ट्राफिकमध्ये कार चालवताना भिती वाटते? या चार गोष्टी लक्षात ठेवा

मुंबई सारख्या बहुतेक शहरांमध्ये ट्रॅफिक जॅम ही एक सामान्य समस्या आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला अवजड ट्रॅफिकमध्ये गाडी चालवण्याची भीती वाटत असेल, तर ही माहिती तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते.

ट्राफिकमध्ये कार चालवताना भिती वाटते? या चार गोष्टी लक्षात ठेवा
कार ड्रायव्हींगImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Aug 06, 2023 | 5:03 PM

मुंबई : आपल्या सर्वांनाच कारमधून प्रवास करायला आवडते, परंतु कार चालवणे हे अनेक लोकांसाठी खूप कठीण काम असते. जास्त ट्रॅफिक पाहून घाबरणारे बरेच जण आहेत. ट्रॅफिकमध्ये वाहन चालवताना त्यांना अपघात होण्याची सतत भीती वाटते. मुंबई सारख्या बहुतेक शहरांमध्ये ट्रॅफिक जॅम ही एक सामान्य समस्या आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला अवजड ट्रॅफिकमध्ये गाडी चालवण्याची भीती वाटत असेल, तर आम्ही तुमच्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स (Car driving Tips) घेऊन आलो आहोत.

1. प्रवासाचे नियोजन करा

सर्वात सोपा मार्ग म्हणजे आपल्या प्रवासाचे नियोजन करणे आणि नंतर प्रवासाला सुरूवात करणे. जर तुम्ही तुमच्या गंतव्यस्थानासाठी वेळेपूर्वी निघालो तर तुम्हाला ट्रॅफिक जामचा फारसा त्रास होणार नाही. जर तुम्ही अनोळखी मार्गाने जात असाल तर गुगल मॅप वापरणे चांगले. एकट्याने प्रवास करण्याऐवजी तुमच्यासोबत दुसरे कोणी असेल तर तुमच्यासाठी सोपे जाईल.

2. क्लच-ब्रेकचा वापर

अनेकांना क्लच आणि ब्रेकच्या योग्य वापराविषयी माहिती नसते. हे करण्याचा योग्य मार्ग म्हणजे जेव्हा तुम्ही क्लच सोडाल तेव्हा तुम्ही तो पूर्णपणे सोडावा, तो अर्धा दाबून ठेवू नका. तुमच्या समोरच्या वाहनाला प्रथम थोडे हलवू द्या, नंतर वाहन पहिल्या गियरमध्ये ठेवा आणि हळू हळू क्लच सोडा. जेव्हा वाहन थांबत नाही, तेव्हा क्लचच्या आधी थोडासा ब्रेक दाबा.

हे सुद्धा वाचा

3. या वैशिष्ट्यांचा वापर करा

कारमध्ये दिलेल्या महत्त्वाच्या वैशिष्ट्यांचा वापर करा- इंडिकेटर, हॉर्न, पास लाइट, रीअरव्ह्यू मिरर. तसेच समोरील वाहनाच्या ब्रेक लाईटवर लक्ष ठेवा. तुमच्या पुढे असलेली कार ब्रेक लावत असताना हे तुम्हाला कळेल. जर तुम्हाला लेन बदलायची असेल तर नक्कीच इंडिकेटर वापरा.

4. सभोवतालची विशेष काळजी घ्या

तुमच्या आजूबाजूच्या वाहनांचीच नव्हे तर पादचाऱ्यांचीही विशेष काळजी घ्या. जर तुम्ही नवीन ड्रायव्हर असाल तर तुमचे लक्ष भटकू देऊ नका. कोणतेही संगीत वाजत असेल तर ते थांबवा. तुमच्या ORVM मध्ये बाजूला आणि तुमच्या मागे असलेल्या गाड्यांकडे सतत लक्ष ठेवा.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.