Agricultural : निधीची चिंता सोडा, वर्ल्ड बॅंकेच्या सहकार्याचे चीज करा..! अधिकाऱ्यांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे निर्देश

केंद्र आणि राज्य सरकार हे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र, ज्या कृषि योजना आहेत त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. शिवाय वेळेत योजना मार्गी लागल्या तर त्यामधील निधीही परत जात नाही. शेतकऱ्यांच्या विकासाच्या दृष्टीने बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प हा महत्वाचा आहे.

Agricultural : निधीची चिंता सोडा, वर्ल्ड बॅंकेच्या सहकार्याचे चीज करा..! अधिकाऱ्यांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Jul 07, 2022 | 7:36 PM

मुंबई :  (Eknath Shinde) शिंदे गट आणि (BJP) भाजपाचे सरकार स्थापन झाल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकांचे सत्र हे सुरुच आहे. गुरुवारी सायंकाळी विविध क्षेत्रातील कामांचा आढावा घेताना रखडलेल्या (Agricultural Scheme) कृषी योजना मार्गी लावण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृषी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाला जागतिक बॅंकेने 3 हजार कोटांचे सहकार्य केले आहे. त्यामुळे निधीची चिंता नाही. आगामी काळात हे काम जलदगतीने पूर्ण व्हावेत यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचना दिल्या आहेत. तर मध्यंतरी हे काम कोरोनामुळे रखडले असल्याचेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली असली

शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न

केंद्र आणि राज्य सरकार हे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र, ज्या कृषि योजना आहेत त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. शिवाय वेळेत योजना मार्गी लागल्या तर त्यामधील निधीही परत जात नाही. शेतकऱ्यांच्या विकासाच्या दृष्टीने बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प हा महत्वाचा आहे. त्यामुळे याला गती दिली तरी शेतकऱ्यांचे जीवनमान बदलणार असल्याचेही शिंदे यांनी सांगितले आहे.

यंत्रणाशी संबंध ठेवा अन् प्रकल्प राबवा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाचा आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक मनुष्यळबळ तसेच निधीची कमतरता भासू देणार नाही. यासाठी सर्व त्या प्रकारचे पाठबळ दिले जाईल. ग्रामीण स्तरावर कार्यरत विविध यंत्रणाशी समन्वय ठेवून हा प्रकल्प राबविण्यात यावा. जागतिक बँकेने सहकार्य देऊ केलेला हा प्रकल्प आहे. या बँकेचा विश्वास वाढेल, अशा पद्धतीने प्रकल्पाला गती देण्यात यावी. प्रकल्प राज्यभरातील शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मत शिंदे यांनी व्यक्त केले आहे.

हे सुद्धा वाचा

शिंदेंची सावरासावर, फडणवीसांची टिका

बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पासाठी जागतिक बॅंकेने 3 हजार कोटींपर्यंतचा निधी दिला आहे. मात्र, महाविकास आघाडी सरकारच्या काळात केवळ 15 कोटी निधी खर्ची झाल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली तर दरम्यानच्या काळात कोरोनामुळे या योजनेतील कामांना गती मिळाली नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. त्यांनी महाविकास आघाडी सरकावर टीका केली नाहीतर प्रोजेक्ट पूर्ण होण्यावर भर दिला.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.