Kharif Season : सोयाबीनची पेरणी हुकली तर उत्पादनाचेही गणित बिघडेल..! बातमी वाचा अन् चाढ्यावर मूठ ठेवा
उत्पादन वाढीसाठी सर्वात महत्वाची आहे ती शेतजमिन. सोयाबीनसाठी मध्यम काळी आणि निचरा होणारी जमिन गरजेची आहे. कारण सोयाबीन हे पावसाळ्यातील पीक असून पावसाचे पाणी न साचता त्याचा निचरा होणे गरजेचे आहे. पेरणीपूर्वी एकदा नांगरट, दोनदा कुळवणे याप्रकारची मशागत ही करावी लागणार आहे.
लातूर : नाही म्हणलं तरी आता खरिपातील पेरण्यांना उशीर झालेलाच आहे. पण तरीही शेतकऱ्यांनी घाईगडबडीत निर्णय न घेता (Agricultural Department) कृषी विभागाने केलेल्या आवाहनाचा विचार करयालाच हवा अन्यथा दुहेरी नुकसानीचा धोका आहे. त्यामुळे 75 ते 100 मि.मी (Rain) पावसाची नोंद झाल्यावरच पेरणी करणे गरजेचे आहे. (Soybean Crop) सोयाबीन हे खरीप हंगामातील मुख्य पीक आहे. या पिकाच्या उत्पादनात वाढ झाली तरच शेतकऱ्यांचे अर्थकारण सुधारणार आहे. त्यामुळे सर्वात महत्वाचे म्हणजे पेरणी प्रक्रिया आहे. शिवाय सोयाबीनच्या पेरणीत उशीर झाला तरी उत्पादनावर त्याचा काही फरक पडणार नाही. पण पेरणीचे व्यवस्थापन हुकले तर मात्र, खर्च करुन अपेक्षित उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी पडणार नाही. नेमकी सोयाबीनची पेरणी करताना काय काळजी घ्यावी लागणार हे आपण पाहणार आहोत.
शेतजमिन मशागत
उत्पादन वाढीसाठी सर्वात महत्वाची आहे ती शेतजमिन. सोयाबीनसाठी मध्यम काळी आणि निचरा होणारी जमिन गरजेची आहे. कारण सोयाबीन हे पावसाळ्यातील पीक असून पावसाचे पाणी न साचता त्याचा निचरा होणे गरजेचे आहे. पेरणीपूर्वी एकदा नांगरट, दोनदा कुळवणे याप्रकारची मशागत ही करावी लागणार आहे. तर सोयाबीनमध्ये फुले संगम-726, जे.एस.335, फुले कल्याणी- 228, जे.एस.9305, केडीएस-344 यासारख्या बियाणांचा वापर केला तर उत्पादनात वाढ होणार आहे.
बीजप्रक्रिया
पेरणीपूर्वीची सर्वात महत्वाची प्रक्रिया म्हणजे बीजप्रक्रिया. पेरणीच्या काही वेळ आगोदर बियाणे हे ट्रायकोडर्मा मध्ये चोळावे लागणार आहे. याचे प्रमाण प्रति 1 किलो बियाणांसाठी 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा घ्यावे लागणार आहे. शिवाय नत्र स्थिरीकरणासाठी सोयाबीन गटाचे रायझोबियम 250 ग्रॅम व स्फुरद विरघळणारे जीवाणू 250 ग्रॅम हे 10 किलो बियाणांसाठी वापरावे लागणार आहे.
बियाणांमधील अंतर पेरणीचा कालावधी
साधारणत: जूनच्या पहिल्या आठवड्यात खरिपातील पेरण्यांचा श्रीगणेशा होतो. पण यंदा पाऊल लांबणीवर असल्याने उशीराने पेरण्या होत आहेत. मात्र, सोयाबीनची पेरणी करताना दोन बियाणांमधील अंतर हे 45*0.5 सेमी असावे तर मध्य स्वरुपाची जमिन असल्यास 30*10 से.मी एवढे ठेवावे. जर सलग म्हणेजच रेग्युलर पेरणी करणार असताल तर प्रति हेक्टर 75 ते 80 किलो आणि टोकण पध्दतीने पेरणीसाठी प्रति हेक्टर 45 ते 50 किलो बियाणे लागणार आहे.