Bharat NCAP: कारची अपघात चाचणी कशी होते? कसं दिलं जातं रेटिंग? जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर

ग्लोबल एनसीएपी गेल्या एक दशकापासून 'सेफर कार्स फॉर इंडिया' मोहिमेंतर्गत भारतात विकल्या जाणाऱ्या गाड्यांची क्रॅश टेस्ट करते. पण आता ही चाचणी भारतातच होणार आहे. आता ही चाचणी कशी होणार आणि त्यासाठी गुणांकन कसं जाईल ते जाणून घ्या.

Bharat NCAP: कारची अपघात चाचणी कशी होते? कसं दिलं जातं रेटिंग? जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर
Bharat NCAP: आता भारतातच होणार कारची अपघात चाचणी, कशी होते क्रॅश टेस्ट? समजून घ्या
Follow us
| Updated on: Aug 23, 2023 | 4:36 PM

मुंबई : ऑटो कंपन्या ग्राहकांची गरज ओळखून आपल्या कार लाँच करतात. त्या गाड्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य की अयोग्य आहेत? हे तपासण्यासाठी ग्लोबल एनसीएपी क्रॅश टेस्ट केली जाते. यामुळे ग्राहकांना आपण घेत असलेली कार किती सुरक्षित आहे याचा अंदाज येतो. आता भारतीय कंपन्यांना कार टेस्टसाठी ग्लोबल एनसीपीए प्लॅटफॉर्मवर जाण्याची गरज नाही. कारण आता गाड्यांची अपघात चाचणी भारतातच होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबतची नुकतीच घोषणा केली होती. आता 1 ऑक्टोबर 2023 पासून भारत एनसीएपी क्रॅश टेस्ट अभियान सुरु होणार आहे. पण ही क्रॅश चाचणी भारतात कशी होईल? याबाबत अनेक प्रश्न ग्राहकांना पडले आहेत. असाच प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर जाणून घ्या क्रॅश टेस्टिंग कशी होते, किती कॅमेरे लावलेले असतात? किती वेळा टेस्टिंग होते?

कशी होते कार क्रॅश टेस्टिंग?

अनेकदा ग्राहकांना गाडीच्या डिझाईनची भूरळ पडते आणि त्यावरून निवड केली जाते. पण वरून जबरदस्त दिसणारी गाडी किती मजबूत आहे? याबाबत कल्पना नसते. कार क्रॅश टेस्टमध्ये गाडीच्या एक्सटीरियर आणि इंटीरियर या दोघांची तपासणी केली जाते. यावरून कारला रेटिंग दिली जाते. एका विशिष्ट वेगाने गाडीचा अपघात झाल्यास काय स्थिती असेल? प्रौढ, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसाठी गाडी सुरक्षेच्या दृष्टीने किती योग्य यावरून ठरवलं जातं.

क्रॅश टेस्ट दरम्यान गाडीचा स्पीड किती असतो?

ग्लोबल एनसीएपी चाचणीत कारचा स्पीड 64 किमी प्रतितास इतका असतो. या वेगातच गाडी समोर असलेल्या बॅरियवर आदळली जाते. या चाचणीतून प्रौढ आणि मुलांच्या दृष्टीने वेगवेगळी रेटिंग दिली जाते. भारतात होऊ घातलेल्या भारत एनसीएपी चाचणीती फ्रंट ऑफसेट टेस्टिंगसाठी स्पीड 64 किमी प्रतितास, साईड इम्पॅक्ट टेस्टिंगसाठी 50 किमी वेग आणि पोल साईड इम्पॅकसाठी 29 किमी प्रतितास वेग असेल. सुरक्षेच्या दृष्टीने गाड्यांना साईड इम्पॅक्ट आणि फ्रंट ऑफसेट दोन्ही क्रॅश टेस्ट करणं अनिवार्य असेल.

कारमध्ये कोण बसतं आणि किती कॅमेरे असतात?

कार क्रॅश टेस्टिंगमध्ये माणसाचं डमी मॉडेल बसवलं जातं. तर या चाचणीदरम्यान गाडीत 8 ते 10 कॅमेरे बसवलेले असतात. यामुळे वेगवेगळ्या अँगलमधून अंदाज घेतला जातो. गाडी आदळल्यानंतर काय घडतं याची नोंद केली जाते. विशेष म्हणजे भारतात सीएनजी आणि इलेक्ट्रिक गाड्यांची टेस्ट होणार आहे. ही क्रॅश टेस्ट फक्त एकदाच केली जाईल, कारण ही प्रक्रिया खूपच खर्चिक आहे.

Global NCAP vs Bharat NCAP नेमका काय फरक आहे?

ग्लोबल एनसीएपी चाचणीसाठी एक वेगळा प्रोटोकॉल आहे. तर भारत एनसीएपीसाठी वेगळा प्रोटोकॉल असणार आहे. ग्लोबल एनसीएपीत एखाद्या गाडीला पाच स्टार मिळण्यासाठी प्रौढांसाठी 34 गुण, फ्रंट क्रॅश टेस्टसाठी 16 गुण, साईड इम्पॅक्टसाठी 16 गुण आणि सीटबेल्ट रिमाइंडरसाठी 2 गुण मिळतात. दुसरीकडे, भारत एनसीएपीसाठी प्रौढांसाठी कमीत कमी 27, तर लहान मुलांसाठी कमीत कमी 41 गुण मिळवणं गरजेचं आहे. क्रॅश टेस्टिंगमध्ये फ्रंट ऑफसेट, साईड इम्पॅक्ट आणि पोल साईड इम्पॅक्ट तपासला जाणार आहे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.