रेल्वेसारखी लोखंडी चाकावर का चालवली जात नाही कार? तुम्हाला पडला आहे का कधी असा प्रश्न?
तुम्ही कधी विचार केला आहे का की कार फक्त लोखंडी चाकावर असलेल्या ट्रेनसारखी का चालवता येत नाही? असे विचार फार कमी लोकांच्या मनात येत असतील, पण त्यामागील माहिती समजून घेणेही आवश्यक आहे.
मुंबई : वाहन कोणतेही असो त्यामध्ये चाकाची भुमिका सर्वात महत्त्वाची असते. रेल्वेची चाके तुम्ही पाहिलीच असतील. तीचे चाक हे लोखंडी असतात, तर दुसरीकडे आपल्या कारमध्ये लोखंडी रिंगमध्ये रबराचा टायर (Car Tyre) असतो. तुम्ही कधी विचार केला आहे का की कार फक्त लोखंडी चाकावर असलेल्या ट्रेनसारखी का चालवता येत नाही? असे विचार फार कमी लोकांच्या मनात येत असतील, पण त्यामागील माहिती समजून घेणेही आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल. वास्तविक, रेल्वेची चाके लोखंडाची असतात जी लोखंडी रुळावर धावतात. रेल्वेची चाके लोखंडी असतात कारण फक्त लोखंडच ट्रेनचे जड वजन सहन करू शकते. याशिवाय, ट्रेनचा ट्रॅक निश्चित केला जातो आणि खडबडीत पृष्ठभागावर न राहता, हा ट्रॅक सपाट पृष्ठभागावर असतो, ज्यामुळे वेग पकडणे सोपे होते.
कारचे टायर लोखंडी असल्यास काय होईल?
कारमध्ये फक्त लोखंडी चाके बसवली तर गाडी चालवणे आणि ते हाताळणेही कठीण होईल. वास्तविक, कारच्या चाकांना जोडलेले रबरी टायर रस्त्याला ग्रिप पकडतात ज्यामुळे कार पुढे जाते. टायर नसतील तर गाडी रस्त्यावर सरकायला लागते. याशिवाय गाडीचे टायर रस्त्यावरील खड्ड्यांचे धक्के शोषून घेतात आणि गादीसारखे काम करतात. जर चाकांना टायरऐवजी फक्त लोखंडी असेल तर गाडी चालवताना जास्त धक्के बसतील. लोखंडी चाकांच्या वजनामुळे गाडी नीट हलणार नाही आणि इंजिनही खराब होईल. यामुळेच रेल्वेप्रमाणे लोखंडी चाकावर कार. चालवता येत नाही.