Tomato Price : महिन्याभरातच टोमॅटोने केले करोडपती, या शेतकऱ्याला लागली लॉटरी!

Tomato Price : दरवर्षी भाव नसल्याने रस्त्यावर फेकून दिल्या जाणाऱ्या टोमॅटोने आता कमाल केली आहे. टोमॅटोने गगनाकडे झेप घेतल्याने अनेक शेतकऱ्यांना लॉटरी लागली आहे. हा शेतकरी तर अवघ्या एका महिन्यात करोडपती झाला आहे.

Tomato Price : महिन्याभरातच टोमॅटोने केले करोडपती, या शेतकऱ्याला लागली लॉटरी!
Follow us
| Updated on: Jul 16, 2023 | 8:54 AM

मुंबई : अनेक जण नशीब आजमावतात, त्यांना लॉटरी लागते. त्यांचे नशीब उघडते. पण या शेतकरी दाम्पत्याने मेहनतीच्या आणि संधीच्या जोरावर दौलत खेचून आणली आहे. टोमॅटोचे भाव (Tomato Price Hike) सध्या आकाशाला भिडले आहेत. भाव नसल्याने दरवर्षी रस्त्याच्या कडेला टोमॅटो फेकून द्यावा लागत होता. पण यंदा टोमॅटोला सोन्याचे दिवस आले आहेत. काही शेतकऱ्यांनी घाम गाळून टोमॅटो पिकवला. त्यांना टोमॅटोच्या वाढीव दराने अचानक लॉटरी लागली. दक्षिण आणि पश्चिम भारतातील अनेक शेतकरी मालामाल (Farmer got Hot Price) झाले आहेत. कर्नाटक, आंध्रप्रदेश, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळाले. काही सात दिवसांत तर काही महिनाभरातच कोट्याधीश झाले आहेत.

जून्नरमधील शेतकरी करोडपती पुणे आणि नगर जिल्ह्यातील सीमेवर जून्नर तालुका आहे. हा तालुका ग्रीन बेल्ट नावाने राज्यात ओळखल्या जातो. या तालुक्यात अनेक प्रयोगशील शेतकरी आहे. मुबलक पाणी आणि कल्पकतेच्या जोरावर येथील शेतकऱ्यांचे अनेक प्रयोग राज्यभर गाजले आहे. राज्यातील सर्वांधिक पाणलोट आणि सिंचन याच तालुक्यात आहे. तर याच गावातील शेतकऱ्याने टोमॅटो विक्रीतून तीस दिवस कोट्यावधी रुपये कमावले आहे.

काळ्या मातीत मातीत जून्नर तालुक्यातील माती काळीशार आहे. वर्षभर खेळते पाणी आहे. या क्षेत्रात कांदा आणि टोमॅटोचे मोठे उत्पादन होते. सध्या टोमॅटो महागला आहे. त्याचा या तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे. टोमॅटोने या तालुक्यातील शेतकऱ्यांचे नशीब पालटवले आहे. शेतकरी तुकराम गायकर यांच्या मेहनतीला गोडवा आला आहे. त्यांचे नशीब पालटले आहे. त्यांनी कोट्यवधी रुपये कमावले आहेत.

हे सुद्धा वाचा

पाचघरमध्ये शेतीत राबते कुटुंब तुकाराम भागोजी गायकर हे पाचघरचे. याठिकाणी त्यांची 18 एकर बागायती शेती आहे. यामधील 12 एकर शेतीवर पत्नी, मुलगा, सून यांच्यासह ते शेतीत राबतात. ही माती सोन्यासारखं पीक देते. गायकर यांच्या शेतात सध्या 100 हून अधिक महिला काम करतात. मुलगा आणि सूनेने शेतीची जबाबदारी घेतली आहे. आई-वडिलांच्या मार्गदर्शनाखाली ते आदर्श शेतकरी झाले आहेत.

अशी लागली लॉटरी गायकर यांना यंदा लॉटरी लागली. एका महिन्यात त्यांनी 13,000 टोमॅटो क्रेटच्या विक्रीतून 1.25 कोटींहून अधिकची कमाई केली आहे. एका क्रेटसाठी त्यांनी 2100 रुपये (20 किलो क्रेट) असा भाव मिळाला. गायकर यांनी आतापर्यंत एकूण 900 टोमॅटो क्रेटची विक्री केली आहे. एकाच दिवसात त्यांनी 18 लाख रुपये कमावले. गेल्या महिन्यात त्यांना ग्रेडच्या आधारावर प्रति क्रेट 1000 ते 2400 रुपये मिळाले होते.

करोडपती तालुका जून्नरमध्ये केवळ गायकर कुटुंबियच करोडपती झाले असे नाही. तालुक्यातील 10 ते 12 शेतकरी टोमॅटोमुळे मालदार झाले आहेत. या तालुक्यातील काही शेतकरी लखपती झाले आहेत. बाजार समितीने एका महिन्यात 80 कोटी रुपयांची उलाढाल केली आहे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.