधी दिला आहे. ही कंपनी नावाप्रमाणेच शेतीतील दर्जेदार उत्पादनं, म्हणजे ऑरगॅनिक कृषी माल तयार करते आणि तो परदेशात निर्यात होतो.

हे सुद्धा वाचा

अनेक दिग्गजांची गुंतवणूक TBOF चे सहसंस्थापक सत्यजीत हांगे आहे. त्यांच्या माहितीनुसार, या स्टार्टअपमध्ये अक्षय कुमार, विरेंद्र सेहवाग आणि इतर अनेक दिग्गजांनी रस घेतला. त्यांनी मोठी गुंतवणूक केली. ब्रदर्स ऑर्गेनिक फार्ममध्ये सेलिब्रिटींनी एकूण 14.5 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. प्री-सीरीज ए फंडिंग राऊंडच्या माध्यमातून हा निधी जमा करण्यात आला आहे.

निधीचा वापर कशासाठी हांगे यांच्यानुसार, या निधीचा वापर टीबीओएफचे उत्पादन क्षमता वाढीसाठी, शेतकऱ्यांची प्रशिक्षण केंद्र तयार करणे, देशातील आणि परेदशातील उद्योग वाढीसाठी उपयोग होईल. या निधीमुळे शेतकऱ्यांना पायाभूत सुविधा देण्यात आणि स्वतःच्या पायावर उभं करण्यात मोठी मदत मिळले. गावातील महिला आणि तरुणांना मोठा रोजगार उपलब्ध होईल.

दोन भावांनी सुरु केली कंपनी सत्यजीत आणि अजिंक्य हांगे या दोन भावांनी 2019 मध्ये टीबीओएफची स्थापना केली होती. शुद्ध तूप(कल्चर्ड ए2 घी), बाजरी, नैसर्गिक अन्नधान्य, घाण्याद्वारे तयार झालेले शुद्ध कच्ची घाणी तेल, बटर, सेंद्रिय अन्नधान्य आणि इतर दर्जेदार उत्पादन, मालाची विक्री या दोन भावांनी सुरु केली होती. यामध्ये सेंद्रीय फळ, भाजीपाल, अन्नधान्या, डाळी यांचा समावेश आहे.

53 हून अधिक देशात जातो माल विरेंद्र सेहवाग याने या स्टार्टअपशी जोडल्याने आनंद होत असल्याचा दावा केला आहे. कृषी आणि ग्रामीण विकासासाठी टीबीओएफचे मोठे योगदान आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल होईल. ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, आपण या स्टार्टअपचे भाग असल्याचा आनंद असल्याचे म्हणणे या स्टार क्रिकेटपटूने मांडले. या स्टार्टअपचा माल सध्या 53 हून अधिक देशात पोहचविल्या जात आहे. त्यासाठी कंपनीची अधिकृत वेबसाईट, मोबाईल अॅप आहे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.