Pune : राज्यकर्त्यांनो अजून किती शेतकऱ्यांचे मुडदे पाडणार ! बीडमधील शेतकरी आत्महत्येनंतर राजू शेट्टींचे सरकारला खडे बोल

गेवराई तालुक्यातील हिंगणगाव येथील नामदेव जाधव यांनी 2 एकरामध्ये ऊस लागवड केली होती. शिवाय यामधून भरघोस उत्पादन होईल असा आशावाद होता. मात्र, उसाचा कालावधी संपूनही तोड होत नव्हती. दरम्यान, जाधव यांनी साखर कारखाना, मुकादम, उसतोड कामगार यांचे पाय धरले होते. परंतु, ना कारखाना प्रशासनाने याकडे लक्ष दिले ना जिल्हा प्रशासनाने. त्यामुळे हताश झालेल्या जाधव यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. त्यामुळे हा यंत्रणेने घेतलेला बळी आहे.

Pune : राज्यकर्त्यांनो अजून किती शेतकऱ्यांचे मुडदे पाडणार ! बीडमधील शेतकरी आत्महत्येनंतर राजू शेट्टींचे सरकारला खडे बोल
राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष
Follow us
| Updated on: May 12, 2022 | 11:38 AM

पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात विशेषत: मराठवाड्यात (Surplus Sugarcane) अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला होता. यासंबंधीची सर्व माहिती प्रशासनाला होती. शिवाय मराठावड्यात वाढलेले क्षेत्र आणि (Sugar Factory) साखर कारखाना यंत्रणाही माहिती असूनही या अतिरिक्त ऊस प्रश्नाकडे दुर्लक्ष झाल्यानेच बीडच्या 32 वर्षीय शेतकऱ्याने उसाच्या फडाला लागूनच असलेल्या झाडाला (Farmer Suicide) गळफास घेऊन आत्महत्या केली. राज्यकर्त्यांनो अजून किती मुडदे पाडणार आहोत आणि किती मुडद्यांवर तुम्ही राज्य करणार आहात अशा शब्दाने राजू शेट्टी यांनी शेतकऱ्याच्या आत्महत्येबद्दल आपला रोष व्यक्त केला आहे. साखर कारखान्यांचा भोंगळ कारभार आणि प्रशासनाचे याकडे होत असलेले दुर्लक्ष त्यामुळे नामदेव जाधव या शेतकऱ्याचा संबंधित यंत्रणेनेच बळी घेतल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी सरकरावर केला आहे.

वेळोवेळी जाधव यांचा अवमानच

गेवराई तालुक्यातील हिंगणगाव येथील नामदेव जाधव यांनी 2 एकरामध्ये ऊस लागवड केली होती. शिवाय यामधून भरघोस उत्पादन होईल असा आशावाद होता. मात्र, उसाचा कालावधी संपूनही तोड होत नव्हती. दरम्यान, जाधव यांनी साखर कारखाना, मुकादम, उसतोड कामगार यांचे पाय धरले होते. परंतु, ना कारखाना प्रशासनाने याकडे लक्ष दिले ना जिल्हा प्रशासनाने. त्यामुळे हताश झालेल्या जाधव यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. त्यामुळे हा यंत्रणेने घेतलेला बळी आहे. ज्या ऊस पिकावर सर्वकाही अवलंबून होते तोच ऊस डोळ्यादेखत करपून जात असल्याने जाधव यांनी आत्महात्या केली.

शासनाने पर्यायाचा अवलंबच केला नाही

अतिरिक्त उसाबाबत शासन हे गाफील राहिलेले आहे हे आता नव्याने सांगण्याची गरज नाही. लागवड क्षेत्र, अंदाजित उत्पादन, आणि साखर कारखान्यांची संख्या असे सर्वकाही असतानाही केवळ नियोजन झाले नाही. ज्याप्रमाणे पाणीटंचाई लक्षात घेताच विहिरींचे अधिगृहन करुन भविष्यातील काळजी घेतली जाते त्याचप्रमाणे बंद पडलेले साखर कारखाने हे शासन स्तरावर सुरु करणे गरजेचे होते. पण तसे काही न झाल्यामुळे हा यंत्रणेचा बळी ठरला असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

ऊस पेटवून घेतला होता गळफास

राज्यात आणि त्यामध्येच मराठवाड्यात अतिरिक्त उसाचे प्रश्न हा कायम आहे. कालावधी पूर्ण होऊन देखील तोड होत नसल्याने असंख्य शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. डोळ्यादेखत ऊसाचे होत असलेले नुकसान न सहन झाल्याने हिंगणगाव येथील नामदेव जाधव यांनी ऊस पेटवून गळफास घेतला. फडाला लागूनच असलेल्या एका झाडाला त्यांनी गळफास घेतला होता.

https://www.youtube.com/watch?v=Dg2KdcmdxQM

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.