ह्युंदाई आणि किया कंपनीने ‘त्या’ घटनेनंतर गाड्या परत मागवल्या, तुमच्या कारचं काय होणार?
तुमच्याकडे ह्युंदाई किंवा किया कंपनीची कार असेल तर ही बातमी नीट वाचा. कारण कंपनीने विक्री केलेल्या काही गाड्या पुन्हा मागवल्या आहे. त्यामुळे या यादीत तुमची कार तर नाही ना याची शहनिशा करा.
मुंबई : ऑटो कंपन्या गाड्यांबाबत काळजी घेत असतात. एखादी समस्या वारंवार जाणवत असेल तर त्यासाठी योग्य पाऊलही उचलतात. असंच काहीसं ह्युंदाई आणि किया कंपनीने केलं आहे. गाड्यांना आग लागत असल्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने ह्युंदाई आणि कियाने अमेरिकेतील 91 हजाराहून अधिक गाड्या परत मागवल्या आहेत. रिपोर्टनुसार, या प्रकरणात ह्युंदाईने 52 हजार आणि कियाने जवळपास 42 हजार गाड्या परत मागवल्या आहेत. रिकॉल कँपेनमध्ये 2023-2024 ह्युंदाई पॅलिसेड, 2023 ह्युंदाई टक्सन, ह्युंदाई सोनाटा, ह्युंदाई एलांट्रा आणि ह्युंदाई कोना या गाड्यांचा समावेश आहे. तर किया कंपनीच्या 2023-2024 सेल्टोस आणि 2023 सोल आणि स्पोर्टेज गाड्या परत मागवल्या आहेत.
ह्युंदाई आणि किया कंपनीच्या कारला आग लागण्याची शक्यता
ह्युंदाई आणि किया कंपनीच्या गाड्यांना आग लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यात ह्युंदाईच्या सहा आणि कियाच्या चार गाड्यांचा समावेश आहे. दक्षिण कोरियाई कंपन्यांनी दावा केला आहे की, या दुर्घटनेत कोणतीही इजा झालेली नाही. रिपोर्टनुसार, डिफॉल्ट असलेल्या गाड्यांच्या मालकांना या सप्टेंबरच्या शेवटी सांगितलं जाईल आणि फॉल्टी ऑईल पंप कंट्रोलर्स चेक केले जातील. ही सेवा मोफत असणार आहे.
गाड्या दुरुस्त होईपर्यंत भाडेतत्त्वावर मिळणार गाड्या
नॅशनल हायवे ट्राफिक सेफ्टी अॅडमिनिस्ट्रेशनच्या रिकॉल डॉक्युमेंट अंतर्गत, ह्युंदाईने आपल्या डीलर्संना ग्राहकांच्या गाड्या दुरुस्त होईपर्यंत भाड्याने गाड्या उपलब्ध करून देण्याचा सल्ला दिला आहे. दुसरीकडे, गाडी चालवताना जळण्याचा वास येत असेल तर तात्काल डीलर्स नेण्याची विनंती केली आहे. तसेच काही दिवस गाडी न चालवण्याचा सल्ला दिला आहे.
ह्युंदाई आणि कियाच्या गाड्यांमध्ये समस्या
रिपोर्टनुसार, दक्षिण कोरियन कंपन्यांनी कार मालकांना सूचित करत सांगितलं आहे की, गाड्या शक्यतो मोकळ्या जागेत पार्क कराव्यात. ह्युंदाई आणि किया कंपन्यांनी केलेल्या देखरेखीत ऑईल स्टॉप अँड गो ऑईल पंप असेंबलीच्या इलेक्ट्रॉनिक कंट्रोलरमध्ये समस्या दिसून आली आहे.