Tata Sunroof : टाटाची कमाल, बाजारात आणली स्वस्त सनरुफ कार!
Tata Sunroof : टाटा मोटर्स बाजारात नवनवीन प्रयोग करते. आता टाटाने पुन्हा कमाल केली आहे. बाजारात सर्वात स्वस्त सनरुफ कार आणल्याचा दावा केला आहे. या कारची किंमती तरी काय आहे..
नवी दिल्ली : सध्या फ्युचरिस्टिकच नाही तर फिचरची रेलचेल असणाऱ्या कारचा जमाना आहे. विविध फिचर असलेल्या कारकडे ग्राहकांचा ओढा आहे. त्यातच सनरुफ कारची (Sunroof Car) तर बच्चेकंपनीपासून सर्वांनाच क्रेझ आहे. हेच हेरुन अनेक कंपन्यांनी सनरुफ कार बाजारात उतरविल्या. सर्वात स्वस्त सनरुफ कार बाजारात येत आहेत. टाटा मोटर्स सातत्याने नवनवीन प्रयोग करते. आता टाटाने पुन्हा कमाल केली आहे. ही कंपनी बाजारात स्वस्त सनरुफ कार घेऊन आली आहे. Tata Altroz च्या CNG Variant ला कंपनीने नुकतेच बाजारात उतरवले आहे. सध्या बाजारात अल्ट्रोजच्या सनरुफ कारच्या किंमतीची जोरदार चर्चा आहे. ही कार किफायतशीर असल्याचा दावा करण्यात येत आहे. नेमकी किंमत आणि फिचर आहेत तरी काय?
13 नवीन व्हेरिंएट्स अल्ट्रोज कार आता पेट्रोल आणि डिझेल इंजिनासह एकूण 13 नवीन व्हेरिंएट्समध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहे. टाटा मोटर्सने Altroz मध्ये मिड-स्पेक XM+ट्रिम सनरुफचा समावेश केला आहे. ही पेट्रोल, टर्बो-पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी पॉवरट्रेनसह एकूण 16 व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. पठडीतील, नेहमीच्या अल्ट्रोजपेक्षा सनरुफ सुविधा असणारी कार जवळपास 45,000 रुपयांनी महाग आहे. अल्ट्रोजच्या डार्क एडिशनमध्ये पण सनरुफ मिळते.
किंमत किती सनरुफ सह अल्ट्रोजच्या व्हेरिएंटची सुरुवातीची किंमत 7.90 लाख रुपयांनी सुरु होते. ही एक्स शोरुम किंमत आहे. या कारच्या इंजिनमध्ये कुठल्याही प्रकारचा बदलाव करण्यात आला नाही. ही कार पूर्वीसारखीच 86hp च्या 1.2 लिटर नॅचरल एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन, 110 हॉर्स पॉवरच्या 1.2 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन आणि 90 हॉर्स पॉवरच्या 1.5 लिटर डिझेल इंजिनसह येते. हे इंजिन स्टँडर्ड-5 स्पीड मॅन्युअल ट्रासमिशन गिअरबॉक्सला जोडण्यात आले आहे. या कारमध्ये 1.2 लिटर नॅचरल एस्पिरेटेडमध्ये 6 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय मिळतो.
फिचर्सचा डंका
- हुंदाई आय20 च्या टॉप व्हेरिएंट्स एस्टा आणि एस्टा(ऑपशनल) ट्रिममध्ये सनरुफ फिचर
- या कारची किंमत 9.03 लाख रुपयांनी सुरु होते
- त्यामुळे अल्ट्रोज या सेगमेंटमध्ये फिचरसह भाव खाऊन जाते
- ती किफायतशीर किंमतीत असल्याचा दावा करण्यात येत आहे
- या कारमध्ये वायरलेस चार्जर, एक एअर प्युरिफायर आणि लेटरेट अपहोल्स्ट्री असे फिचर्स
- तसेच इतर पण अनेक फिचरचा समावेश
- या कारला 5 स्टार सेफ्टी रेटिंग
- 7 इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम
- एम्बिएंट लायटिंग आणि क्रुझ कंट्रोची सुविधा
- अल्ट्रोज देशातील सर्वात सुरक्षित हॅचबॅक कारमधील एक