Agrovet | द्राक्षांची निर्यात क्वालिटी बनवते हे एकमेव औषध, बिनकामाची २-२ औषधं मिक्स करणे सोडा

गोदरेज agrovet साजरी करत आहे कंबाईन या आपल्या बायोस्टिम्युलंटची २५ वर्षे बनावट गोष्टींपासून शेतकऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी आता नवीन पॅकेजिंग सादर

Agrovet | द्राक्षांची निर्यात क्वालिटी बनवते हे एकमेव औषध,  बिनकामाची २-२ औषधं मिक्स करणे सोडा
Follow us
| Updated on: Aug 25, 2023 | 6:17 PM

मुंबई, २५ ऑगस्ट २०२३ | भारतीय द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाची द्राक्षे पिकविण्यासाठी सक्षम करत गोदरेज अॅग्रोव्हेट लिमिटेडच्या (जीएव्हीएल) क्रॉप प्रोटेक्शन बिझनेसने आपल्या बायोस्टिम्युलंट, कंबाईनने २५ वर्षे पूर्ण केल्याचे आज जाहीर केले. आज, भारत द्राक्षांचा जगातील ११ वा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे आणि दर वर्षी १.२ लाख शेतकरी एकूण ३ लाख एकर जमिनीवर द्राक्षे पिकवतात. एकूण लागवड केलेल्या द्राक्षांपैकी ७०% निर्यात होत असल्याने एकूण निर्यात गेल्या दशकात १२.६% CAGR ने वाढली आहे. आणि येथेच डायमोर कंबाईनने भारतीय शेतकऱ्यांना निर्यातीसाठी योग्य बेरी आकार आणि रंग मिळविण्यात मदत केली आहे, तर सुपरशक्ती कंबाईनने देशांतर्गत बाजारपेठेसाठी लांब आकाराच्या द्राक्षांचे प्रकार मिळविण्यास मदत केली आहे.

कंबाईनला २५ वर्ष पूर्ण झाल्याबाबत भाष्य करताना, जीएव्हीएलचे व्यवस्थापकीय संचालक बलराम सिंग यादव म्हणाले, “भारतासारख्या उष्णकटिबंधीय देशात, शेतकऱ्यांना त्यांच्या द्राक्षांचे चांगले उत्पादन आणि गुणवत्ता मिळवून देण्यात कंबाईनचा मोठा वाटा आहे. आम्ही दरवर्षी सुमारे दीड लाख एकर जमिनीवर द्राक्षे पिकवणाऱ्या ९० हजार शेतकरी कुटुंबांना सेवा देतो. भारताला जागतिक द्राक्ष नकाशावर आणण्यासाठी आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी योगदान दिल्याबद्दल आम्हाला आनंद होत आहे.”

युनायटेड नेशन्स इकॉनॉमिक कमिशन फॉर युरोप (UNECE) ने तयार केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांशी सुसंगत द्राक्षाचा दर्जा वाढवण्यासाठी ‘कम्बाइन’ हे एक महत्त्वाचे साधन आहे. योग्य वापराने द्राक्ष उत्पादक ४००-५०० ग्रॅम वजनाचे घड, १८ मिमी आणि त्याहून अधिक बेरीचा व्यास, एकसमान बेरी रंग आणि सुधारित शेल्फ लाइफ यासारखे महत्वाचे मापदंड प्राप्त करण्यास सक्षम होतात. हे गुणधर्म, पावडर मिल्ड्यू (एक प्रकारची बुरशी) आणि डाउनी मिल्ड्यू सारख्या रोगाचा प्रसार करणार्‍या किडीचा प्रभाव कमी करण्याच्या क्षमतेसह असतात.

जीएव्हीएलच्या क्रॉप प्रोटेक्शन बिझनेसचे कार्यकारी संचालक आणि सीओओ बुर्जिस गोदरेज म्हणाले, “भारताच्या निर्यात समर्थ्यात द्राक्षांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्यामुळे आमच्या कृषी अर्थव्यवस्थेला चालना देण्याची त्यात अफाट क्षमता आहे. गोदरेज अॅग्रोव्हेटमध्ये म्हणून आम्हाला सक्षमीकरण करणाऱ्या आमच्या भूमिकेचा अभिमान वाटतो.

grapes,

ही क्षमता ओळखण्यासाठी आमचे उत्पादन ‘कंबाईन’ एक आधारस्तंभ म्हणून उदयास आले आहे. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना जागतिक गुणवत्ता मानकांनुसार पीक उत्पादन करण्यास सक्षम करून ‘कंबाईन’ त्यांना अतुलनीय द्राक्ष गुणवत्ता प्राप्त करण्यास सक्षम करते.”

उच्च निर्यात क्षमता असलेले द्राक्ष हे एक महत्त्वाचे फळ आहे हे लक्षात घेता, किडीचा सामना करण्यासाठी एक मजबूत यंत्रणा असणे अत्यावश्यक आहे. याचे कारण किडीच्या हल्ल्यामुळे सुमारे ५०-८०% उत्पादन नष्ट होते. एकात्मिक रोग व्यवस्थापन दृष्टिकोनाचा अविभाज्य घटक म्हणून, कंबाईन असे उपाय सादर करते जे केवळ विशिष्ट किडीलाच लक्ष्य करत नाही तर द्राक्ष लागवडीतील संभाव्य रोग समस्यांचे निराकरण देखील करते.

कंपनीने कंबाईनची २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आणि शेतकर्‍यांना बनावट उत्पादनांपासून संरक्षण देण्यासोबतच चांगल्या शेतीसाठी बांधिलकी म्हणून एक सेलिब्रेटरी पॅक देखील सादर केला आहे. कंबाईनचा नवीन पॅक वापरकर्त्यासाठी अनुकूल आहे आणि सुरक्षित पॅकेजिंग बाटलीमध्ये उपलब्ध आहे. यात छेडछाड रोधक असे स्पष्ट सील आहे. असे करून कोणीही बाटली उघडण्याचा प्रयत्न केल्यास ते फुटून खाली पडते.

बनावटपणा टाळण्यासाठी लेबलमध्ये जटिल वॉटरमार्क आहेत. आणि बाटलीची सत्यता सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक बाटलीवर एक विशिष्ट ९ अंकी कोड असलेला एक होलोग्राम देखील आहे. ग्राहकाला उत्पादन अस्सल असल्याची खात्री देण्यासाठी होलोग्राममध्ये देखील कुशलतेने एम्बेड केलेले अक्षर ‘G’ आहे. तर दृष्टिहीनांसाठी ब्रेल मार्किंग मध्ये धोक्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.

यावर भाष्य करताना, जीएव्हीएलचे क्रॉप प्रोटेक्शन बिझनेसचे सीईओ राजावेलू एन. के. म्हणाले, “कीड आणि रोगांमुळे द्राक्षाच्या उत्पादनाला धोका निर्माण होत असल्याने तळागाळातील शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्यामध्ये एकात्मिक रोग व्यवस्थापन लोकप्रिय करण्याची गरज आहे. शिफारस केलेल्या प्रमाणाच्या वापरापासून ते अस्सल उत्पादनापर्यंत, उद्योग-व्यापी सहकार्य होणे ही काळाची गरज आहे. जोडीला फलोत्पादनात प्रभावी एकात्मिक कीड व्यवस्थापन साधन म्हणून बायोस्टिम्युलंट्सचा नाविन्यपूर्ण वापर देशाच्या एकूण निर्यातीत द्राक्षांचे योगदान वाढवण्यास मोठा हातभार लावेल.”

भारतीय शेतीमध्ये बायोस्टिम्युलंट्सच्या वाढत्या क्षेत्रामुळे पीक उत्पादकता लक्षणीयरीत्या वाढेल असा अंदाज आहे. कृत्रिम रसायने आणि हवामान बदलाच्या प्रभावाबद्दल वाढलेली चिंता यामुळे आधुनिक पीक व्यवस्थापनात या संयुगांचे महत्त्व वाढले आहे. २०२१ पासून खत नियंत्रण आदेशामध्ये बायोस्टिम्युलंट नियमनाचा समावेश करणे हे जबाबदार आणि न्याय्य उत्पादन वापराच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.