Akasa Air : ‘अकासा एअर’ जुलैत झेपावणार, राकेश झुनझुनवालांची 72 विमानं खरेदी; देशांतर्गत विमानसेवेत पदार्पण

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात विमान कंपनीला नागरी हवाई मंत्रालयानं ग्रीन सिग्नल दिला होता. अकासा एअरने 72 बोईंग 737 मॅक्स विमानांसाठी ऑर्डर नोंदविली आहे. अन्य विमानांच्या तुलनेत मॅक्स विमानांना इंधनाची आवश्यकता कमी प्रमाणात असते.

Akasa Air : ‘अकासा एअर’ जुलैत झेपावणार, राकेश झुनझुनवालांची 72 विमानं खरेदी; देशांतर्गत विमानसेवेत पदार्पण
अकासा एअरलाईनImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 23, 2022 | 11:57 PM

नवी दिल्ली : भारताचे ‘वॉरेन बफे’ म्हणून ख्यातकीर्त राकेश झुनझुनवाला हवाई क्षेत्रात प्रवेश करणार आहेत. झुनझुनवाला यांच्या मालकीचे अकासा एअरचे (AKASA AIR) विमान लवकरच हवेत झेपावणार आहे. चालू वर्षी जून महिन्यात कंपनीकडं प्रत्यक्ष विमान हस्तांतरित केलं जाणार आहे. दरम्यान, प्रत्यक्ष विमान हवेत झेपविण्यापूर्वी कंपनीनं अन्य कायदेशीर सोपस्कार पूर्ण केले आहे. मार्च 2023 पर्यंत देशांतर्गत मार्गावर 18 विमानांद्वारे संनियंत्रण केले जाण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात विमान कंपनीला नागरी हवाई मंत्रालयानं (CIVIL AVIATION MINISTRY) ग्रीन सिग्नल दिला होता. अकासा एअरने 72 बोईंग 737 मॅक्स विमानांसाठी ऑर्डर नोंदविली आहे. अन्य विमानांच्या तुलनेत मॅक्स विमानांना (MAX AIROPLANE) इंधनाची आवश्यकता कमी प्रमाणात असते.

उद्दिष्ट अकासाची

भारतातील महानगरातून द्वितीय तसेच तृतीय श्रेणीच्या शहरांसाठी सेवा प्राथमिक टप्प्यावर सुरू केली जाणार आहे. तसेच महानगरातून महानगरासाठी देखील उड्डाणं होतील. काटेकोर व्यवस्थापन, ग्राहकांची संतुष्टता, कर्मचाऱ्यांचं हित यावर अकासा एअरचं उद्दिष्ट असणार आहे.

एका झटक्यात 72 विमानं

अकासा एअरने 72 बोईंग 737 मॅक्स जेट साठी ऑर्डर नोंदविली आहे. यासाठी तब्बल 9 अरब डॉलर रकमेची गुंतवणूक केली आहे. विमान कंपनीचं उद्दिष्ट वर्ष 2023 च्या दुसऱ्या सहामाही मध्ये विदेशी उड्डाणांचे सुरुवात करण्याचं ध्येय आहे.

हे सुद्धा वाचा

स्वस्तात प्रवास

अकासा एअरलाईन्स अल्ट्रा लो कॉस्ट कॅरियर असणार आहे. या श्रेणीतील विमानांच तिकीट तुलनेनं स्वस्त मानलं जातं. तिकिटाचे मुलभूत दर स्वस्त असतात. मात्र, अन्य सुविधांसाठी स्वतंत्रपणे पैसे अदा करावे लागतात. गो एअर कंपनीच्या सेवा देखील अल्ट्रा लो कॉस्ट कॅरिअर श्रेणीतच असतात. भारतात विमान सेवा कंपन्यांत स्पर्धात्मक चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना हाती घेतल्या जात आहे

भारताचे ‘वॉरेन बफे’

राकेश झुनझुनवाला हे गुंतवणूक क्षेत्रातील दिग्गज मानले जातात. भारताचे वॉरेन बफे अशी त्यांची गुंतवणूक क्षेत्रात ओळख आहे. शेअर बाजाराच्या कलाचा अचूक अंदाज असणारे झुनझुनवाला बाजारातील नफा आणि तोटा याचा अचूक अंदाज वर्तवितात. राकेश झुनझुनवाला यांच्या व्यवहारातील डावपेचांकडे अवघ्या गुंतवणूक विश्वाचं लक्ष्य लागलेलं असतं. झुनझुनवाला हे पेशानं प्रथितयश सीए आहेत.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.