Inflation Affect | महागाई आणि गृहकर्जावरील व्याजदरातील वाढीमुळे ‘अफोर्डेबल हाउसिंग’ चे स्वप्न भंगणार ?

affordable housing news : गृहकर्जावरील व्याजदरात वाढ होत आहे. महागाई दिवसेंदिवस वाढतच चालली आहे , त्यातच निर्मिती खर्चही वाढत आहे. या सर्व कारणांमुळे अफोर्डेबल हाउसिंगचे (परवडणाऱ्या किमतीत घरं) स्वप्न शक्य नसल्याचे चित्र दिसत आहे.

Inflation Affect | महागाई आणि गृहकर्जावरील व्याजदरातील वाढीमुळे 'अफोर्डेबल हाउसिंग' चे स्वप्न भंगणार ?
घराच्या स्वप्नाला सुुरंग
Follow us
| Updated on: Jul 15, 2022 | 11:45 AM

Inflation ruin dream : वाढत्या महागाईमुळे (Inflation) सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. जीवनावश्यक वस्तूंसोबत पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅसच्या किमती गगनाला भिडल्याने नागरिक त्रस्त झाली आहे. कोविडमुळे सर्वच क्षेत्रात मंदीचे (Recession) वातावरण होते. ही परिस्थिती आता कुठे रुळावर येत असताना वाढत्या महागाईमुळे सगळेच त्रासले आहेत. वाढत्या महागाईची झळ रिअल इस्टेट ( Real Estate) क्षेत्रालाही बसली आहे. बँकांनी गृहकर्जावरील व्याज दरांत वाढ केल्यामुळे चालू आर्थिक वर्षात परवडणाऱ्या किमतीतील घरांच स्वप्न भंगण्याची शक्यता आहे. वाढते व्याजदर, महागाई, निर्मिती खर्चातील वाढ या आणि अशा अनेक कारणांमुळे परवडणाऱ्या किमतीतील घरं देण कंपन्यांना (Affordable housing finance) कठीण होऊ शकतं. त्यांच्या घोडदौडीला लगाम लागण्याची शक्यता आहे. इंडिया रेटिंग्स आणि रिसर्चने गुरुवारी एक अहवाल जाहीर केला आहे. त्यानुसार 25 लाख रुपयांपेक्षा कमी दरातील घरं हे परवडणाऱ्या किमतीत घरं देणाऱ्या कंपन्यासाठी अतिशय मजबूत क्षेत्र ठरले आहे. आणि गेल्या दशकभरात या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रगती झाली आहे. या रिपोर्टनुसार, वार्षिक 25 टक्के विकासदर असणाऱ्या परवडणाऱ्या दरात घरं देणाऱ्या या क्षेत्राने गेल्या 5 वर्षांत गृहनिर्माण क्षेत्राच्या एकूण वाढीलाही मागे टाकले आहे.

मात्र काही कारणांमुळे, परवडणाऱ्या किमतीत घर देणाऱ्या या विभागाच्या विकासाची गती आता कमी होऊ शकते. वाढती महागाई, व्याजदरात होणारी वाढ, वाढत्या महागाईमुळे कमी झालेला कॅश फ्लो, तसेच निर्मिती खर्चात वाढ झाल्यामुळे मालमत्तेचीही वाढलेली किंमत, तसेच केंद्र सरकारच्या क्रेडिट लिंक्ड सबसिडी योजना थांबणे, अशी अनेक आव्हाने या क्षेत्रासमोर आहेत. व्याजदरात वाढ झाल्यास गृहकर्ज महाग होतं. निश्चितपणे त्याचा मोठा परिणाम खरेदीदारांवर होईल. व्याजदरात वाढ झाल्याने ईएमआयमध्येही वाढ होते. या सर्व बाबींचा परिणाम परवडणाऱ्या घरांच्या किमतीवरही दिसून येतोच

हे सुद्धा वाचा

काय आहे क्रेडिट लिंक्ड सबसिडी योजना ?

केंद्र सरकारने क्रेडिट लिंक्ड सबसिडी योजनेच्या (CLSS)सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत घर खरेदी करणाऱ्यांना चार विभागांमध्ये व्याजात सवलत मिळते. या अनुदानाचा फायदा ईडब्ल्यूएस(EWS), एलआयजी (LIG), एमआयजी -1 (MIG-1) आणि एमआयजी -2 (MIG-2) या चार विभागांत मिळतो. या योजनेअंतर्गत आजवर 1.40 लाख कुटुंबांना या अनुदानाचा फायदा झाला आहे.

वाढीव खर्च टाळा

घर बांधताना काही गोष्टी टाळल्या तर फायदा होऊ शकतो. सिमेंट, सळई, वीट, ग्रिल, पेंट, फिटिंग, एवढेच नाही तर घर बांधताना लागणारे पाणी या सर्वांचा खर्च वाचवता आला तर तुम्हाला स्वस्तात तुमचे घराचे (Affordable Housing) स्वप्न पूर्ण करता येईल. अशा महागाईच्या काळात घर बांधताना काय गोष्टींचा वापर करावा हे जर ठरवले तर घर बांधणीचा खर्च अवाक्यात येऊ शकतो. फ्लाई ऐश विट ही 2 ते 3 रुपयांनी स्वस्त पडते. जर घर बांधण्यासाठी 50 हजार विटांची गरज असेल तर तुमचे एक ते दीड लाख रुपये सहज वाचू शकतात. विशेष म्हजे फ्लाई ऐश विटेमुळे सिमेंट ही कमी लागते. सॅनेटरी वायर, प्लम्बिंग घटक, इलेक्ट्रिक फिटिंग्स आणि रंगरंगोटीचा खर्च महत्वाचा असतो. यामुळे ही घराचा खर्च वाढतो. या सर्व गोष्टींचा ठेका दिला तर तुम्हाला मजुरी रुपात देण्यात येणारा खर्च कमी लागेल. तसेच ओळखीतून कामे केल्यास तुम्हाला माल ही स्वस्तात मिळेल. थेट डिलरकडून माल घेतल्यास त्यात सवलत मिळेल. ब्रॅंडेड वस्तुंपेक्षा लोकल सामान स्वस्त मिळते.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.